Mahashivratri 2026: आशियातील सर्वात उंच शिवमंदिर, दगडांमधून येतो डमरुचा आवाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 09:16 IST2026-02-15T09:11:22+5:302026-02-15T09:16:09+5:30
Asia Tallest Shiva Temple: आशियातील सर्वात उंच शिव मंदिर हिमाचल प्रदेशातील सोलन येथे आहे.

हिमाचल प्रदेशातील सोलन येथे स्थित जाटोली शिवमंदिर हे आशियातील सर्वात उंच आणि भव्य शिव मंदिर असल्याचे मानले जाते. उच्च-शिखर शैलीतील हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक अद्भूत नमुना आहे.

पौराणिक मान्यतेनुसार, भगवान शिव यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते आणि येथे तपश्चर्या केली होती. यामुळेच या परिसराला विशेष आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र मानले जाते.

हे मंदिर दक्षिण-द्रविड शैलीत बांधण्यात आले असून त्यात तीन पिरॅमिडसारख्या रचना आहेत. विशेष म्हणजे, या मंदिराचे बांधकाम १९७४ मध्ये सुरू झाले आणि ते पूर्ण होण्यासाठी तब्बल ३९ वर्षांचा काळ लागला. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, जेव्हा मंदिराच्या भिंती किंवा दगडांमधून डमरूचा आवाज येतो.

या भव्य मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे तेथे असलेले शिवलिंग, सुमारे १२२ फूट उंच असलेल्या या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त जलाभिषेक करण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात.

महाशिवरात्री हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

समुद्रमंथनातून निघालेले विष प्राशन करून विश्वाचे रक्षण करणाऱ्या महादेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रात्र 'जागरणाची' रात्र म्हणून पाळली जाते.

हे मंदिर केवळ तीर्थक्षेत्रच नाही, तर तिथले शांत वातावरण आणि निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालतो. केवळ दर्शनाने जीवन बदलून टाकणाऱ्या या स्थळी आज भक्तिमय वातावरण ओसंडून वाहत आहे.

















