संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर गणपती प्रसन्न, लक्ष्मी राजयोगाचा लाभ; दत्तगुरु स्वामी शुभ करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 06:33 AM2024-03-28T06:33:06+5:302024-03-28T06:33:06+5:30

गुरुवारी येणारी संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली गेली असून, त्याचा अनेक राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.

मराठी वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी आहे. या चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी असेही म्हटले जाते. फाल्गुन महिन्यात येणारी ही संकष्ट चतुर्थी गुरुवार २८ मार्च रोजी आहे. गुरुवार हा दिवस दत्तगुरू, स्वामी समर्थ महाराज, श्रीविष्णू यांना समर्पित असल्याचे सांगितले जाते.

गुरुवारी आलेल्या संकष्ट चतुर्थीला गणपती, दत्तगुरू, स्वामी समर्थ महाराज, श्रीविष्णू यांचे केलेले नामस्मरण, आराधना, पूजन विशेष मानले जाते. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाला विशेष महत्त्व असून, चंद्रदर्शन झाल्यानंतरच उपास सोडून व्रतसंकल्प पूर्ण केला जातो. या दिवशी बाप्पाची विशेष सेवा, व्रतपूजन केले जाते.

संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकतो. प्राचीन काळापासून संकष्ट चतुर्थीचे व्रताचरणाची परंपरा आहे. या दिवशी विशेष काही योग जुळून येत आहेत. नवमपंचम योग, राजयोग, लक्ष्मी योग, हर्षण योग, स्वाति नक्षत्राचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगांमुळे काही राशींच्या व्यक्तींना उत्तम लाभ, सुख-समृद्धी वृद्धी, यश-प्रगतीची संधी मिळू शकते, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

मेष: एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. नोकरीत सुचनांचे स्वागत केले जाऊ शकेल. उत्पन्न वेगाने वाढेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. नवीन संपर्क वाढवण्याची संधी मिळेल. भविष्यात चांगला फायदा होईल. सुख-समृद्धी असेल. जीवनशैलीत सुधारणा दिसून येईल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये चोख असले पाहिजे, फायद्याच्या संधी ओळखून त्यावर कार्य करावे लागेल, तर चांगला नफा मिळवू शकाल. परदेशात शिक्षणासाठी जायचेय, त्यांना संधी मिळू शकते. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. मुलांच्या भविष्यासाठी काही नियोजन कराल.

वृषभ: नवीन संपर्काचा लाभ मिळेल. परदेशात जाण्याचा विचार करत होते, त्यांची योजना पूर्ण होऊ शकते. कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. घरातील सदस्यांमध्ये काही कटुता होती तर ती दूर होताना दिसत आहे. कोणत्याही कामात स्वतःच्या इच्छेनुसार वागू नका. अन्यथा अडचणी येतील. एखाद्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर वातावरण प्रसन्न होईल.

कर्क: भाग्याची चांगली साथ लाभू शकेल. मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. कार्यक्षेत्रात मेहनतीने चांगले स्थान प्राप्त कराल. काम दुसऱ्यावर टाकणे टाळावे लागेल. मुलांबद्दल काही गोष्टींचा राग येऊ शकतो. पैशाशी संबंधित कोणत्याही समस्येबद्दल पालकांशी बोलू शकता. घराशी संबंधित कोणतीही महत्त्वाची माहिती बाहेरील व्यक्तीला सांगू नये.

सिंह: सुख-समृद्धी वाढू शकेल. नशिबाची साथ लाभू शकेल. पुरेसे पैसे मिळतील. पैशाची कमतरता भासणार नाही. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आनंद, शांतता, परस्पर प्रेम असेल. कुटुंबासोबत कुठेतरी सुट्टीचा प्लॅन करू शकता. काही नवीन कामात गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर चांगला नफा मिळेल. व्यवसाय वेगाने प्रगती करेल. आदर वाढेल.

कन्या: उत्पन्नाच्या अतिरिक्त स्त्रोतांबद्दल माहिती मिळेल. वैयक्तिक, व्यावसायिक जीवनातील अडथळ्यांपासून दिलासा मिळू शकेल. व्यवसायाशी संबंधित योजना अंतिम केली जाऊ शकते. नोकरदारांच्या करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. त्याग आणि सहकार्याची भावना वाढेल. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. गुंतवणूक करू शकता. मित्रांची संख्येत भर पडू शकेल.

वृश्चिक: ठरवलेली कामे पूर्ण करू शकाल. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार कराल. पुढे जाण्याची, प्रगती करण्याची संधी मिळेल. भावंडांकडे कोणतीही मदत मागितली तर ती सहज उपलब्ध होऊ शकेल. नोकरदारांना दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. ज्याचा ते विचार करू शकतात. एखाद्या नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळेल.

धनु: मान-सन्मान वाढू शकेल. काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सामर्थ्य आणि बुद्धीच्या जोरावर सर्व गोष्टी साध्य करू शकता. एकामागून एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. एखाद्याला पैसे उधार दिले असतील, तर ते परत मिळवू शकता. समस्यांबद्दल वडिलांशी बोलू शकता. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील.

मकर: अनुभवाचा पुरेपूर लाभ मिळेल. प्रशासकीय कामात गती राहील. शेअर मार्केट किंवा लॉटरीत पैसे गुंतवून चांगले फायदे मिळवू शकता. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम झाल्यामुळे वातावरण प्रसन्न राहील. मनातील कोणतीही इच्छा पालकांना सांगितली तर ते पूर्ण होऊ शकेल. व्यावसायिकांसाठी काळ असेल. यशस्वी व्हाल.

एप्रिलमध्ये मराठी नववर्षाला सुरुवात होणार आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.