शुभ योग! ‘या’ ९ राशींना धनलाभाच्या संधी, कार्यक्षेत्रात प्रगती; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 15:13 IST2023-02-19T15:05:31+5:302023-02-19T15:13:51+5:30

५ ग्रहांची शुभ स्थिती आर्थिक आघाडी, करिअरदृष्ट्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या, डिटेल्स...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहातील काही ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करीत असतात. ग्रहांच्या या गोचराने अनेकविध प्रकारचे शुभ योग, प्रतिकूल योग, राजयोग तयार होत असतात. या योगांचा तसेच ग्रहांच्या गोचराचा प्रभाव जरा सर्व राशींवर पडतो, असे सांगितले जाते.

या कालावधीत बुध, सूर्य आणि शनी कुंभ राशीत असून, यामुळे अनेक शुभ राजयोग जुळून येत आहेत. तसेच शुक्र आपल्या उच्च राशीत मीन राशीत असून, गुरुशी युतीत आहे. शुक्र आणि गुरुच्या युतीनेही काही शुभ राजयोग जुळून येत आहे.

एकंदरीत ग्रहांच्या स्थितीचा आणि जुळून येत असलेल्या राजयोगांचा आर्थिक आघाडी, करिअर, कार्यक्षेत्र, नोकरी, व्यापाराच्या दृष्टिने तुमच्यावरील प्रभाव कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना यश, प्रगतीच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील? ते जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना आगामी काळ शुभ ठरू शकेल. आर्थिक लाभाची स्थिती राहील. धनवृद्धीचे अनेक योग जुळून येऊ शकतील. कामाच्या ठिकाणी एकटेपणा वाटू शकतो. योग्य लक्ष मिळत नाही, अशी भावना होऊ शकते. प्रवासातून शुभ संदेश प्राप्त होऊ शकतील. प्रवास यशस्वी होऊ शकतील.

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ यशकारक ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. काही सकारात्मक बातम्या मिळू शकतात. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा खर्च जास्त होईल. लांबचे प्रवास पुढे ढकलल्यास चांगले होईल. काही धार्मिक कार्यात व्यस्त होऊ शकता.

मिथुन राशीच्या व्यक्तींना हा काळ प्रगतीकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. प्रकल्प यशस्वी होतील. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊ शकता. भागीदारीत केलेले प्रकल्प विशेष यश मिळवून देतील. आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. संपत्ती वाढण्याच्या अनेक संधी मिळू शकतील. प्रवासातून शुभ यश मिळू शकेल. सुख-समृद्धीचे शुभ योग जुळून येऊ शकतील.

कर्क राशीच्या व्यक्तींना हा काळ लकी ठरू शकतो. प्रवासातून विशेष यश प्राप्त होईल. इच्छेनुसार प्रवासात शुभ संयोग घडतील. कामाच्या ठिकाणी अहंकार टाळा. अन्यथा त्रास वाढू शकतो. खर्च जास्त होऊ शकतो. काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

सिंह राशीच्या व्यक्तींना आगामी काळ कामाच्या दृष्टीने चांगला राहील. कार्यक्षेत्रात वाढ होईल. प्रकल्प वेळेवर यशस्वी होतील. प्रवासात एखाद्याशी मैत्री होऊ शकते, ज्याच्या मदतीने भविष्यात यश मिळू शकते. आर्थिक लाभासाठी शुभ परिस्थिती निर्माण होऊ शकेल. मनाने निर्णय घेतल्यास फायदा होईल.

कन्या राशीच्या व्यक्तींना आगामी काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकेल. आर्थिक बाबतीत दिलासादायक घटना घडू शकतील. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी मतभेद वाढू शकतात. संयम ठेवून निर्णय घेणे हिताचे ठरू शकेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळू शकेल. कुटुंबाच्या सहवासात आनंद आणि समृद्धी मिळेल. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादविवाद टाळा. अन्यथा त्रास वाढतील. आर्थिक बाबतीत पैसे मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. प्रवासातून सामान्य यश मिळेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ चांगला ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक बाबतीतही शुभ संयोग घडत असून धनलाभ होईल. सर्जनशील प्रकल्पांद्वारे संपत्ती वाढवण्याच्या चांगल्या संधी असतील.मन प्रसन्न राहील. प्रवासातून शुभ परिणाम मिळू शकतील.

धनु राशीच्या व्यक्तींना हा काळ भाग्यशाली ठरू शकेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. व्यवसायात फायदा होऊ शकेल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्यामुळे समस्या वाढू शकतात. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. मन प्रसन्न राहील. प्रवासातून शुभ परिणाम मिळू शकतील.

मकर राशीच्या व्यक्तींना आगामी काळ चांगला ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी शुभ परिस्थिती निर्माण होऊ शकेल. प्रवास शुभ परिणाम देऊ शकतील. निष्काळजीपणा करु नये. अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. आर्थिक लाभाची अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकेल. भागीदारीतील गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळू शकतील.

कुंभ राशीच्या व्यक्तींना हा काळ उत्तम राहील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबींसाठी शुभ काळ असून धनलाभ होऊ शकेल. धनवृद्धीची चांगली बातमी मिळू शकते.

मीन राशीच्या व्यक्तींना हा काळ अनुकूल ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी उत्तम परिस्थिती असेल. प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात उत्कृष्ट परिणाम दिसून येतील. आर्थिक बाबींसाठी हा काळ संमिश्र ठरू शकेल. समतोल साधून पुढे गेल्यास अधिक यश मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.