शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 07:00 IST

1 / 15
Guru Pushya Yoga October 2024: मराठी वर्षांत अनेक योग जुळून येत असतात. परंतु, काही योग हे अत्यंत शुभ, लाभदायक आणि भाग्यकारक मानले जातात. त्यापैकी एक म्हणजे गुरुपुष्यामृत योग. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो.
2 / 15
गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते.
3 / 15
यंदा २४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०६ वाजून ३८ मिनिटांपासून गुरुपुष्यामृत योग सुरू होत असून, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार सकाळी ०६ वाजून ३७ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग असणार आहे. संपूर्ण दिवस हा योग असणे विशेष मानले जात आहे. कोणत्या राशींना हा कालावधी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरू शकतो? ते जाणून घेऊया..
4 / 15
मेष: सर्वार्थाने यशदायक असा काळ आहे. कामांना गती मिळेल. चांगल्या संधी मिळतील. चांगल्या घटना घडतील. समाजात महत्त्व वाढेल. कार्यक्रमांना हजेरी लावाल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. भावंडांशी सख्य राहील. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. मुलांची प्रगती होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. घरी पाहुणे मंडळी येतील. घरात मिठाई आणली जाईल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल.
5 / 15
वृषभ: ग्रहांची अनुकूलता अनुभवायला मिळेल. कमी श्रमात जास्त प्रमाणात यश मिळेल. नेहमीची कामे वेळच्या वेळी करत राहा. अनेक अडचणी दूर झाल्यामुळे हलके वाटेल. आवडत्या छंदासाठी वेळ देणे शक्य होईल. भेटवस्तू मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. गुंतवणूक करताना खबरदारी घ्या.
6 / 15
मिथुन: काही अडचणी असतील. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. अडचणी लवकरच दूर होतील. घवघवीत यश मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. महत्त्वाची कामे सोप्या पद्धतीने मार्गी लागतील. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. वेळेचे व्यवस्थापन नीट करा.
7 / 15
कर्क: अफलातून फायदे होतील. धनवर्षाव होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळा. काहींना प्रवास घडून येईल. मनात आध्यात्मिक विचार राहतील. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. बोलण्याला किंमत दिली जाईल. आवडते भोजन मिळेल.
8 / 15
सिंह: शुभ योगाची उत्तम फळे मिळतील. नोकरीत नवीन आणि मोठी संधी मिळेल. उत्साह वाढेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. महागड्या वस्तू खरेदी कराल. मनात आध्यात्मिक विचार राहतील. तीर्थयात्रेचे योग येतील, नवीन शिकण्याची संधी मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. मात्र आर्थिक निर्णय जपून घ्यावा.
9 / 15
कन्या: शुभ ग्रहमानाचा अनुभव येईल. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. मार्गातील अडथळे दूर होतील. भाग्याची चांगली साथ राहील. महत्त्वाच्या बातम्या कानावर पडतील. उत्साह वाढेल. नोकरीत नवीन संधी मिळेल. शुभ ग्रहांची युती धनवर्षाव करेल. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. महत्त्वाची कामे सोप्या पद्धतीने मार्गी लागतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. थोरामोठ्यांच्या सहवासात याल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.
10 / 15
तूळ: भरभराटीचा काळ आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. नोकरीत उच्च पद मिळू शकते. पगारवाढ व तत्सम फायदे सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात मंगल कार्याचे आयोजन केले जाईल. घराची शोभा वाढविणाऱ्या वस्तू खरेदी कराल.
11 / 15
वृश्चिक: गुरु, चंद्र, हर्षल योगाची उत्तम फळे मिळतील. विवाहेच्छूना अनुकूल वातावरण राहील. चांगली स्थळे येतील. वडिलधाऱ्या मंडळींचा सल्ला याबाबतीत अवश्य घेतला पाहिजे. अचानक धनलाभ होऊ शकतो. भाग्याची चांगली साथ मिळेल. समाजात गौरव होईल. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. त्यामुळे ताण वाढू शकतो.
12 / 15
धनु: काही अडचणी असतील. योजना लोकांना सांगत बसू नका. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. जीवनसाथी मर्जीनुसार वागेल. अचानक धनलाभ होईल. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करा. थोरामोठ्यांचे सहकार्य मिळेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल.
13 / 15
मकर: कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. महत्त्व वाढेल. इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूरक ग्रहमान राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. महत्त्वाच्या बातम्या कळतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू प्राप्त होतील.
14 / 15
कुंभ: चंद्र-हर्षल युतीचे शुभ परिणाम दिसून येतील. मंगल कार्याच आयोजन केले जाईल. घरात नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. नोकरीत पारडे जड राहील. कामाचा ताण कमी राहील. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. सोयी-सुविधा मिळतील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. समाजात मान वाढेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. प्रवासात सतर्क राहा.
15 / 15
मीन: व्यावसायिक करार मदार होतील. नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. कागदोपत्री पूर्तता करताना अटी, शर्ती नीट वाचून घ्या. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. चंद्र, मंगळ युती अनेक बाबतीत यशदायी ठरेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. संशोधन क्षेत्रातील लोकांच्या कामगिरीची दखल घेतली जाईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक