शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गजकेसरी विषयोगात विनायक चतुर्थी २०२६: ७ राशींना मंगल, यश-समृद्धी; थकबाकी मिळेल, कल्याण होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:54 IST

1 / 15
Falgun Vinayak Chaturthi February 2026: शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी आहे. फाल्गुन हा मराठी वर्षातील शेवटचा महिना आहे. त्यामुळे मराठी वर्षातील ही शेवटची विनायक चतुर्थी आहे. या दिवशी पंचक समाप्त होत आहे. या दिवशी विशेष व्रत केल्यास गणपती बाप्पाची विशेष कृपा लाभू शकते, असे म्हटले जाते.
2 / 15
आताच्या घडीला शनि मीन राशीत विराजमान आहे. विनायक चतुर्थीला चंद्र मीन राशीत असणार आहे. त्यामुळे चंद्र आणि शनि यांच्या युतीमुळे विषयोग निर्माण होत आहे. तर चंद्र आणि गुरू यांचा केंद्र योग आणि गजकेसरी योग जुळून येत आहे. या शुभ योगामुळे विषयोगाचा प्रभाव अत्यल्प होऊ शकेल, असे म्हटले जात आहे.
3 / 15
विनायक चतुर्थीला कुंभ राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. तसेच समसप्तक योगही जुळून आलेला आहे. या सर्व शुभ योगांचा अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, सर्वोत्कृष्ट फायदा प्राप्त होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: नोकरी व्यवसायात मोठी संधी मिळेल. काही प्रस्ताव येतील, मात्र, त्यातील बारकावे समजून घ्यावेत. घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. नोकरी आणि वैयक्तिक कामे यांचा ताळमेळ बसवताना थोडी तारांबळ उडेल. एकंदरीत फायदेशीर ग्रहमान राहील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. योग्य मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे आधार राहील. संयमाने वागण्याची गरज आहे.
5 / 15
वृषभ: कारकिर्दीत वरिष्ठांकडून फायदेशीर संधी मिळेल. सरकारी योजनांचाही फायदा होण्याची शक्यता आहे. सर्जनशील क्षमतांचा फायदा होईल. शिक्षण क्षेत्रात बुद्धिमत्तेचा आणि कौशल्याचा फायदा घेऊ शकाल. वडिलांकडून फायदा होण्याची संधी मिळेल. स्पर्धेत कामगिरी सुधारेल. शेजाऱ्याकडून पाठिंबा मिळेल.
6 / 15
मिथुन: आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात केलेल्या प्रवासात यश मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. करिअर आणि व्यवसायात नवीन मार्ग खुले होतील. अनेक मनोरंजक सहली होतील. जुन्या गुंतवणुकीबाबत चांगली बातमी मिळू शकते. घरगुती बाबींमध्ये पूर्ण लाभ आणि आनंद मिळेल. करिअर वाढीच्या शक्यता आहेत.
7 / 15
कर्क: मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. सर्व शक्तीनिशी कठोर परिश्रम कराल, हार मानणार नाही. पैसे कुठेतरी अडकले असतील तर काळजी करू नका. ते मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. काम करत राहा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरी आणि व्यवसायात लक्षणीय सुधारणा दिसेल. अनेक चांगल्या संधी मिळतील. हितशत्रू आणि विरोधक जे नुकसान करू इच्छितात, त्यांचे काहीच चालणार नाही.
8 / 15
सिंह: प्रभाव आणि मनोबल वाढू शकेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण संधी मिळू शकतील. कामाने प्रभावित होऊन वरिष्ठ नवीन संधी देऊ शकतात. राजकीय क्षेत्रातील संबंध फायदेशीर ठरतील. नोकरी शोधत असाल तर यश मिळू शकेल. व्यावसायिकांना भागीदारीतून फायदा होऊ शकेल. काही नवीन संपर्क होऊ शकतील. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवू शकाल.
9 / 15
कन्या: काहींना अचानक प्रवास करावा लागेल. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका. जे स्पर्धा परीक्षा देत असतील त्यांनी जाणकार मंडळींचे मार्गदर्शन घ्यावे. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल, सहकारी वर्गाशी गोडीत बोलून आपली कामे करून घ्यावीत. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील.
10 / 15
तूळ: उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. करिअर आणि व्यवसायाबाबत अनेक फायदेशीर सौदे मिळतील. भरीव नफा होईल. गरज पडल्यास कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा आणि फायदे मिळतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळेल. प्रियकर आणि जोडीदाराकडूनही पूर्ण पाठिंबा मिळेल. एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यस्त राहाल. आदर मिळेल.
11 / 15
वृश्चिक: कामापेक्षा मनोरंजनाकडे कल जास्त असेल. निर्णय क्षमता, अनुभव फायदेशीर ठरेल. मेहनतीचे फळ मिळू शकेल. रिस्क घेऊन निर्णय घेऊ शकाल, तो फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. मित्र किंवा नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळेल. बँकिंगशी संबंधित कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अल्प मुदतीची गुंतवणूक टाळणे हिताचे ठरेल. एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. सामाजिक वर्तुळ वाढू शकेल.
12 / 15
धनु: हा खूप चांगला काळ असणार आहे. लक्षणीय आर्थिक लाभ होतील. क्षमतेनुसार चांगले उत्पन्न मिळवू शकाल. खूप सक्रिय आणि व्यस्त असाल. काम यशस्वी होईल. चांगले उत्पन्न मिळवाल. उच्च पदावर असलेली व्यक्ती फायदेशीर ठरेल. मेहनत नफ्याची टक्केवारी वाढविण्यास मदत करेल. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवाल.
13 / 15
मकर: व्यवसायात मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. क्रोथाला आवर घातला पाहिजे. नाही तर जवळचे लोक नाराज होतील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. महत्त्वाची कामे थोडी पुढे ढकलणे ठीक राहील. वेळ वाया जाणार नाही, तसेच मनस्तापही होणार नाही. श्रद्धा आणि सबुरी यावर विश्वास ठेवा.
14 / 15
कुंभ: अनुकूल परिस्थितीचा फायदा घ्यावा. अनुभवी आणि वरिष्ठ व्यक्तींकडून पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळेल. व्यवसायिकांसाठी फायदेशीर काळ असेल. सामाजिक क्षेत्रात आदर मिळेल. बऱ्याच काळानंतर मित्र किंवा नातेवाईकाला भेटण्याची संधी मिळू शकते. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना यश मिळू शकते किंवा अशी संधी मिळू शकते ज्याची वाट पाहत होतात. वैवाहिक जीवन आनंदी असेल.
15 / 15
मीन: बुद्धिमत्ता आणि व्यवस्थापन कौशल्ये फायदेशीर ठरतील. द्विधा मनःस्थिती टाळावी. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फलदायी ठरतील. उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. काम वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. बचत योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. मालमत्तेशी संबंधित कामातून फायदा होऊ शकतो. शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :vinayak chaturthiविनायक चतुर्थीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यganpatiगणपती 2025spiritualअध्यात्मिकGanpati Festivalगणपती उत्सव २०२५Adhyatmikआध्यात्मिक