शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी नारायण योगात माघ संकष्ट चतुर्थी २०२६: १० राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा-लाभ; शुभं भवतू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:48 IST

1 / 15
Magh Sankashti Chaturthi February 2026: मराठी वर्षातील माघ महिना सुरू आहे. माघ महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी गुरुवार, ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी येत आहे. माघ शुद्ध चतुर्थीला श्रीगणेश जयंती साजरी केल्यानंतर वद्य पक्षात येणारी संकष्ट चतुर्थी विशेष मानली जाते.
2 / 15
Sankashti Chaturthi February 2026: माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. कुंभ राशीत राहु विराजमान असून, बुध आणि शुक्र यांचा प्रवेश होत आहे. यामुळे त्रिग्रही योग जुळून येत आहे. तसेच लक्ष्मी नारायण नामक शुभ योग जुळून येत आहे.
3 / 15
गुरुवारी संकष्ट चतुर्थी आल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या दिवशी गणपती, लक्ष्मी देवी, स्वामी, दत्तगुरू यांचे शुभाशिर्वाद मिळण्याची सुवर्ण संधी आहे. या शुभ योगातील संकष्ट चतुर्थीचा काळ कोणत्या राशींसाठी अतिशय चांगला, लाभदायक, पुण्य फलदायी ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: आनंदाची बातमी मिळेल. उत्साहवर्धक वातावरणात राहू शकेल. घराच्या सजावटीवर विशेष लक्ष द्याल. आकर्षक वस्तूंची खरेदी होईल. नोकरीत कामाची दखल घेतली जाईल. महत्त्व अधोरेखित होईल. एखादी चांगली संधी चालून येईल. प्रवासाचे नियोजन यशस्वी ठरेल. मन प्रसन्न राहील. नवीन गोष्टी शिकण्याची आवड वाढेल. कल्पक विचारांना चालना मिळेल. मात्र, काही अडथळे जाणवू शकतात.
5 / 15
वृषभ: लाभदायक काळ राहील. ग्रहमान बाजूने असू शकेल. व्यावसायिक करार व व्यवहार मार्गी लागतील. मात्र, मोठ्या आर्थिक गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. एखाद्या उलाढालीतून चांगला आर्थिक फायदा होईल. भावंडांशी भेटीगाठी होतील. घरात आनंदी व खेळीमेळीचे वातावरण राहील, घर किंवा जमिनीसंदर्भात व्यवहार होतील. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तूंची खरेदी होईल. मुलांच्या बाबतीत अधिक काळजी घ्या. प्रवासात सतर्कता आवश्यक आहे.
6 / 15
मिथुन: आर्थिक उन्नतीचे संकेत मिळू शकतील. कल्पना व योजना लोकांना भावतील. मदतीसाठी अनेक जण पुढे येतील. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. आवडत्या भोजनाचा आनंद घ्याल. एखाद्या समारंभात सहभाग घ्याल. रखडलेले काम अचानक पूर्ण होईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नाव चर्चेत येईल. सोयी-सुविधामध्ये वाढ होईल. घराच्या सजावटीवर विशेष लक्ष द्याल. जवळच्या ठिकाणी सहलीचा योग येईल.
7 / 15
कर्क: सर्जनशीलतेला चालना मिळू शेकल. पूर्वीच्या अडचणी दूर झाल्याने मन हलके राहील. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. मनात नावीन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना आकार घेतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. जीवनसाथीशी नाते अधिक मधुर होईल. चंद्र भ्रमणामुळे सकारात्मक अनुभव येतील. आर्थिक लाभ समाधानकारक राहील. जीवनसाथीचा उत्तम पाठिंबा लाभेल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेण्याचा योग आहे.
