स्वराशीत शनी वक्री: ५ राशींना ४ महिने सर्वोत्तम काळ, नोकरीत पद-पैसा वाढ; लाभच लाभ, शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 01:33 PM2024-06-21T13:33:29+5:302024-06-21T13:44:43+5:30

Shani Vakri June 2024: शनी वक्री झाल्याने काही राशींच्या व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये फायदा, व्यवसायात नफा, अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहातील शनी हा कर्मकारक ग्रह आहे. एखाद्या व्यक्तीचे जसे कर्म असेल, तशी फले शनीदेव देतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. विद्यमान स्थितीत शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहेत.

आताच्या घडीला तीन राशींची साडेसाती सुरू आहे. मकर राशीचा शेवटचा टप्पा, कुंभ राशीचा दुसरा टप्पा आणि मीन राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. २०२५ रोजी शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी, २९ जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. तर १५ नोव्हेंबर रोजी शनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे.

आगामी ४ ते साडेचार महिन्यांचा काळ काही राशींना उत्तम लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. कुंभ ही शनीची मूलत्रिकोणी रास असून, शश नामक राजयोग जुळून आला आहे. शनी वक्री होणे फारसे अनुकूल मानले गेले नसले तरी ५ राशींवर शनी देवाची भरभरून कृपा होऊ शकते. फायदा मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहे त्या लकी ५ राशी? जाणून घेऊया...

मेष: शनी वक्री होणे शुभ फलदायी ठरू शकेल. उत्पन्नात वाढ दिसू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कुटुंब आणि जोडीदाराशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकतील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेअर मार्केट, लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो.

वृषभ: शनी वक्री होणे अनुकूल सिद्ध होऊ शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. या काळात व्यवसायात मोठे यश मिळू शकते. करिअरमध्ये काही प्रोजेक्टद्वारे यश आणि प्रसिद्धी मिळू शकेल. वडिलांसोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल.

सिंह: प्रगतीची शक्यता आहे. करिअर आणि आर्थिक जीवनात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय करत आहेत, त्यांना चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे किंवा योजना पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकेल. काही विशेष लाभही मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

धनु: करिअरमध्ये यश मिळू लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून लाभ आणि सहकार्य मिळेल. नोकरीवरील पकड मजबूत होईल. काही क्षेत्रात झपाट्याने यश मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढेल. भाग्याची पूर्ण साथ लाभू शकेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकेल. आर्थिक आघाडीवर शनी देवाच्या कृपेने चांगला लाभ होण्याची शक्यता आहे.

मकर: शनी वक्री होणे फायदेशीर ठरू शकते. बोलण्याचा प्रभाव वाढेल. करिअरमध्ये प्रगती आणणारा काळ ठरू शकतो. नोकरदारांना वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकेल. मुलांकडूनही आनंद मिळेल. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.