शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या व्यक्तींशी लग्न होणे हे 'लॉटरी' लागण्यासारखेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:38 IST

1 / 6
असे म्हणतात की लग्न ही केवळ दोन व्यक्तींची गाठ नसते, तर दोन नशिबांचा मिलाफ असतो. अनेकदा लग्नानंतर एखाद्या व्यक्तीचे नशीब अचानक चमकते, यालाच आपण 'जोडीदाराचे भाग्य लागणे' असे म्हणतो. अंकशास्त्रानुसार, काही खास तारखांना जन्मलेल्या व्यक्तींमध्ये अशी चुंबकीय ऊर्जा असते की, त्यांच्या पावलांनी जोडीदाराच्या आयुष्यात समृद्धी येते. चला जाणून घेऊया अशा भाग्यवान जन्मतारखांबद्दल:
2 / 6
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे, त्यांचा स्वामी सूर्य असतो. या तारखेचे लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि ऊर्जेने भरलेले असतात. या व्यक्तींशी लग्न केल्यानंतर जोडीदाराच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते. रखडलेली सरकारी कामे किंवा पदोन्नती लग्नानंतर वर्षभरातच मिळण्याची दाट शक्यता असते.
3 / 6
३ हा अंक गुरूचा (Jupiter) मानला जातो. गुरू हा विस्तार आणि भाग्याचा कारक आहे. ज्या व्यक्तींचा जन्म या तारखांना झाला आहे, त्या लग्नानंतर आपल्या जोडीदाराच्या आयुष्यात स्थैर्य आणतात. विशेषतः आर्थिक गुंतवणुकीत आणि व्यवसायात जोडीदाराला मोठे यश मिळते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जोडीदाराची आध्यात्मिक आणि बौद्धिक प्रगती होते.
4 / 6
अंकशास्त्रामध्ये ६ हा अंक शुक्राचा (Venus) मानला जातो. शुक्र हा सुख-सुविधा, वैभव आणि प्रेमाचा कारक आहे. या तारखेला जन्मलेले लोक जोडीदारासाठी 'लकी चार्म' ठरतात. लग्नानंतर वर्षभरातच घरात नवीन वाहन, प्रॉपर्टी किंवा ऐश्वर्याच्या वस्तूंची भर पडते. जोडीदाराचे उत्पन्न वाढण्यास या व्यक्तींची उपस्थिती कारणीभूत ठरते.
5 / 6
९ हा अंक मंगळाचा (Mars) असून या व्यक्ती अत्यंत कष्टाळू आणि धाडसी असतात. या तारखेच्या लोकांशी लग्न केल्यावर जोडीदाराचा आत्मविश्वास वाढतो. जे जोडीदार स्वभावाने थोडे कचखाऊ असतात, त्यांना या व्यक्तींच्या सहवासामुळे आयुष्यात मोठी जोखीम घेण्याचे बळ मिळते, ज्यातून मोठे यश संपादन करता येते.
6 / 6
नशीब आणि ग्रहमान महत्त्वाचे असले तरी, संसारात एकमेकांवरचा विश्वास आणि समंजसपणा हाच यशाचा खरा आधार असतो. ग्रहांची साथ आणि जोडीदाराचे प्रेम एकत्र आले की यशाची उंची गाठणे सोपे होते.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रrelationshipरिलेशनशिपmarriageलग्न