By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:57 IST
1 / 127 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री आहे. संपूर्ण जगभरातील शिवभक्तांसाठी हा दिवस अतिशय खास मानला जातो. या दिवशी केलेली शिव उपासना, साधना, नामस्मरण पुण्य फलदायी मानले जाते. लाखो शिवभक्त शिव मंदिरात जाऊन जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात.2 / 12Shani Sade Sati 7 Mukhi Rudraksha Benefits: महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष धारण करणे अतिशय शुभ मानले जाते. योग्य सल्ला घेऊनच रुद्राक्ष धारण करावा, असे सांगितले जाते. रुद्राक्ष योग्य संस्कारित करूनच धारण करणे आवश्यक असते. 3 / 12या सर्व रुद्राक्षांपैकी असा एक रुद्राक्ष आहे, जो परिधान केल्यास शनि महाजांमुळे येणाऱ्या अडचणी, होणारा त्रास कमी होऊ शकतो. हा रुद्राक्ष धारण केल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. 4 / 12शनि ग्रहामुळे होणारा त्रास म्हणजे प्रत्येक गोष्टीत अडचण, प्रत्येक गोष्टीत समस्या, प्रत्येक गोष्टीत विलंब होतो, हातातोंडाशी आलेला घास निघून जातो. अडकून पडल्यासारखे वाटते. विनाकारण, आपला संबंध नसताना काही गोष्टी मागे लागतात, असे वाटत राहते. 5 / 12ज्या व्यक्तींची शनि महादशा, शनिची अंतर्दशा, शनि साडेसाती, शनिचा ढिय्या प्रभाव किंवा अडीचकी सुरू असलेल्या लोकांनी हा रुद्राक्ष धारण करणे अतिशय चांगले ठरू शकते. मग अशा लोकांची रास कोणतीही असो, स्त्री असो, पुरुष असो, लहान मुले असो, तरी हा रुद्राक्ष धारण करू शकता.6 / 12कोणत्याही शनिवारी हा रुद्राक्ष धारण करावा. हा रुद्राक्ष म्हणजे सात मुखी रुद्राक्ष आहे. सात मुखी रुद्राक्ष शनिवारच्या दिवशी सकाळी किंवा सायंकाळी गळ्यात धारण करावा. काळ्या धाग्यात किंवा सोन्या-चांदीच्या चेनमध्ये धारण करावा. असे केल्याने चांगला फायदा होऊ शकतो. परंतु, हा रुद्राक्ष संस्कारित केलेला असावा. 7 / 12असे मानले जाते की, ७ मुखी रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते, असे म्हटले जाते. सप्तमुखी रुद्राक्ष शनि ग्रहाच्या प्रभावाखाली असल्याचे मानले जाते. ७ मुखी रुद्राक्ष सूर्य, सप्तर्षि, कार्तिकेय, अनंग, म्हणजेच कामदेव, अनंत आणि नागराज आणि सात मातृकांना समर्पित असल्याचे म्हटले जाते. 8 / 12७ मुखी रुद्राक्ष धारण केल्याने करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो. ७ मुखी रुद्राक्ष शनि ग्रहाशी संबंधित मानले जाते. म्हणून, ज्या लोकांना शनि साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू आहे, त्यांनी ७ मुखी रुद्राक्ष धारण करावा.9 / 12ज्यांच्या कुंडलीत शनि स्थान किंवा स्थिती नकारात्मक आहे, ते ७ मुखी रुद्राक्ष धारण करू शकतात. विशेष म्हणजे योग्य सल्ल्यानुसारच कोणताही रुद्राक्ष धारण करावा. ७ मुखी रुद्राक्ष धारण करताना किंवा केल्यावर काही मंत्रांचा जप करणे अतिशय शुभ, पुण्याचे मानले जाते. हे मंत्र अतिशय प्रभावी असल्याचेही म्हटले जाते.10 / 12रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पंचामृत मिसळावे. नंतर या मिश्रणात रुद्राक्ष घालावा. यानंतर, १०८ वेळा ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे. ही सोपी पद्धत झाली. 11 / 12 परंतु, तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच रुद्राक्ष धारण करावा. काही लोकांना विशिष्ट पद्धतीनेच, विशिष्ट वेळीच रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला काही वेळा दिला जातो.12 / 12- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.