Shani Amavasya 2025: २००० वर्षांनी जुळून येतोय दुर्लभ संयोग; 'हा' छोटासा उपाय तुमचे जीवन बदलू शकतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:59 IST2025-03-24T13:56:16+5:302025-03-24T13:59:28+5:30
Shani Amavasya 2025:ज्योतिष शास्त्रानुसार असे म्हटले जात आहे, की जवळपास २००० वर्षांनी शनिवारी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्येचा दुर्लभ योग जुळून येत आहे. शनी देव आणि सूर्य हे केवळ ग्रह नाही तर पिता पुत्र आहेत. त्या दोघांचा एकत्र संयोग होत असल्याने त्या दिवशी ज्योतिष अभ्यासकांनी दिलेले उपाय करून आपल्याला शनी तसेच सूर्य कृपा प्राप्त करता येईल.

शनी हा परीक्षा बघणारा तर सूर्य हा भाग्याला लकाकी देणारा ग्रह. जेव्हा या दोघांचा संयोग होतो, तेव्हा निश्चितच शुभ फळ मिळते. या संयोगाचा बाराही राशींवर प्रभाव पडणार आहे. म्हणून ज्योतिष अभ्यासकांनी एक साधा सोपा उपाय दिला आहे, जेणेकरून या दुर्लभ संयोगाचे शुभ फळ जातकांना मिळू शकेल. त्याबद्दल अधिक जाणून घेऊ.
२९ मार्च रोजी शनिवार आहे आणि त्याच दिवशी शनी अमावस्या (Shani Amavasya 2025) आणि सूर्य ग्रहण(Solar eclipse 2025)आहे. यादिवशी शनी देव स्वतःच्याच कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. स्वराशीतच हे स्थलांतर असले तरी त्यामुळे इतर राशींच्या जीवनात अनेक बदल घडणार आहे. मुख्यत्त्वे मकर राशीची साडेसाती संपून मेष राशीची साडेसाती सुरु होणार आहे.
शनी आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावासाठी २९ मार्च ची सायंकाळ अतिशय महत्त्वाची आहे. त्यादिवशी ठीक ८. १८ मिनिटांनी पुढील उपाय करायचा आहे. शनी अमावस्यां असल्याने हा उपाय सायंकाळीच करायचा आहे. त्यासाठी ८.१८ मिनिटांची वेळ निवडण्याचे कारण म्हणजे ८ हा शनी देवाचा अंक आहे ता १ हा सूर्यदेवाचा. त्यामुळे ही वेळ चुकवू नका आणि पुढील उपाय करा.
या दुर्लभ संयोगावर रात्री ठीक ८.१८ मिनिटांनी आपल्या घराच्या प्रवेश द्वारावर अर्थात उंबरठ्याजवळ एक कणकेचा दिवा लावा आणि त्यात चार दिशेला चार वाती लावा. तो दिवा प्रज्वलित करा आणि शनी देवाची पूजा करा. येत असल्यास शनी स्तोत्र म्हणा, रवीस्तुती म्हणा किंवा ऐका.
घरात मंगलमयी गोष्टी घडाव्यात यासाठी ज्योतिष अभ्यासकांनी हा उपाय सुचवला आहे. चार दिशेला चार वाती लावल्यामुळे चारही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभ वार्ता घडण्यास सुरुवात होईल. शनिदेवाची आणि सूर्यदेवाची कृपा होऊन तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि मंगलमयी गोष्टींची सुरुवात होईल. त्यासाठी दिलेला उपाय नक्की करून बघा.