शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Shani Asta 2026: ४० दिवस साडेसाती टळेल, शनिचा प्रभाव संपेल; ‘हे’ उपाय करा, लक्ष्मी पाणी भरेल, शुभ-लाभ-पैसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:09 IST

1 / 15
Shani Asta Sade Sati 2026 Upay In Marathi: २०२६ हे वर्ष सुरू झाले असून, मार्च महिन्याच्या मध्यात शनि अस्तंगत होत आहे. शनिचे अस्तंगत होणे अतिशय विशेष मानले जात आहे. आताच्या घडीला गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत शनि विराजमान आहे. नवग्रहांमध्ये सर्वांत धीम्या पद्धतीने गोचर करणारा, परंतु, तेवढाच प्रभावी आणि नवग्रहांचा न्यायाधीश ग्रह म्हणजे शनि ग्रह.
2 / 15
शनि एका राशीत शनि तब्बल २.५ वर्षे असतो. २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत विराजमान झाला आहे. आता संपूर्ण २०२६ हे वर्ष शनि मीन राशीत असणार आहे. शनि ढिय्या प्रभाव आणि शनि साडेसाती यांचे चक्र २०२६ या संपूर्ण वर्षात कायम राहणार आहे. शनि साडेसाती आणि ढिय्या प्रभाव अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
3 / 15
एखादा ग्रह सूर्याच्या अगदी जवळून गोचर करतो, तेव्हा सूर्याच्या प्रभावामुळे तो ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. अशा परिस्थितीत तो ग्रह अस्तंगत झाला असे म्हटले जाते. आताच्या घडीला शनि मीन राशीत आहे. १४ मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे शनि आणि सूर्य एकमेकांच्या जवळ असल्याने शनि अस्तंगत होणार आहे.
4 / 15
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शनि हे पिता-पुत्र मानले गेले असले तरी सूर्य आणि शनि एकमेकांचे शत्रू ग्रह मानले जातात. गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत दोन शत्रू ग्रहांची युती होणार आहे. परंतु, शनि अस्तंगत होणार असल्यामुळे शनिचा प्रभाव फारसा राहणार नाही, असे म्हटले जात आहे. सुमारे ४० दिवसांनी शनि उदय होणार असल्याचे म्हटले जात आहे.
5 / 15
शनि अस्तंगत स्थितीत असेपर्यंत साडेसातीचा प्रभाव कमी जाणवू शकेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे साडेसाती, शनि ढिय्या, शनि महादशा, शनि अंतर्दशा सुरू असलेल्या व्यक्तींना या काळात काहीसा दिलासा मिळू शकेल, असेही म्हटले जात आहे. शनि अस्तंगत असल्याच्या काळात काही उपाय करणे फायदेशीर ठरू शकते. त्याने अनेक लाभ होऊ शकतात, असे सांगितले जाते.
6 / 15
ज्यांची साडेसाती सुरू आहे किंवा शनिचा ढिय्या प्रभाव आहे, अशा लोकांनी आवर्जून न चुकता शनि संबंधातील उपाय, शनिचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही गोष्टींचे नक्कीच पालन करावे. असे केल्यास शनि कृपा सदैव राहू शकेल, असे सांगितले जात आहे.
7 / 15
साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे. शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
8 / 15
शनि हा महादेवांना आपले गुरु मानतो, अशी मान्यता आहे. तसेच महादेवांनीच शनिला नवग्रहांचे न्यायाधीश पद दिले आहे, असेही म्हटले जाते. त्यामुळे शनि साडेसाती, ढिय्या प्रभाव, महादशा काळात शक्य तेवढी महादेवांची उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ मानले जाते.
9 / 15
कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा.
10 / 15
शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनि धाम यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
11 / 15
हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
12 / 15
पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे. पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान असेही काही उपाय सांगितले जातात.
13 / 15
आताच्या घडीला कुंभ, मीन आणि मेष या ३ राशींची साडेसाती सुरू आहे.सध्या सिंह आणि धनू या राशींवर शनिचा ढिय्या प्रभाव/अडीचकी सुरू आहे. जून २०२७ पर्यंत साडेसाती आणि शनि अडीचकी ढिय्या प्रभाव या सर्व राशींवर कायम राहणार असल्याचे सांगितले जाते.
14 / 15
साडेसाती योग हा शनिचा विशेषाधिकार मानला गेला आहे. शनी हा कर्मकारक आहे. मानवाच्या पूर्वकर्मानुसार त्यास शुभाशुभ फळ देण्याचा सर्वाधिकार शनिग्रहास दिला आहे, असे मानले जाते. साडेसाती ही मानवाच्या आयुष्यातील शुद्धिकरण प्रक्रिया मानली गेली आहे. ०२ जून २०२७ रोजी शनि मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे.
15 / 15
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShani Devशनि देवshani shinganapurशनि शिंगणापूरspiritualअध्यात्मिकPuja Vidhiपूजा विधी