शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

अस्त शनिचे नक्षत्र गोचर: ७ राशींना चौफेर-चौपट लाभ, हाती पैसा; अनपेक्षित नफा, सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:45 IST

1 / 12
Shani Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात, शनि न्यायाधीश आणि कर्मदाता मानला गेला आहे. शनि व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ आणि न्याय देतात. शनि अंदाजे अडीच वर्षे एका राशीत संक्रमण करतात. या काळात ते नक्षत्र गोचरही करत असतात. आताच्या घडीला शनि मीन राशीत विराजमान आहे. मीन राशीचा स्वामी गुरू आहे.
2 / 12
काही दिवसांतच शनि उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या पुढील चरणात गोचर करत आहे. तसेच मार्च महिन्यात शनि अस्तंगत होणार आहे. तर एप्रिल महिन्यात शनिचा पुन्हा उदय होणार आहे. ३० वर्षांनी शनि मीन राशीत अस्त आणि उदय होणार असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 12
मीन राशीत असलेल्या शनिची मार्च महिन्यात अनेक ग्रहांशी युती होणार आहे. शनिची अनेक ग्रहांशी होणारी युती आणि नक्षत्र गोचर विविध राशींना अतिशय सकारात्मक ठरू शकते, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...
4 / 12
मेष: अनावश्यक खर्च टाळू शकाल. आर्थिक परिस्थितीत थोडीशी सुधारणा दिसून येईल. परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. परदेशातून लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतो. परदेशात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नशिबाची साथ लाभू शकते. कष्टाचे फळ मिळू शकते.
5 / 12
वृषभ: उत्पन्न वाढू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो. परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा नोकरीत असाल तर नफ्याची शक्यता वाढू शकते. गुंतवणुकीतूनही फायदा होऊ शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्यावा.
6 / 12
मिथुन: कामात आणि व्यवसायात मेहनतीचे फळ मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांचे कौतुक होऊ शकते. कनिष्ठ आणि वरिष्ठ दोघांकडूनही पाठिंबा मिळू शकतो. व्यावसायिकांना कामासाठी चांगल्या ऑर्डरची अपेक्षा असू शकते. गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्यावा. नफा मिळण्याची चिन्हे आहेत.
7 / 12
सिंह: आव्हाने संपू शकतात. दीर्घकाळ रखडलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. मानसिक ताणही कमी होऊ शकतो. कोणतेही काम शांतपणे, संयमाने केले तर यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो; अनावश्यक समस्या आणि चिंता संपू शकतात.
8 / 12
मकर: या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. शिवाय, परदेशी कामात गुंतलेल्यांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे. निर्णय सुज्ञपणे घ्यावेत. या काळात शनि अधिक मेहनत करण्यास भाग पाडू शकतो. भावंडांकडूनही पाठिंबा मिळू शकतो.
9 / 12
कुंभ: अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. नवीन लोकांशी संपर्क साधू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असू शकतो. कामात यश मिळू शकते. वरिष्ठ कामावर खूश होऊन एक महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. समाधान लाभू शकेल. व्यवसायात नफा मिळू शकतो. मागील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.
10 / 12
मीन: समाजात आदर मिळू शकेल. लोकप्रिय होऊ शकाल. विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात कोणाशीही वाद घालू नये. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीच्या शुभ संधी मिळू शकतील. प्रलंबित निधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते.
11 / 12
शनि मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींची साडेसाती सुरू आहे. त्यामुळे शनिचे नक्षत्र गोचर आणि अस्तंगत होणे या राशींसाठी विशेष ठरू शकते, असे म्हटले जात आहे.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShani Devशनि देवshani shinganapurशनि शिंगणापूर