शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

श्रावणी शनिवार: हनुमंत होतील प्रसन्न, शनी करेल कृपा; ५ राशींना लाभच लाभ, सुख-समृद्धी काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 7:07 AM

1 / 9
निज श्रावण महिन्याची सांगता होत आहे. श्रावण महिन्यातील व्रत-वैकल्ये, सण-उत्सव अगती उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. श्रावणातील शेवटचा शनिवार, ०९ सप्टेंबर २०२३ रोजी आहे. या दिवशी अश्वत्थ मारुती पूजन केले जाते. शनिवारी हनुमंतांचे पूजन करण्याची परंपरा आहे.
2 / 9
शनिवार हा नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रहाला समर्पित असल्याचे सांगितले जाते. शनी साडेसाती, ढिय्या किंवा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी शनी मंत्र, उपासना, नामस्मरण केले जाते, तसे हनुमांचे पूजन, नामस्मरण आणि स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण केले जाते. शनी आणि हनुमंतांची सेवा अतिशय उपयुक्त ठरू शकते.
3 / 9
शनिवार, ०९ सप्टेंबर रोजी चंद्र मिथुन राशीत असेल. तर, पुनर्वसू नक्षत्र असे. पुनर्वसु नक्षत्राचा स्वामी गुरु ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात पुनर्वसु नक्षत्र अत्यंत शुभ मानले जाते. ग्रह आणि नक्षत्रांच्या शुभ प्रभावामुळे शेवटचा श्रावणी शनिवार पाच राशींसाठी खूप शुभ असणार आहे.
4 / 9
या राशींना कुटुंब आणि प्रियजनांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. काही ज्योतिषीय उपाय सांगितले गेले आहेत, ते करून पाहिल्यास कुंडलीतील शनीची स्थिती मजबूत होईल आणि आशीर्वादही प्राप्त होतील, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
5 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना शेवटचा श्रावणी शनिवार शुभ ठरू शकेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर राहील. जुनी रखडलेली कामे पुन्हा सुरू करण्याची संधी व्यावसायिकांना मिळेल. व्यवसायात चांगली वाढ होईल. धनलाभाचे योग निर्माण होतील. प्रेमात असलेल्यांसाठी दिवस शुभ राहील. नाते मजबूत होईल. भाग्यवृद्धीसाठी शमीच्या झाडापाशी तिन्हीसांजेला दिवा लावावा.
6 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना शेवटचा श्रावणी शनिवार अनुकूल ठरू शकेल. एकाग्रतेने काम करण्याची संधी मिळेल. अधिक चांगली कामगिरी करू शकतील. नोकरदार उत्पन्न वाढण्यासाठी नोकरी बदलण्यावर विचार करू शकतात. कौटुंबिक जीवन चांगले राहील. पालकांची सेवा करण्याची संधी मिळेल. नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे अडकलेला पैसाही मिळू शकतो. भगवान शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शक्य असेल तर, 'ॐ शनिश्चराय नमः' या मंत्राचा तीन माळा जप करावा.
7 / 9
धनु राशीच्या व्यक्तींना शेवटचा श्रावणी शनिवार सुखद ठरू शकेल. परदेशात जाण्याची इच्छा असल्यास, सकारात्मक वार्ता समजू शकेल. घरातील गरजांकडे लक्ष द्याल. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीच्या घरी जाण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकेल. मानसिक शांततेसाठी शनी तसेच हनुमंतांचे स्तोत्र पठण करावे. नामस्मरण करावे.
8 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना शेवटचा श्रावणी शनिवार लाभदायक ठरू शकेल. मकर राशीची साडेसाती सुरू असून, राशी स्वामी शनिदेवाची कृपा असेल. इतरांच्या मदतीसाठी पुढे येऊ शकतील. समाजात चांगली प्रतिमा निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. प्रभाव आणि स्थान वाढेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. परदेशात जाण्याची इच्छा आगामी काळात पूर्ण होऊ शकेल.शनी दोषमुक्तीसाठी शनीदेवाचे नामस्मरण, मंत्र-जप, स्तोत्र पठण किंवा श्रवण करावे.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना शेवटचा श्रावणी शनिवार शुभ फलदायी ठरू शकेल. कुभ राशीची साडेसाती सुरू आहे. राशी स्वामी शनी कृपा करेल. जे काम करायचे होते आणि ते रखडले होते, तर ते काम करण्याची संधी मिळेल. त्यात यश मिळू शकेल. व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत काही मालमत्तेची खरेदी करण्याच्या योजनेवर विचार-विनिमय करू शकता. शनी संबंधित गोष्टींचे दान करणे हिताचे ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य