शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:49 IST

1 / 13
शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन(Independence Day 2025) आणि कृष्णजन्म(Janmashtami 2025) आहे तर १६ ऑगस्ट रोजी गोपाळकाला तथा दही हंडीचा(Dahi Handi 2025) उत्सव आहे. यंदा हा उत्सव पुढील राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. कारण या काळात श्रावणी शुक्रवार, जन्माष्टमी आणि गजलक्ष्मी योग जुळून आला आहे, शिवाय २० ऑगस्टर रोजी शुक्र गोचर होत असल्यामुळे सर्व प्रकारची सुखं, स्वप्नपूर्ती देणारा हा काळ असणार आहे.
2 / 13
मेष: अडलेल्या कामांना चालना मिळेल. धनवृद्धी होईल. कमाईचे नवे मार्ग सापडतील. कौटुंबिक सदस्यांकडून आनंदाची बातमी समजेल. गुंतवणुकीसाठी चांगला काळ आहे. क्षेत्र कोणतेही असो यश मिळेल. हा काळ लाभाचा आणि इच्छापूर्तीचा आहे. कसून प्रयत्न करा, यश मिळेल.
3 / 13
वृषभ: नोकरदार तसेच व्यावसायिकांसाठी भरभराटीचा काळ आहे. नवीन परिचयातून लाभाच्या संधी आहेत. डोळसपणे परिस्थिती हाताळा. कुटुंबसौख्य लाभेल. लक्ष्मीकृपेने आर्थिक बाबतीत वृद्धी होईल आणि मनात दडवून ठेवलेल्या इच्छा आता हळू हळू पूर्ण होतील. संतानप्राप्तीची आस असणाऱ्यांवर गोपाळकृष्णाची कृपा होईल.
4 / 13
मिथुन: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आगामी काळ आनंदाचा असणार आहे, खुल्या मनाने स्वागत करा. नोकरी व्यवसायासाठीदेखील काही मतभेद झाले तरी नमते घ्या, भविष्यात लाभ होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अडलेली कामे मार्गी लागतील.
5 / 13
कर्क: आर्थिक तंगी असणाऱ्यांना आगामी काळात उत्पन्नाचे विविध मार्ग सापडतील. व्यावसायिकांना नाव, प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक वृद्धी होईल. गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला उपास चुकवू नका. कृष्ण कृपेने सगळे प्रश्न सुटतील.
6 / 13
सिंह: लक्ष्मीकृपेने आगामी काळात धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. सकारात्मकतेने पुढे जा, यशस्वी व्हाल. कुटुंबसौख्य लाभेल. प्रेमसंबंध, नातेसंबंध सुधारतील. आयुष्यात स्थैर्य येईल.
7 / 13
कन्या: कृष्णकृपेने आगामी काळ भाग्योदयाचा आहे. नोकरी तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही अडचणींना सामोरे जावे लागले तरी येत्या काळात त्यातून मार्ग मिळेल आणि कष्टाचे चीज होईल. कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ घालवाल.
8 / 13
तूळ: उत्कर्षाचा काळ आहे. महत्त्वाच्या निर्णयात जोडीदाराचा सल्ला घ्या. आवडत्या क्षेत्रात काम करत राहा, प्रसिद्धी योग आहे. अर्थार्जन होईल. उत्पन्नाची साधने वाढतील. प्रकृतीकडेही लक्ष द्या.
9 / 13
वृश्चिक: उत्पन्नाचे साधन वाढेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराची साथ लाभेल. आर्थिक वृद्धी झाल्याने आनंदात राहाल. नवीन वस्तूंची, जमिनीची किंवा घराची खरेदी करू शकता. महत्त्वाच्या कागदावर विचारपूर्वक स्वाक्षरी करा.
10 / 13
धनु: वैवाहिक जीवन आनंददायी होईल. आर्थिक लाभ होतील. गुंतवणुकीत जोडीदाराचा सल्ला घ्या. आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाची बातमी मिळेल. अडलेली कामे मार्गी लागतील. कृष्ण जन्माचा उपास चुकवू नका.
11 / 13
मकर: लक्ष्मीकृपेने आगामी काळ इच्छापूर्तीचा आहे. अडलेली कामे मार्गी लागतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. अपेक्षांचे ओझे कमी केले तर हा काळ कुटुंबसौख्य देणारा ठरेल. संतती प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांवर गोपाळ कृष्णाची कृपा होऊन गोड बातमी मिळेल.
12 / 13
कुंभ: रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा. तरच आर्थिक लाभ होईल. आरोग्य सुधारेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. गोड बातमी मिळेल. गोपाळ कृष्णाची उपासना फलदायी ठरेल.
13 / 13
मीन: अडलेली कामे होतील. आवडीची वस्तू खरेदी कराल. हा काळ सुख समाधान देणारा ठरेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. उत्पन्न वाढेल. आरोग्याच्या कुरबुरी सतावतील, त्यावर पथ्य पाण्याने मात करा. गोपाळ कृष्णाची उपासना करा आणि जन्माष्टमीचा उपासही करा. लाभ होईल.
टॅग्स :Janmashtamiजन्माष्टमीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यIndian Festivalsभारतीय उत्सव-सणLord Krishnaभगवान श्रीकृष्ण