Numerology: ४ राजयोगांचा शुभ योग, ‘या’ ५ मूलांकाना वरदान काळ; अचानक धनलाभ, कल्याण होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:43 IST2025-06-23T15:32:05+5:302025-06-23T15:43:44+5:30

Numerology: या आगामी काळात अनेकविध प्रकारचे राजयोग जुळून येत आहेत. तुमचा मूलांक कोणता? कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

Numerology: जून महिन्याची सांगता होत आहे. या आगामी काळात ग्रहांच्या गोचरामुळे मालव्य राजयोग, धन राजयोग, गुरु आदित्य राजयोग, गजकेसरी योग असे विविध प्रकारचे शुभ मानले गेलेले योग जुळून आलेले आहेत. त्यामुळे हा आगामी काळ अनेकार्थाने सकारात्मक, अनुकूलता देणारा ठरू शकेल.

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.

ग्रहांच्या गोचरामुळे मूलांकांवर काय परिणाम होऊ शकेल? कोणत्या मूलांकांना उत्तम लाभ, सर्वोत्तम सकारात्मकता, सुवर्ण संधी, करिअर, नोकरी, व्यवसायात चांगला लाभ होऊ शकेल? जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. मन प्रसन्न होऊ शकेल. अडथळे दूर होऊन व्यवसायात प्रगती होऊ शकेल. नवीन मित्र होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती हळूहळू सुधारेल. भविष्याचा विचार करून गुंतवणूक करावी. जीवनात अनुकूलता येईल. सुख-समृद्धी मिळेल.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. सकारात्मक लाभ मिळू शकतील. ज्या गोष्टींची चिंता वाटत होती, त्यातून आता दिलासा मिळू शकेल. कौटुंबिक जीवनात आनंद येऊ शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाच्या परिस्थिती निर्माण होत आहेत.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. कठोर वाणी वापरू नये, अन्यथा समोरच्याचे मन दुखावले जाऊ शकते. नवीन गोष्टींची सुरुवात करण्यास अनुकूल काळ नाही. कुटुंबातील सदस्यांशी केलेली चर्चा उपयुक्त ठरू शकेल. मान-सन्मान वाढू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. समस्या, अडथळे दूर होऊन यश प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकेल. नियोजन करून कामे करणे उपयुक्त ठरू शकेल. अनावश्यक खर्च करणे टाळावे. एकत्रितपणे काम केले तर यश सहज मिळेल. आनंदाची बातमी मिळू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होऊ शकतात. नियोजन करून काम केल्यास कामात यश मिळू शकेल. मोकळेपणाने मते व्यक्त करणे शक्य होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी जलद निर्णय घेऊ नये. कोणतेही काम विचारपूर्वक केले तर ते चांगले होईल.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. कौटुंबिक नातेसंबंध मजबूत होऊ शकतात. बोलताना संयमित शब्दांचा वापर करावा. सुख-समृद्धीच्या शक्यता निर्माण होत आहेत. आर्थिक लाभाच्या परिस्थिती निर्माण होत आहेत. आनंददायक घटना घडू शकतात.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. काही आव्हाने समोर उभी राहू शकतील. शांतपणे त्यातून मार्ग काढणे शक्य होऊ शकेल. प्रेरणा मिळू शकेल. प्रामाणिकपणे काम करत राहणे हितावह ठरू शकेल. मान-सन्मान वाढू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. व्यापारात केलेले सौदे यशस्वी ठरू शकतात.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. गैरसमज टाळावेत. कुटुंबातील सदस्य मदतीसाठी पुढे येऊ शकतील. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभू शकेल. कार्यक्षेत्रात एक नवीन सुरुवात प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. सर्जनशील कार्य आनंददायी परिणाम देऊ शकतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. ज्या गोष्टींची चिंता करत असाल, त्यातून दिलासा मिळू शकेल. नवीन गोष्टी शिकू शकाल. नवीन कामाची सुरुवात करू शकाल. आर्थिक दृष्टिकोनातून, हा काळ अनुकूल असेल आणि आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.