Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:02 IST2025-07-14T15:59:27+5:302025-07-14T16:02:13+5:30

Karka Sankranti 2025 : १६ जुलै रोजी सूर्य देव मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करणार आहे, तिलाच कर्क संक्रांती(Karka Sankranti 2025) म्हटले जाईल. त्यामुळे पुढील पाच राशींच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. सूर्याचे हे संक्रमण पुढील राशींचे आयुष्य उजळून टाकतील असे ज्योतिष शास्त्राचे संकेत आहेत.

शास्त्रांनुसार, सूर्य आणि चंद्र हे असे देव आहेत जे थेट पृथ्वीवरून दिसतात. सूर्य देव दर महिन्याला आपली राशी बदलतात आणि या बदलाचा परिणाम सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. असे मानले जाते की सूर्याच्या कृपेने व्यक्तीचे भाग्य जागृत होऊ शकते.सूर्यदेव आता कर्क राशीत प्रवेश करणार आहेत, त्याचा प्रभाव पुढील राशींवर कसा पडणार आहे ते जाणून घेऊ.

मिथुन : कर्क राशीत सूर्याचे प्रवेश मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले करतील. परदेश प्रवासाची शक्यता आहे आणि प्रलंबित कागदपत्रे किंवा व्हिसाशी संबंधित कामे आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. कामाच्या ठिकाणीही प्रगतीची चिन्हे आहेत.

कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर ठरू शकते. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढीची दाट शक्यता आहे. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात होते त्यांना यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांकडूनही तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.

धनु : या राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण खूप शुभ संकेत देत आहे. ज्यांना शत्रूंनी त्रास दिला होता त्यांना आता आराम मिळू शकतो. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित वाद संपू शकतात आणि घरात काही शुभ कार्य देखील पूर्ण होऊ शकतात. मूल होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांनाही काही चांगली बातमी मिळू शकते.

धनु : या राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण खूप शुभ संकेत देत आहे. ज्यांना शत्रूंनी त्रास दिला होता त्यांना आता आराम मिळू शकतो. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित वाद संपू शकतात आणि घरात काही शुभ कार्य देखील पूर्ण होऊ शकतात. मूल होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांनाही काही चांगली बातमी मिळू शकते.

मकर : सूर्याचे हे संक्रमण मकर राशीसाठी आनंदाचे द्योतक ठरणार आहे. आर्थिक वृद्धीसह सुदृढ आरोग्य देखील प्राप्त होईल. मुलांची काळजी मिटेल, विवाहेच्छूकांचे विवाह ठरतील. करिअरमध्ये कष्ट केल्याने असाध्य गोष्टीही सहज साध्य करता येतील.