१२ वर्षांनी गुरु-रवि युती, ७ राशींची ३० दिवस चांदीच चांदी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 10:09 IST2025-06-04T10:00:14+5:302025-06-04T10:09:21+5:30

बुध स्वामी असलेल्या मिथुन राशीत अतिशय प्रभावी आणि शुभ मानला गेलेला गुरु आदित्य राजयोग जुळून येत आहे. कोणत्या राशींना महिनाभर लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरुच्या युतीमुळे गुरु आदित्य राजयोग तयार होतो. या योगामुळे लोक बौद्धिकदृष्ट्या खूप मजबूत होऊ शकतात. असे लोक त्यांच्या जवळच्या लोकांचे भले करतात. त्यांचे बोलणे गोड असते. शिक्षण क्षेत्रात अनेकदा चांगले परिणाम मिळतात. समाजात खूप प्रसिद्धी मिळते. खूप मेहनती आणि कष्टाळू असतात. असे लोक कठोर परिश्रमाने श्रीमंत होऊ शकता.

मे महिन्यात गुरु ग्रह राशीपरिवर्तन करून मिथुन राशीत विराजमान झाला आहे. तर आता जून महिन्यात सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे संक्रमण मिथुन संक्रांती नावाने ओळखले जाईल. सुमारे एक महिना सूर्य मिथुन राशीत असेल. त्यामुळे गुरु आणि सूर्याचा गुरु आदित्य राजयोग महिनाभर असणार आहे.

१५ जून २०२५ रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे या कालावधीत बुधही याच राशीत असणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे मिथुन राशीत गुरु, सूर्य आणि बुधाचा त्रिग्रही योगही जुळून येत आहे. हा कालावधी कोणत्या राशींना सर्वोत्तम सुखाचा, धनलाभाचा, यश-प्रगतीचा, समृद्धी वैभवाचा, भरघोस भरभराट होण्याचा ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

वृषभ: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, बऱ्याच काळापासून एखाद्या योजनेवर काम करत असाल तर आता सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. तुमच्या वक्तृत्वाने लोक प्रभावित होतील. तसेच व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येऊ शकेल. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर बड्या कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन: नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करत असाल तर गुंतवणूक आणि भागीदारीसाठी हा काळ शुभ मानला जातो. कौटुंबिक जीवनातही आनंद, शांतता आणि सहकार्य राहू शकेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कामांना आता गती मिळेल आणि नवीन संधी निर्माण होतील. आर्थिक स्थिती सुधारू शकेल.

कर्क: हा योग फायदेशीर ठरू शकेल. करिअरमध्ये नवीन कामगिरीचे संकेत आहेत. परदेशात जाण्याचा किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल राहील. विशेषतः कला, माध्यम किंवा व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित लोकांना प्रसिद्धी आणि लाभ मिळू शकतील. गुंतवणुकीत नफा होईल. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल.

सिंह: उत्पन्नात वाढ होऊ शकते. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. सामाजिक पातळीवर कीर्ति वाढेल. मुलांच्या संदर्भात चांगली बातमी मिळू शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ चांगला आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास किंवा परदेशातून नफा मिळण्याची शक्यता आहे. इच्छा पूर्ण होऊ शकतील.

कन्या: काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. मोठे ध्येय साध्य करण्यासाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी हा उत्तम काळ आहे. घाईघाईत मोठी गुंतवणूक करणे टाळावे. व्यावसायिकांना चांगले पैसे मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. काम बऱ्याच काळापासून अडकले होते त्यांना आता गती मिळू शकेल. नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरू शकतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. सुख, सोयी, सुविधा वाढू शकतील.

कुंभ: मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थी चांगली कामगिरी करू शकतील. ज्ञानामुळे चांगले नाव आणि प्रसिद्धी मिळवू शकता. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणारे लोक प्रगती करू शकतात. प्रेम संबंधांमध्ये यश मिळू शकते. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मुलांची प्रगती होऊ शकते. करिअरमध्ये अनपेक्षित प्रगती होण्याची शक्यता आहे.

मीन: सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. कुटुंबात सुख-शांतता स्थापित होऊ शकेल. पैशाच्या गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वी होतील. संपत्तीत वाढ होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो. सरकारी कामात यश आणि पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. पैसे मिळू शकतात. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल. वाहन, मालमत्तेचे सुख मिळू शकते. कामाच्या ठिकाणी प्रशंसा, पदोन्नती किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.