बुधादित्य लक्ष्मी नारायण योग: ७ राशींची लॉटरी, गुंतवणुकीचा फायदा; इच्छापूर्तीचा शुभ काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 07:07 AM2024-04-02T07:07:07+5:302024-04-02T07:07:07+5:30

एप्रिलमध्ये दोन राजयोग जुळून येत असून, त्याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

एप्रिलचा महिना अनेकार्थाने विशेष आणि महत्त्वाचा मानला जात आहे. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध एप्रिल महिन्यात अस्तंगत होत असून, मेष राशीत वक्री होत आहे. तसेच वक्री चलनाने मीन राशीत प्रवेश करणार आहे. ०९ एप्रिल रोजी बुध मीन राशीत प्रवेश करेल. परंतु, बुध ग्रहाच्या मीन राशीतील प्रवेशाने दोन मोठे राजयोग जुळून येत आहेत.

मीन राशीत विद्यमान स्थितीत सूर्य, शुक्र आणि राहु विराजमान आहेत. बुधच्या प्रवेशानंतर सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य राजयोग तसेच लक्ष्मी नारायण राजयोग जुळून येणार आहे. सूर्य मीन राशीत असेपर्यंत बुधादित्य राजयोग असेल.

बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग अतिशय प्रभाव तसेच शुभ मानले जातात. या राजयोगांमुळे काही राशींना सकारात्मक परिणाम मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. या राजयोगाचा शिक्षण, करिअर, व्यवसाय, मिळकत या आघाड्यांवर कसा प्रभाव असू शकेल, जाणून घेऊया...

मेष: बुधादित्य, लक्ष्मी नारायण राजयोगामुळे एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये चांगले यश मिळू शकेल. अनेकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. परदेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळू शकेल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहू शकतील. कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करू शकाल.

वृषभ: लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोग फायदेशीर ठरू शकतात. गुंतवणुकीतून फायदा होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतील. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होऊ शकेल. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो.

सिंह: बुधादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग अनुकूल ठरू शकेल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता. व्यापारी वर्ग व्यवसाय वाढवू शकतो. कुटुंबातील सदस्यांकडूनही सहकार्य मिळेल. नियोजित योजना यशस्वी होतील.

कन्या: लक्ष्मी नारायण, बुधादित्य राजयोगाने उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. नवीन वाहन, दुकान, फ्लॅट किंवा जमीन खरेदी करायची असेल तर इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठेत वाढ होऊ शकेल. इतरांवर प्रभाव टाकू शकाल. नोकरी बदलायची आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकेल.

वृश्चिक: लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोगाने व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहन किंवा नवीन मालमत्ता खरेदी करू शकतात. उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे, त्यांची इच्छापूर्ती होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकेल. पद, प्रभाव वाढू शकेल.

मकर: लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोगाने धनसंचय करण्यात यशस्वी होऊ शकतील. व्यवसायाच्या क्षेत्रात नशिबाची साथ मिळाल्याने नवीन डावपेच यशस्वी होऊ शकतील. चांगला नफा मिळू शकेल. भावंडांसोबत तुमचे संबंध चांगले राहू शकतील. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडू शकतात.

मीन: लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राजयोगाने चांगले दिवस सुरू होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये चांगले यश मिळू शकेल. अनेकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. व्यापारी असाल तर चांगला नफा मिळू शकतो आणि नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.