Sankashti Chaturthi 2025: आज 'सौभाग्य' योगात 'या' पाच राशींवर गणपती-लक्ष्मी होणार कृपावंत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:38 IST2025-01-17T10:33:51+5:302025-01-17T10:38:02+5:30

Sankashti Chaturthi 202: आज १७ जानेवारी, नवीन इंग्रजी वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2025)आणि देवीचा आवडता वार शुक्रवार, या औचित्यावर सौभाग्य योग जुळून आला आहे. तसेच शुक्र आणि शनि एकत्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्र आणि शनि चंद्रावर सिंह राशीत भ्रमण करतील आणि या संक्रमणामुळे अनफा योग आणि सौभाग्य योग देखील तयार होत असून मेष राशीसह ५ राशींवर लक्ष्मी-गणपती कृपावंत होणार आहेत.

आज १७ जानेवारी, शुक्रवार आहे आणि या दिवसाचा शासक ग्रह शुक्र आहे, ज्याचा चंद्रावर थेट प्रभाव पडतो, जो खूप शुभ ठरतो. त्यातच कला, सौंदर्य, बुद्धी, सिद्धी देणारा गणाधी गणपती याची आवडती तिथी संकष्टी आहे आणि माता लक्ष्मीला प्रिय असा शुक्रवार आहे. हा योग पुढील पाच राशींसाठी शुभ ठरणार आहे. त्या राशी कोणत्या हे जाणून घेण्याआधी त्या राशींना होणारे लाभ आणि त्यांनी करायची उपासना जाणून घेऊ.

आज मेष राशीच्या लोकांना गणपती आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणार आहे. धनलाभाची संधी मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकारी तुमचा आदर आणि सन्मान करतील. तुमचे कोणतेही काम जे अडकले आहे, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ व्यक्तीचे सहकार्य मिळेल. ज्यांना आपला व्यवसाय वाढवायचा आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस अनुकूल असेल. तुमच्या आधीच्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला मिळेल. परदेशातून शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळू शकते. विवाहेच्छुकांना ओळखीतून चांगले स्थळ येईल, सकारात्मक चर्चा घडतील.

आज शुक्रवारी आलेल्या संकष्टीचा पाच राशींना पुरेपूर लाभ होणार आहे. कला, कौशल्य क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी नेतृत्त्व करतील, त्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळेल आणि न्यायदेखील मिळेल. त्यांच्या संपत्तीत वाढ होईल. तसेच पुढील राशीच्या लोकांना आर्थिक लाभाच्या संधीदेखील मिळतील. मात्र त्यांनी गणपती मंदिरात जाऊन तिळगुळ, हलवा, खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. घरातील अन्नपूर्णा रूपातील लक्ष्मीला दूध-साखरेचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष, श्रीसूक्त यांचे पठण, श्रवण केल्याने अधिक लाभ होईल.

लक्ष्मी देवीच्या कृपेने तूळ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. तुम्हाला कुटुंबातमान-सन्मान मिळेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून स्नेह आणि सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी समन्वय राखून कौटुंबिक जीवनात आनंद मिळवता येईल. महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. तुमच्या कलात्मक आणि सर्जनशील क्षमतेचाही तुम्हाला फायदा होईल. परंतु तुमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे, की नको तिथे तुम्ही भावनिक होऊ नका आणि अगतिक होऊन निर्णय घेणे टाळा.

धनु राशीच्या लोकांना आज वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल किंवा प्रॉपर्टी संबंधित अडलेल्या कामांना गती मिळेल. आर्थिक क्षेत्रात पूर्वीच्या गुंतवणुकीचे फायदे मिळतील. तुम्ही तुमच्या व्यवसायात आणि कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊ शकाल. तुमच्या घरात प्रेम आणि परस्पर सौहार्द असेल. नात्यांमध्ये जिव्हाळा निर्माण होईल. मन शांत आणि समाधानी राहील.मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. ज्या लोकांना प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांना ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने फायदा होऊ शकतो. तसेच एखाद्या धार्मिक प्रवासासाठी जाण्याची योजना आखाल.

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार श्रीगणेश आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने शुभ आणि लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला अशा स्त्रोताकडून लाभ मिळू शकतो ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित तुमचा प्रवास यशस्वी आणि लाभदायक होईल. महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला आनंद वाटेल. संशोधन कार्य किंवा शैक्षणिक क्षेत्रात सहभागी असलेल्या लोकांना काही मोठे यश मिळू शकते. घरबांधणीच्या कामात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. आवडते पदार्थ मिळाल्याने आनंद होईल. सेव्हिंगच्या दृष्टीने गुंतवणूक करणार असाल तर आज श्रीगणेशा करायला हरकत नाही.

संकष्ट चतुर्थीचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी श्रीगणेशाच्या कृपेने शुभ राहील आणि यशाच्या मार्गातील अडथळेही दूर होतील. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि हुशारीने तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी यश आणि सन्मान मिळवू शकाल. नोकरीच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील. प्रसिद्धी मिळेल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही चांगल्या संधी निर्माण होत आहेत. तुम्हाला उत्पन्नाचे काही नवीन स्रोत मिळू शकतात. आर्थिक बाबतीत, तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही नवीन काम करण्याची योजना देखील करू शकता. तुम्हाला कुटुंबात तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. साथ मिळेल. जे लोक मालमत्ता विकू किंवा खरेदी करू इच्छित आहेत त्यांना चांगला नफा मिळू शकेल.