महाशिवरात्री: ‘या’ ३ मूलांकांना वरदान काळ, धनलाभाचे योग; दुपटीने लाभ, सुख-समृद्धी-भरभराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:24 IST2025-02-24T12:12:44+5:302025-02-24T12:24:58+5:30
Mahashivratri 2025 Numerology: तुमचा मूलांक कोणता? महाशिवरात्रीला कोणत्या मूलांकावर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

Numerology Mahashivratri 2025: २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला निशीथकाल २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजून २७ मिनिटांपासून ते ०१ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल. महाशिवरात्रीला शिवतत्त्व सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर असते. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व कैक पटीने वाढते, असे मानतात. ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास या महाशिवरात्रीला अद्भूत असे योग जुळून येत आहेत.
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.
महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य, शनि आणि बुध या तीन ग्रहांचा कुंभ राशीत त्रिग्रही योग, राहु मीन राशीत, तसेच शुक्रही मीन राशीत आहे. मीन ही शुक्राची उच्च रास मानली जाते. गुरु ग्रह वृषभ राशीत आहे. मंगळ मिथुन राशीत आहे. केतु कन्या राशीत आहे. ग्रहस्थितीचा मूलांकांवरही विशेष प्रभाव पडत असतो, असे म्हटले जाते. महाशिवरात्रीला असलेल्या ग्रहस्थितीचा कोणत्या मूलांकावर कसा प्रभाव पडू शकेल? जाणून घेऊया..
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. मेहनतीचे फळ मिळेल. कामात यश मिळेल. कोणतेही काम अपूर्ण असेल तर ते आता पूर्ण होण्यास सुरुवात होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी चांगल्या संधी येऊ शकतात. या काळात आत्मविश्वास वाढेल. स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने अधिक दृढतेने वाटचाल करण्यास मदत करेल. भगवान शिवाच्या आशीर्वादाने करिअर आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल.
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. चंद्र हा भगवान शिवाचा सर्वांत प्रिय ग्रह मानला जातो. अशा परिस्थितीत, या वर्षीची महाशिवरात्री नवीन मार्ग उघडू शकते. कोणतेही ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर आता त्याचा मार्ग स्पष्ट दिसेल. नवीन उर्जेने भरलेले असाल, योग्य निर्णय घेऊ शकाल. इच्छित यश मिळवाल. या काळात मानसिक शांतता मिळू शकेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. पैशाच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. कामात अस्वस्थता राहील. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आतला आवाज ऐकून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. नशिबाची साथ मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळेल. भविष्यासाठी नवीन योजना बनवाल. आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. गुंतवणूक पद्धतींमध्ये बदल केल्यास फायदा मिळू शकेल. नवीन घर खरेदी करण्याचा विचार करू शकता. कारकिर्दीत प्रगतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. आनंददायी अनुभव येतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. कामात अडचणी येऊ शकतात. फसवणुकीपासूनही सावध रहा. पैशाचे व्यवहार ठीक राहतील. तरीही मन थोडे दुःखी असू शकते. कालांतराने परिस्थिती हळूहळू सुधारेल. पुन्हा जीवनात शांतता लाभू शकेल. जोडीदारामध्ये प्रेम वाढेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. पैसे येतील. कामाच्या ठिकाणी भावनिक निर्णय घेतल्याने नुकसान होऊ शकते. निराशा होईल. सकारात्मक विचार केल्यास चांगले परिणाम मिळतील. नवीन नातेसंबंधाने आयुष्यात शांतता लाभू शकेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. नशिबाची साथ लाभू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग खुले होतील. प्रकल्पांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक संधी मिळतील. पैशाच्या बाबतीतही वेळ चांगली ठरू शकेल. अचानक आर्थिक धनलाभ होऊ शकतो. कोणीतरी आर्थिक मदत करू शकेल. जीवनात हळूहळू सुधारणा होईल. प्रगती निश्चित होऊ शकेल.
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. शनि स्वतः शिवभक्त आहे. महाशिवरात्री खूप शुभ ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नती मिळू शकते. काम करण्याच्या पद्धतीत बदल होईल. भविष्यात हे खूप फायदेशीर ठरेल. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सकारात्मक बदल जाणवतील.
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकेल. आर्थिक लाभ होऊ शकतील. कामात प्रगतीचा आलेख काहीसा धीमा राहू शकेल. निकाल अपेक्षेपेक्षा कमी असू शकतात. प्रेम जीवन चांगले राहील. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.