मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी: १० राशींवर बाप्पा प्रसन्न, धनलाभ योग; धनलक्ष्मी कृपा, आनंदी काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:46 IST2024-12-17T14:28:15+5:302024-12-17T14:46:45+5:30

Margashirsha Sankashti Chaturthi December 2024: मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थी कधी आहे? सन २०२४ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी कोणत्या राशींना शुभ-लाभ-फलदायी ठरू शकेल? जाणून घ्या...

Margashirsha Sankashti Chaturthi December 2024 Astrology: मराठी महिन्यातील शुभ आणि वैशिष्ट्यपूर्ण मानला गेलेला मार्गशीर्ष महिना सुरू आहे. या महिन्याचे महत्त्व आणि महात्म्य अनन्य साधारण असेच आहे. या महिन्यात अनेक शुभ फलदायी व्रतांचे आचरण केले जाते. दत्त जयंती मोठ्या उत्साहात देशभरात साजरी करण्यात आली. यानंतर आता संकष्ट चतुर्थी व्रत आचरले जाणार आहे.

१८ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. गणपती बाप्पाच्या सर्व व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्र स्वराशीत असणार आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी केले जाते. यात चंद्रोदयाला महत्त्वाचे मानले जाते. सन २०२४ मधील शेवटचे संकष्ट चतुर्थी व्रत आहे.

मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीला असलेले ग्रहमान काही राशींना सर्वोत्तम वरदायी ठरू शकते, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींवर बाप्पाची अपार कृपा होऊ शकते? धनलाभासह धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात? जाणून घेऊया...

मेष: मनात उत्साह राहील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण कराल. धनलक्ष्मीची कृपा राहील. शुभ फळे मिळतील. घरात मंगल कार्याचे आयोजन केले जाईल. नोकरीत महत्त्व वाढेल. मोठी संधी मिळेल. पगारवाढ व मानसन्मान मिळेल. मुलांची प्रगती होईल.

वृषभ: ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. काही तरी भव्यदिव्य करून दाखवण्याचे विचार मनात येतील. त्यानुसार योजना आखल्या जातील. आर्थिक प्रश्न सुटतील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीत अनुकूल बदल होतील.

मिथुन: काहींना धार्मिक कारणांसाठी प्रवास व खर्च करावा लागेल. एकंदरीत, हा काळ चांगला जाईल. अनुकूल परिणाम दिसून येतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. व्यवसायात भरभराट होईल. कामानिमित्त प्रवास घडून येईल.

कर्क: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. संयम बाळगण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सतर्क राहा. नियम मोडता कामा नये. चांगल्या बातम्या कानावर पडतील. अनेक अडचणी दूर होतील. मोठ्या उत्साहाने कामे कराल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. धनलाभ होईल.

सिंह: चांगल्या घटना घडतील. नोकरीत कामाचा ताण कमी राहील. अचानक मोठी संधी मिळेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. अचानक एखादी अडचण येऊ शकते. कागदोपत्री पूर्तता करताना चालढकल करू नका. वेळच्या वेळी कामे पूर्ण करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सतर्क राहा. परिस्थिती आटोक्यात येईल.

कन्या: भाग्याची चांगली साथ मिळेल. अनेक अडचणी दूर झाल्यामुळे मन मोकळे होईल. मनात सकारात्मक विचार राहतील. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. काहींना पुरस्कार जाहीर होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत अनुकूल बदल होतील, मोठी जबाबदारी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मित्र मित्र मैत्रिणींच्या भेटी होतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. भेटवस्तू मिळतील.

तूळ: लाभदायक ग्रहमानाचा अनुभव येईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. अनुकूल फळे मिळतील. समाजात मान वाढेल. काहींना पुरस्कार जाहीर होतील. काहींना मौजमजा करण्यासाठी प्रवास होतील. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. व्यवसायात अंदाज बरोबर ठरतील.

वृश्चिक: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी कराल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. मात्र त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतील. कामाचा ताण व्यवस्थितपणे हाताळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. भाग्याची चांगली साथ राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील, प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल.

धनु: महत्त्वाच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी अनुकूल परिस्थिती राहील. सहकारी, भागीदार यांची चांगली साथ राहील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. या काळात अतिआत्मविश्वास, अतिउत्साह नडू शकतो. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. भाग्याची साथ मिळेल.

मकर: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. भागीदारी व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. तरुणवर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू प्राप्त होतील. योजना गुप्त ठेवा. विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळेल अशी कामे करू नका. वाहने जपून चालवा. रहदारीचे नियम धाब्यावर बसवू नका. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रवास शक्यतो टाळा. खेळीमेळीचे वातावरण राहील.

कुंभ: योजनांना गती मिळेल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. बोलण्याला किंमत दिली जाईल. अडलेली कामे मार्गी लागतील. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. मुलांची प्रगती होईल. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील.

मीन: अनेक इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. त्यादृष्टीने ग्रहमान अनुकूल राहील. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. वरिष्ठांकडून प्रशस्तिपत्रक मिळू शकते. सहकारी वर्गाशी चांगले संबंध राहतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. पुरस्कार जाहीर होतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. मुलांची प्रगती सुखावून जाईल. नवीन ओळखी होतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.