गुरु गोचर: ५ राशींवर अपार गुरुकृपा, सुख-समृद्धीचा लाभ; पद-पैसा वाढेल, १२ वर्षांनी शुभ योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 10:30 AM2024-04-18T10:30:31+5:302024-04-18T10:41:19+5:30

२०२४ मध्ये गुरु ग्रह राशीपरिवर्तन करणार असून, ५ राशींना विशेष लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये गुरु ग्रहाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. गुरुलाच बृहस्पति म्हटले जाते. बृहस्पति हा नवग्रहांचा गुरु मानला जातो. सन २०२४ मध्ये गुरु राशीपरिवर्तन करत आहे. गुरुचे राशीपरिवर्तन महत्त्वाचे मानले जाते. गुरुच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव केवळ राशीचक्र नाही, तर देश-दुनियेवर पाहायला मिळू शकतो, अशी मान्यता आहे.

विद्यमान स्थितीत गुरु ग्रह मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत विराजमान आहे. ०१ मे रोजी गुरु ग्रह शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरु ग्रह सुमारे वर्षभर एका राशीत असतो. ०६ मे रोजी गुरु अस्तंगत होणार आहे. तर १२ जून रोजी गुरु रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल, असे सांगितले जात आहे. ०९ ऑक्टोबर रोजी गुरु ग्रह वक्री होणार आहे.

गुरु ग्रहाच्या गोचराचा सर्व १२ राशींवर प्रभाव आणि परिणाम पाहायला मिळू शकतो. मात्र, ५ राशींवर गुरुचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे. गुरुकृपा लाभू शकेल, अशा ५ लकी राशी कोणत्या? जाणून घेऊया...

मेष: गुरु गोचर एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कामात चांगले यश मिळू शकेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. आनंद मिळेल. चांगली बातमी मिळू शकते. करिअरमध्ये यश मिळेल. नोकरदारांसाठी येणारा काळ चांगला ठरू शकेल. अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकेल. गुंतवणुकीतून नफा होईल. भौतिक सुविधा वाढू शकतील. बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल.

वृषभ: सकारात्मक परिणाम मिळू शकतो. अचानक लाभाच्या संधी वाढवण्याचे संकेत देते. अनेक ठिकाणाहून आर्थिक लाभ मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. धार्मिक कार्यात रस राहील. नोकरीच्या ठिकाणी मोठा सन्मान मिळू शकतो.

कर्क: लाभाच्या संधी प्राप्त होऊ शकतील. नशिबाची चांगली साथ मिळू शकेल. सर्व प्रकारच्या कामात यश मिळू शकेल. सर्व प्रकारच्या भौतिक इच्छा पूर्ण होऊ शकतील. कामात येणारे अडथळे दूर होतील. आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. कुटुंबातील सदस्यांचे चांगले सहकार्य मिळू शकेल. सर्वांचा विश्वास कायम राहील. व्यापारात नफा होऊ शकेल. करिअरमध्ये यश, प्रगतीची संधी मिळू शकेल.

सिंह: विशेष शुभ परिणाम मिळू शकतात. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी काळ फायदेशीर ठरू शकेल. चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. विरोधक नुकसान करण्यात अयशस्वी ठरतील. संशोधनाशी संबंधित असलेल्यांना कालावधी चांगला ठरू शकेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना यश मिळू शकते. गुरूच्या प्रभावामुळे वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत.

कन्या: भाग्याची साथ मिळू शकेल. सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतील. रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकेल. अडकलेले पैसे परत मिळतील. जमीन आणि वाहन खरेदी करायचे असेल तर, इच्छा पूर्ण होईल. गुरूच्या प्रभावामुळे कामात यश मिळेल. विवाहेच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.