१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:44 IST2025-05-20T14:31:37+5:302025-05-20T14:44:05+5:30

मायावी, क्रूर मानल्या गेलेल्या राहु आणि केतु यांचे गोचर अतिशय प्रभावी मानले जाते. कोणत्या राशी ठरतील लकी? कोणाला मिळेल यश-प्रगतीची सुवर्ण संधी? जाणून घ्या...

मे महिन्यात एकाच दिवशी नवग्रहांचा गुरू बृहस्पति म्हणजेच गुरू ग्रह आणि नवग्रहांचा राजा सूर्य यांनी राशीपरिवर्तन केल्यानंतर आता ज्योतिषशास्त्रानुसार, मायावी आणि क्रूर ग्रह मानले गेलेले राहु-केतु राशीपरिवर्तन करत आहेत. राहु आणि केतु एका राशीत १८ महिने विराजमान असतात. राहु आणि केतु यांचे गोचर अतिशय प्रभावकारी मानले जाते.

मे महिन्याच्या उत्तरार्धात राहु आणि केतु मीन आणि कन्या राशीतून अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत प्रवेश करत आहे. राहु आणि केतु कायम वक्री चलनाने गोचर करत असतात. राहु आणि केतु एकमेकांपासून नेहमीच समसप्तक स्थानी असतात. राहु आणि केतु आता पुढील १८ महिने कुंभ आणि सिंह राशीत विराजमान असतील.

आताच्या घडीला मीन राशीत राहु आणि शनी यांची अशुभ युती सुरू होती, राहु शनीचेच स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करताच ही अशुभ युती समाप्त होणार आहे. राहु आणि केतु यांच्या गोचराचा कोणत्या सर्वांना सर्वाधिक, सर्वोत्तम, सकारात्मक लाभ प्राप्त होऊ शकेल, यश-प्रगतीच्या सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकतील? जाणून घेऊया...

मेष: ग्रहांची ही स्थिती लाभदायक ठरू शकेल. ध्येय साध्य करण्यास मदत करेल. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होण्याची चिन्हे आहेत. लोकप्रियता वाढेल. नोकरी करणाऱ्यांना या काळात गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. चांगली बातमी मिळू शकते. नेटवर्किंग क्षेत्रातील लोकांना यश-प्रगतीची नवीन संधी मिळू शकते. नातेसंबंधांमध्ये काही वेगळेपणा जाणवू शकतो.

वृषभ: चांगले दिवस सुरू होऊ शकतात. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. कामाचे कौतुक होईल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल. नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. या काळात व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. आर्थिक योजना यशस्वी होतील. कलात्मक क्षेत्रात प्रसिद्धी आणि आदर मिळेल.

मिथुन: भाग्याची साथ मिळेल. प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. करिअरमध्ये यश मिळवू शकता. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. प्रत्येक काम पूर्ण प्रामाणिकपणा आणि मेहनतीने पूर्ण कराल. सकारात्मकता लाभू शकेल. पराक्रमात वाढ होऊ शकते. धाडस वाढू शकते.

सिंह: नोकरीत खूप फायदे मिळू शकतात. कामाचे कौतुक होऊ शकेल. उच्च अधिकारी खूश होऊन काही मोठी जबाबदारी सोपवू शकतात. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता सोडवता येतील. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे.

कन्या: आव्हानांचा अंत होऊ शकतो. डोक्यावरून एक मोठा भार उतरल्यासारखे वाटेल. बिघडलेले काम अचानक पूर्ण होऊ लागेल. राजकारणात खूप फायदे मिळू शकतात. वैद्यकीय, खेळ, पोलिस विभाग इत्यादी क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बरेच फायदे मिळू शकतात. शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीतील समस्या संपू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अचानक पदोन्नती मिळू शकते. पगार वाढीसोबतच, पसंतीच्या ठिकाणी बदली होऊ शकते. परदेश प्रवासाची शक्यता आहे. कोणत्याही व्यवसायासाठी किंवा इतर कामासाठी कर्ज मिळू शकते. आईकडूनही लाभ मिळू शकतात.

तूळ: राहु-केतुचे गोचर शुभ मानले जात आहे. जास्त पैसे कमविण्याच्या शक्यता वाढू शकतात. इच्छा पूर्ण होऊ शकतात. लक्ष्य साध्य करण्यावर भर राहू शकेल. प्रेमसंबंधांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. अगदी लहानशी गोष्ट वादाचे कारण ठरू शकते. ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील. कामाच्या ठिकाणी वर्चस्व वाढेल. तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल.

धनु: अलीकडेच या राशीवर शनीचा ढिय्या प्रभाव सुरू झालेला आहे. असे असले तरी राहु-केतु गोचर लाभदायक ठरू शकते. घरात दीर्घकालीन वाद संपुष्टात येऊ शकतो. मानसिक शांतता लाभू शकेल. भौतिक सुख, सुविधा मिळू शकतात. गमावलेला सन्मान परत मिळवू शकता. अनेक ठिकाणी भरपूर नफा कमवू शकता.ज्ञान, बुद्धिमत्ता आणि शहाणपणा वाढू शकेल. योग्य निर्णय घेऊ शकाल. कुटुंबासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. यशाची पायऱ्या चढत राहाल. छायाचित्रकार, चित्रपट उद्योग, टीव्ही उद्योग, मॉडेलिंग क्षेत्र किंवा सोशल मीडिया किंवा कोणत्याही प्रकारच्या संवाद माध्यमाशी संबंधित असलेल्या लोकांसाठी येणारा काळ खूप अनुकूल असू शकेल.

मकर: अलीकडेच या राशीची साडेसाती संपली आहे. राहु-केतु गोचराचे फायदे मिळू शकतात. महत्त्वाकांक्षा अनेक पटींनी वाढू शकते. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. अधिकाधिक पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. शत्रूंचा पराभव होईल. आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. समाजात आदर वाढेल. उच्च पदांवर असलेल्या लोकांशी चांगले संबंध विकसित करू शकता. परदेशातून अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकेल. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो.

कुंभ: कारकिर्दीत यश मिळवू शकता. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे मिळू शकतात. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळू शकतात. आयुष्यात बऱ्याच काळापासून असलेल्या समस्या दूर होऊ शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. आर्थिक परिस्थिती सुधारत असताना, उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.