Guru Margi 2025: ४ फेब्रुवारीनंतर 'या' राशींचा भाग्योदय; आर्थिक लाभासह परदेश प्रवासाची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:36 IST2025-01-27T17:27:26+5:302025-01-27T17:36:02+5:30

Guru Margi 2025: यंदा २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी (Basant Panchami 2025) आहे आणि ४ फेब्रुवारीला रथसप्तमी (Rath Saptami 2025)! ४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १.४६ मिनिटांनी गुरु ग्रह वृषभ राशीत मागे (Guru Margi 2025) सरकेल. यामुळे मेष राशीसह ५ राशींना या स्थित्यंतराचा लाभ होईल. या राशींना त्यांच्या करिअरमध्ये अनेक सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

कुंडलीत गुरुबळ फार महत्त्वाचे असते. इतर ग्रहांची स्थिती आणि त्याच्या जोडीला गुरु ग्रहाची स्थिती यावरून यश अपयशाचा खेळ सुरु असतो. गुरुबळ वाढावे म्हणून अनेक ज्योतिष शास्त्रीय उपायही केले जातात. मात्र येत्या ४ तारखेला पाच राशींच्या बाबतीत ती संधी आपणहून चालून येत आहे. कशी ते जाणून घेऊ.

गुरु ग्रह हा देवांचे गुरु बृहस्पती यांची ओळख मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत गुरु अनुकूल असतो, त्यांना ज्ञान, शिक्षण, संतती आणि विवाह या बाबतीत अडचणी येत नाहीत. ज्या राशींवर गुरु ग्रहाची कृपा असते, त्यांचे करिअर आणि कौटुंबिक जीवन दोन्ही सुखी होते. त्याचबरोबर त्यांचे नशीबही बलवत्तर होते. मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी तोच योग जुळून येत आहे. त्याचा लाभ पुढील पाच राशींना होणार असल्याचे संकेत आहेत.

मेष राशीच्या लोकांसाठी धन आणि सुखाचा ओघ वाढणार आहे. ग्रहांच्या स्थित्यंतराचा मेष राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. आनंद आणि स्थिरता अनुभवास येईल. कुटुंबात समृद्धी येईल आणि नातेसंबंध सुधारतील. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात लाभ होईल.

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्ही कोणतेही काम सुरू कराल, नशिबाची साथ लाभून तुमची सर्वांगीण प्रगती होईल. त्याचबरोबर तुम्ही प्रयत्न केल्यास तुमची अनेक अपूर्ण कामेही पूर्ण होऊ शकतात. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनाही अनेक व्यवहारात नफा मिळू शकेल. व्यावसायिकांना धनलाभाच्या संधी आहेत. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ खूप चांगला आहे. परदेशात जाण्याची संधी मिळेल.

नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे. त्यांना त्यांच्या कामात समाधान मिळेल. यासोबतच प्रगतीचे नवे मार्गही खुले होतील. व्यावसायिकांसाठीही हा काळ लाभदायक राहील. त्यांना चांगला नफा मिळेल. तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील. काही लोकांना अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. गुरु पालटल्याने नशीबही पालटेल. या काळात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि आनंद मिळेल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा अतिशय शुभ योगायोग आहे. गुरूच्या कृपेने तुम्हाला शिक्षण, संतती आणि करिअरसंबधी चांगली बातमी मिळेल. जोडीदारावरील प्रेम आणि त्यांचा समजूतदारपणा तुम्हाला मन:शांती देईल. प्रेमसंबंधही मधुर होतील. नोकरदार लोकांनी त्यांचे सहकारी आणि वरिष्ठांचा आदर करणे आवश्यक आहे. तरच पूर्ण सहकार्य मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थिती भक्कम होईल. भरपूर पैसा येईल.

गुरूच्या कृपेने परदेश प्रवासाचे योग आहेत. कठोर परिश्रम आणि समर्पित भावनेने सतत काम करणे महत्वाचे आहे. गुरूची स्थिती तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. गुरु मार्गस्थ झाल्यामुळे तुमच्यासाठी अनेक मार्ग खुले होतील. नोकरीत तुमचा मान-सन्मान वाढेल. अचानक तुम्हाला तुमची प्रलंबित पदोन्नती मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थैर्य लाभेल.