सतत आर्थिक अडचण असते? ‘ही’ ५ रत्ने ठरतील प्रभावी; धनलाभ होईल, पैसे कमी पडणार नाहीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 14:47 IST2022-04-21T14:41:35+5:302022-04-21T14:47:12+5:30
नवग्रहांशी संबंधित अनेक रत्ने धारण करण्याचा सल्ला दिला जातो. जाणून घ्या...

माणूस जीवनात अनेक गोष्टी करत असतो. पैसा हा मानवी जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. त्यासाठी एखादी व्यक्ती आयुष्यभर झटत असते. सर्व सुख पैशांनी खरेदी करता येत नसली, तरी जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा हा लागतोच.
प्रत्येक व्यक्तीच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. मात्र, आयुष्यातील किमान गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा आवश्यकच असतो. काही वेळा माणूस अपार कष्ट करूनही अपेक्षित पैसे मिळतातच असे नाही. कितीही कष्ट केले, तरी यश मिळत नाही.
अशावेळी अनेक जण ज्योतिषशास्त्राचा आधार घेताना दिसतात. ज्योतिषशास्त्रात यावर अनेक उपाय सांगितले असल्याचे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रात रत्नांना विशेष महत्त्व असल्याची मान्यता आहे. नवग्रहांशी संबंधित अनेक रत्ने सांगितली जातात.
एखादा ग्रह कुंडलीत कमकुवत असेल, तरीही एखादे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. काही रत्नेही नशीब, भाग्यकारक मानली जातात. अशा रत्नांविषयी जाणून घेऊया ज्याचा प्रभाव अधिक असतो आणि जी धारण केल्याने आर्थिक आघाडी सुधारू शकते, धनलाभाचे योग वाढू शकतात, असे सांगितले जाते.
आर्थिक आघाडीवर अडचणी येत असल्यास गुरुचे रत्न म्हणून ओखळल्या जाणाऱ्या पुष्कराज रत्नासारखे दिसणारे एक सुनहला रत्न धारण करण्यास सांगितले जाते. हे रत्न धनाचे नुकसान रोखण्यास उपयुक्त ठरू शकते. विनाकारण होणारे आर्थिक नुकसान यामुळे कमी होऊ शकते, असे सांगितले जाते. तसेच याचे अनेक लाभही सांगितले गेले असून, पैसा टिकण्यास मदत मिळू शकते.
नवीन व्यापार सुरू करायचा असेल, तर हिरव्या रंगाचे जेड रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रीत होऊ शकते. तसेच व्यापार, व्यवसायात लाभ मिळू शकतात. तसेच हे रत्न धन आणि वैभवकारक मानले जाते.
रत्नशास्त्रानुसार, टायगर आय रत्न प्रभावी असल्याचे मानले जाते. हे रत्न धारण केल्यास लवकर लाभ प्राप्त होऊ शकतो. तसेच बचतीच्या योजना यशस्वी होऊ शकतात. आर्थिक आघाडीवर सुधारणा होऊ शकते. पैशांची कामे तुलनेने लवकर होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
गंधक आणि खनिजापासून तयार केलेले माक्षिक रत्नही प्रभावी असल्याचे मानले जाते. नोकरदारवर्गाला हे रत्न अतिशय लाभदायक ठरू शकते. यामुळे आत्मविश्वासात वाढ होऊ शकते. कार्यालय, कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी होऊ शकते. यामुळे यश, प्रगती साध्य करता येऊ शकते.
रत्नशास्त्रानुसार, ग्रीन एव्हेंच्युरिअन नामक रत्न व्यापारी वर्गासाठी अत्यंत उपयुक्त आणि लाभकारी मानले गेले आहे. पैसे, धन, संपन्नताकारक हे रत्न मानले जाते. हे रत्न धारण केल्यानंतर मिळकतीचे नवे स्रोत प्राप्त होऊ शकतात. नवनवीन योजना डोक्यात येऊ शकतात. नवीन मार्गाने पैसे कमवले जाऊ शकतात, असे सांगितले जाते.
सदर माहिती गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, आपल्यासाठी कोणते रत्न योग्य किंवा शुभ ठरू शकेल, याची माहिती घेण्यासाठी आपली जन्मकुंडली तज्ज्ञ व्यक्तींना दाखवून योग्य सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.