गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 17:14 IST2025-05-21T17:06:55+5:302025-05-21T17:14:59+5:30

गुरुवारी अनेक शुभ योग जुळून येत असून, कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. या कालावधीत राहु-केतु यांचे अत्यंत महत्त्वाचे गोचर होत आहे. यातच बुध आणि शुक्र हे ग्रहही राशी परिवर्तन करणार आहेत. याचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच गुरुवारी गजकेसरी योग जुळून आला आहे.

सुनफा आणि कला योगही जुळून येत आहे. पूर्वाभाद्रपद नक्षत्रही असेल. गजकेसरी योग आणि भगवान विष्णूच्या कृपेमुळे अनेक राशींना विविध क्षेत्रात लाभ मिळू शकतील, असे म्हटले जात आहे. या शिवाय गुरुवार असल्यामुळे गुरु ग्रहाशी संबंधित उपाय करणे उपयुक्त ठरू शकेल.

गुरुवारी विशेष करून दत्तगुरू आणि दत्तावतार स्वामींचे पूजन आवर्जून केले जाते. नामस्मरण, उपासना केली जाते. या ग्रहयोगांचा कोणत्या राशींना सर्वोत्तम सर्वाधिक लाभ मिळू शकतो, ते जाणून घेऊया...

वृषभ: परदेशी प्रवास आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ विशेष फलदायी राहण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. हा काळ खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा आहे. आयात-निर्यात किंवा आरोग्यसेवा क्षेत्राशी संबंधित असाल तर नफा मिळण्याचे संकेत आहेत.

मिथुन: नशिबाची साथ लाभू शकेल. एखादे अडलेले काम अनपेक्षितपणे पूर्ण होऊ शकेल. व्यवसायात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. अतिरिक्त नफा मिळवू शकाल. आयटी, डिजिटल मार्केटिंग, स्टार्टअप आणि कन्सल्टिंग इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळू शकते. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. मन धार्मिक मार्गाकडे आकर्षित होईल. कुटुंबात पालकांकडून सहकार्य मिळेल.

कन्या: बुद्धिमत्तेच्या आणि विचारसरणीच्या आधारे नवीन संधी मिळू शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. सासरच्या लोकांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

तूळ: नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. अध्यात्माकडे कल वाढू शकतो. तीर्थयात्रेला जाण्याचे नियोजन करू शकता. बऱ्याच काळापासून सुरू असलेली समस्या संपुष्टात येऊ शकते. भावंडांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतील. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. धार्मिक बाबींमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घ्याल.

धनु: बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. जोडीदारासोबतच्या समस्या आता सोडवल्या जाऊ शकतात. जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. व्यवसायात मोठा नफा कमवू शकता. चांगले यश मिळू शकते. जमिनीशी संबंधित संपूर्ण वाद मिटू शकतो. भरपूर पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. निर्णय क्षमता वाढू शकते. कल अध्यात्माकडे असेल.

मकर: कुटुंबातील वातावरण चांगले राहू शकेल. आदर, मान-सन्मान वाढेल. विचारपूर्वक जोखीम घेतल्यामुळे फायदा होऊ शकतो. लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी यश, प्रगती प्राप्त होऊ शकेल. लेखन, संगीत, माध्यमे आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळू शकते. कुटुंबातील लहान भावंडांकडूनही पाठिंबा मिळू शकेल. आत्मविश्वास वाढेल.

कुंभ: कामाच्या ठिकाणी खूप फायदे मिळू शकतात. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. चांगली नोकरी शोधणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. पदासोबतच पगारातही चांगली वाढ होऊ शकते. शिक्षण क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आत्मविश्वासाने नवीन जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल.

मीन: आत्मविश्वास कायम राहील. कामाच्या ठिकाणी व्यक्तिमत्त्वाने इतरांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात फायदा होऊ शकेल. तसेच पैसे वाचवण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. या पैशांचा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापरू शकता. आयात-निर्यात, संशोधन, अध्यात्मातील लोकांसाठी फायदेशीर काळ ठरू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी भावनिकदृष्ट्या जोडलेले राहू शकाल. जोडीदाराच्या मनात काय आहे ते त्याने न सांगताही समजेल. यामुळे नाते मजबूत होऊ शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.