शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्ट चतुर्थीला करा 'या' वस्तूंची खरेदी; घरात नांदेल सुख-समृद्धी आणि अखंड लक्ष्मी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:53 IST

1 / 7
संकष्ट चतुर्थी हा बुद्धीचा दाता आणि विघ्नहर्ता गणपतीचा दिवस. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी काही मांगलिक वस्तूंची खरेदी केल्याने शुभ फळ मिळते आणि कामातील अडथळे दूर होतात. ५ फेब्रुवारीच्या संकष्टीला तुम्ही खालीलपैकी एखादी वस्तू घरी आणून नशिबाला साथ देऊ शकता.
2 / 7
जर तुमच्या घरात गणपतीची मूर्ती नसेल किंवा तुम्हाला नवीन मूर्तीची स्थापना करायची असेल, तर संकष्टीचा दिवस सर्वोत्तम आहे. पितळी मूर्ती घरातील नकारात्मकता दूर करते, तर चांदीची मूर्ती आर्थिक सुबत्ता आणते.
3 / 7
आर्थिक चणचण दूर करण्यासाठी संकष्टीला ११ पांढऱ्या कवड्या किंवा गोमती चक्र खरेदी करा. ते बाप्पाच्या चरणी अर्पण करून नंतर आपल्या तिजोरीत ठेवा. यामुळे धनाची आवक वाढते.
4 / 7
शास्त्रानुसार, संकष्टीला पाण्याचे नवीन भांडे किंवा मातीचा माठ खरेदी करणे शुभ मानले जाते. हे प्रगती आणि प्रवाही समृद्धीचे प्रतीक आहे.
5 / 7
पिवळा रंग गणपतीला प्रिय आहे. या दिवशी पिवळे रेशमी कापड खरेदी करून त्यात दागिने किंवा पैसे ठेवल्याने वृद्धी होते. तसेच, 'गणेश पुराण' किंवा 'अथर्वशीर्ष' यांसारखी पुस्तके घरी आणणे ज्ञानवृद्धीसाठी उत्तम आहे.
6 / 7
जर तुम्ही अध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करत असाल, तर संकष्टीला रुद्राक्ष खरेदी करून त्याची पूजा करणे अत्यंत फलदायी ठरते.
7 / 7
खरेदी नेहमी राहू काळ टाळून शुभ मुहूर्तावर किंवा सकाळी करा. संकष्टीच्या दिवशी लोखंडी वस्तू किंवा धारदार शस्त्रे (कात्री, चाकू) खरेदी करणे टाळावे.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीAstrologyफलज्योतिषTraditional Ritualsपारंपारिक विधीPuja Vidhiपूजा विधीIndian Festivalsभारतीय उत्सव-सणganpatiगणपती 2025