राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 12:02 PM2024-05-14T12:02:03+5:302024-05-14T12:10:05+5:30

राहुचे नक्षत्र गोचर महत्त्वाचे मानले गेले असून, कोणत्या राशींना फायदा होऊ शकेल? जाणून घ्या...

नवग्रहांमध्ये राहु आणि केतु हे छाया ग्रह मानले गेले आहेत. राहु आणि केतु आताच्या घडीला अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत आहेत. हे दोन्ही ग्रह क्रूर मानले जातात. ग्रह जसे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. तसेच संपूर्ण २७ नक्षत्रांतूनही ग्रहांचा संचार होत असतो. काही दिवसांनी राहु नक्षत्र परिवर्तन करणार असून, एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात गोचर करणार आहे.

विद्यमान स्थितीत बुधाचे स्वामित्व असलेल्या रेवती नक्षत्रात राहु असून, उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात राहु प्रवेश करणार आहे. ०८ जुलै रोजी राहु उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात विराजमान होणार असून, याचा अनेक राशींवर प्रभाव पडू शकेल, असे सांगितले जात आहे. या नक्षत्राचा स्वामी शनी असून, राहु आताच्या घडीला गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत आहे.

राहुच्या नक्षत्र गोचराचा केवळ राशींवर नाही, तर देश दुनियेवर प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे. काही राशींना राहुच्या नक्षत्र गोचराचा काळ अतिशय सकारात्मक अनुकूल ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

वृषभ: विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. संपत्ती मिळू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या अनेक योजना पूर्ण होतील. अनावश्यक खर्च नियंत्रणात राहतील. बचत करण्यात यशस्वी व्हाल. परदेशात एखाद्यासोबत व्यवसाय असेल तर तिथूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फायदेशीर ठरू शकते. नवीन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. करिअरसाठी शुभ ठरू शकते.

मिथुन: राहुचे नक्षत्र गोचर खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकेल. कामानिमित्त परदेश प्रवास संभवतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर खर्च थोडा वाढेल पण तरीही नियंत्रण राहील. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. राहुचा प्रभाव चांगला राहणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

कर्क: परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. नशिबाची साथ मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. गुंतवलेल्या पैशावर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. परदेशी स्तोत्रातून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरदारांना चांगला परिणाम दिसून येऊ शकतो. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. सोयीनुसार लाभ घेऊ शकता. जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या.

तूळ: जीवनात सकारात्मक चिन्हे दिसू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. अधिक पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. करिअरमध्ये अनेक संधी मिळतील. कामाचे कौतुक होईल. महिलांना व्यवसायात खूप प्रसिद्धी मिळेल. कामानिमित्त अधिक परदेश प्रवास करावा लागू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. मुलांकडून आनंद मिळेल. अध्यात्माकडे अधिक कल असेल.

वृश्चिक: जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमावण्याची संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. लक्ष आता पूर्वीपेक्षा अधिक एकाग्र होईल. सर्व कामे अतिशय विचारपूर्वक कराल.

मकर: राहुचे नक्षत्र गोचर लाभदायक सिद्ध होऊ शकते. जुन्या आठवणी ताज्या होऊ शकतात. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. कामानिमित्त परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. फायदा होईल. निर्णय घेत असाल तर त्यावर ठाम राहाल, यामुळे आत्मविश्वास वाढेल. काही अडचण येण्याची शक्यता आहे. पण मग फायदा होऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाईल. कुटुंबाच्या पाठिंब्याने अडचणींवर मात करून यश मिळवू शकता. अध्यात्माकडे अधिक कल असेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.