8 / 15
सिंह: मिश्र अनुभवांचा काळ आहे. काही कटू, तर काही गोड अनुभव येतील. कामाचा ताण जाणवेल. प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणालाही सहज आश्वासने देऊ नका. अनावश्यक खर्च टाळा. मात्र परिस्थिती अनुकूल होऊ लागेल. अडचणी दूर होतील व मन प्रसन्न राहील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. तरुण वर्गाला प्रेमात सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
9 / 15
कन्या: सहकाऱ्यांची साथ लाभेल. शुभ संकेत मिळू शकतील. लाभाचे प्रमाण वाढत जाईल. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होतील. लोकांचे आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. चंद्र व्यय स्थानात असल्याने घाईघाईने निर्णय घेऊ नका. कायदेशीर बाबींचे काटेकोर पालन करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामाचा ताण कमी होईल.
10 / 15
तूळ: धनलक्ष्मीची कृपा राहील. अनेक सकारात्मक अनुभव येतील. नोकरीत मोठी संधी मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे महत्त्व वाढेल. पगारवाढ व सुविधा मिळू शकतात. विविध प्रकारचे लाभ होतील. भेटवस्तू प्राप्त होतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होईल. त्यानिमित्त पाहुणे मंडळी येतील. बोलण्यात संयम ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. प्रवासात व अनोळखी लोकांबाबत सावध राहा.
11 / 15
वृश्चिक: यश व सन्मान मिळेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. आत्मविश्वास वाढलेला राहील. मोठ्या योजना यशस्वीपणे आकार घेतील. पर्यटनाचा आनंद घेता येईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. कार्याचे कौतुक होईल. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. काहींना पुरस्कार जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल आहे. नोकरीत नवीन संधी मिळेल. घरात आनंदी व खेळीमेळीचे वातावरण राहील. आर्थिक आवक समाधानकारक राहील.
12 / 15
धनु: आनंदाची वार्ता मिळेल. परिस्थिती अधिक अनुकूल होत जाईल. काही अडथळे जाणवू शकतात. कामाच्या व्यापामुळे धावपळ होईल. अनावश्यक दगदग होईल, अशी कामे टाळावीत. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. अचानक धनलाभाचा योगही संभवतो. भाग्याची साथ मिळेल. एखादी आनंददायी बातमी मिळेल. सामाजिक किंवा कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. भेटीगाठी लाभदायक ठरतील.
13 / 15
मकर: लाभदायक घडामोडी घडू शकतील. व्यवसायात प्रगतीचे संकेत मिळतील. उत्साह आणि सकारात्मकता राहील. मोठ्या प्रकल्पांना सुरुवात कराल. नावीन्यपूर्ण कल्पनांना आकार मिळेल. विवाहेच्छूना अनुकूल काळ असून चांगल्या स्थळांचे प्रस्ताव येतील. भेटवस्तू व विविध लाभ प्राप्त होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. परंतु, सावध राहणे आवश्यक आहे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. सुवार्ता कळेल.
14 / 15
कुंभ: समतोल राखणे आवश्यक आहे. संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. विरोधकांच्या बाबतीत सतर्कता बाळगा. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळणे हितावह ठरेल. योजनांबाबत गोपनीयता राखा. परिस्थिती अनुकूल राहील. आर्थिक आवक समाधानकारक राहील. व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील. शुभ फळे मिळतील. वाहनाचा वेग नियंत्रित ठेवा. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचल्यास मनाला दिशा मिळेल.
15 / 15
मीन: विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आणणारा काळ ठरू शकेल. ग्रहमान अनुकूल असले तरी निष्काळजीपणा टाळावा. चंद्र भ्रमणामुळे शुभ फळे मिळतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक आहे. महत्त्वाचे संदेश किंवा निरोप मिळतील. मुलांची प्रगती होईल व त्यांचे कौतुक होईल. संयम बाळगणे आवश्यक आहे. आपल्या योजना गुप्त ठेवा. लाभाचे योग निर्माण होतील. आत्मविश्वास वाढेल.
टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यganpatiगणपती 2025Ganpati Festivalगणपती उत्सव २०२५Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीspiritualअध्यात्मिक