Matsya Jayanti Vastu Tips: आज मत्स्यजयंतीनिमित्त घरी आणा मत्स्यमूर्ती आणि मिळवा अनेक लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:04 PM2024-04-11T12:04:16+5:302024-04-11T12:06:05+5:30

Matsya Jayanti Vastu Tips: आज मत्स्यजयंती. हैग्रीव नावाच्या असुराला मारण्यासाठी आणि वेदांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता. वास्तुशास्त्रात गाय, कुत्रा, पोपट, मांजर यांच्याप्रमाणेच माशांना देशील महत्त्व दिले आहे. याबाबतीत फेंगशुईने तर माशांचा संबंध आर्थिक परिस्थिती सुधारण्याशी जोडला आहे, कसा ते पहा...

फेंग शुई हे चीनचे वास्तुशास्त्र आहे. यामध्ये इमारतीच्या बांधकामाविषयी आणि इमारतीत ठेवलेल्या पवित्र वस्तूंची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. फेंग आणि शुईचा शाब्दिक अर्थ हवा आणि पाणी आहे. हे शास्त्र देखील आपल्यासारखेच पंच महाभूतांवर आधारित आहे. याच फेंगशुई टिप्स पैकी गोल्ड फिश घरात ठेवण्याचे फायदे जाणून घेऊ .

सोनेरी मासे दोन प्रकारे ठेवता येतात. एक त्याची मूर्ती आणि दुसरी मत्स्यालयात जिवंत असलेली सोनेरी मासे. दोन्हीमधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढली जाते.

गोल्डन फिशची सुंदर मूर्ती ठेवल्याने सौभाग्य वाढते. हे मासे बाजारात जोड्यांमध्ये उपलब्ध असतात. घराचे सौभाग्य वाढवण्यासाठी गोल्डफिश खूप मदत करतात.

घरात सोनेरी माशाची मूर्ती ठेवल्याने समृद्धी येते आणि संपत्ती वाढते. आर्थिक अडचणी कमी होतात.

गोल्डफिश घराच्या ड्रॉइंग रूमच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवता येते. हे आनंद, शांती आणि समृद्धी आणते.

घरात या माशाच्या उपस्थितीमुळे प्रगतीचे सर्व दरवाजे उघडले जातात आणि कामात कोणताही अडथळा येत नाही.