Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:37 IST2025-05-21T13:34:50+5:302025-05-21T13:37:47+5:30
Mangal Gochar 2025: जून अजून सुरुही झाला नाही, पण ग्रहस्थिती सध्या अशी काही सुरु आहे, की अनेक राशींना त्याचे अशुभ परिणाम सहन करावे लागणार आहेत. ७ जून रोजी होणारे मंगळ गोचर(Mangal Gochar 2025) असेच तापदायी ठरू शकेल. अशा वेळी संकट येणार या विचाराने खचून न जाता अधिक सतर्क होणे केव्हाही चांगले, त्यासाठी ज्योतिषांनी मांडले आहे पुढील भाकीत!

येत्या ७ जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल. जिथे केतू आधीच उपस्थित असेल, तिथे सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती झाल्यामुळे कुंजकेतू योग निर्माण होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रात, मंगळ हा अग्नि तत्वाचा ग्रह मानला जातो आणि केतू हा अग्नि तत्वाचा ग्रह मानला जातो. मंगळ आणि केतुच्या एकत्र येण्यामुळे ५ राशींच्या जीवनात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. हा संघर्ष कुठल्या पातळीवर करावा लागेल ते पाहू आणि सतर्क होऊ!
वैदिक ज्योतिषशास्त्रात, मंगळ हा ग्रह शौर्य, धैर्य, शक्ती आणि उर्जेचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. तर केतू हा ग्रह मोक्ष, त्याग आणि अध्यात्माचा कारक मानला जातो. मंगळ हा देखील एक अग्निमय ग्रह आहे आणि केतू देखील आहे, म्हणून या दोघांचे एकत्र येणे पुढील पाच राशींच्या आरोग्य आणि आर्थिक स्थितीसाठी सतर्क करणारा आहे. स्वभावात आक्रमकता येणे, करिअर आणि कौटुंबिक जीवनात संघर्ष वाढणे आणि अन्य नुकसान कोणते होऊ शकते ते पाहू.
मेष :
तुमच्या कुंडलीच्या पाचव्या घरात मंगळ आणि केतूची युती होणार आहे. ही युती खूप तापदायी मानली जाते. अशा परिस्थितीत, उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेष राशीच्या लोकांना काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. याशिवाय, तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही गोष्टींबद्दल काळजी वाटू शकते. प्रेम जीवनात संतुलन राखण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागू शकतात. मंगळ आणि केतुच्या युतीमुळे, कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांकडून कमी पाठिंबा मिळू शकेल. काही काळ तुमची कामे रखडलेल्या स्थितीत असतील.
वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या चौथ्या घरात मंगळ आणि केतूची युती होणार आहे. अशा परिस्थितीत अनामिक भीती, अनाकलनीय त्रास होऊ शकतो. तसेच तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. या काळात तुम्ही आरोग्याबद्दल थोडे अधिक लक्ष द्यायला हवे. हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाही यादृष्टीनेही काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीबद्दलही काळजी राहील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये किंवा कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकू शकता. कोर्ट केसेस तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. तुम्हाला घर आणि जमिनीशी संबंधित वादांनाही सामोरे जावे लागू शकते. सतर्क राहणे चांगले.
कर्क :
तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात केतू आणि मंगळाचे भ्रमण होणार आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. या काळात तुमचे बोलणे खूप कठोर होऊ शकते. तसेच या काळात तुम्हाला सामाजिक पातळीवर खूप विचारपूर्वक वागण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आपली प्रतिमा ते पूर्णपणे डागाळली जाऊ शकते. या काळात खूप हुशारीने पैसे गुंतवा, अन्यथा तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन पुढे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
सिंह :
सिंह राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या पहिल्या घरात मंगळ आणि केतुची युती होणार आहे. या काळात तुम्ही अकारण आक्रमक व्हाल. या काळात तुमचे काही निर्णय चुकू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अपमान सहन करावा लागू शकतो. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल थोडी काळजी वाटू शकते. तसेच, वैवाहिक जीवनात वाढत्या तणावामुळे, तुमचे नाते पूर्णपणे बिघडू शकते, काडीमोड होण्याची परिस्थिती उद्भवू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपमान सहन करावा लागू शकतो. तुम्ही मौन पाळा. कोणतीही परिस्थिती शांतपणे हाताळणे तुम्हास लाभदायी ठरेल.
वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांच्या कुंडलीच्या दहाव्या घरात केतू आणि मंगळाची युती होणार आहे. ही स्थिती संघर्ष वाढवणारी आहे. मात्र, दहाव्या घरात मंगळ आणि केतूची युती संमिश्र परिणामही देते. संघर्षानंतर माणसाला यश मिळते. या काळात माणसांची पारख होईल. कठोर परिश्रम केले तर त्याचे गोड फळ देखील चाखता येईल. आळस, क्रोध आणि अज्ञानावर मात करा, वाईट काळ सरून जाण्यास मदत मिळेल.