By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 09:09 IST
1 / 15gajakesari malavya rajyog march 2026: काही दिवसांनी मराठी नववर्ष सुरू होणार आहे. तत्पूर्वी, एकादशी, प्रदोष, शिवरात्रि व्रताचरण आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा काळ अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. कारण गुरू मार्गी होत असून, शनि अस्तंगत होणार आहे. तसेच काही ग्रहांच्या गोचराने शुभ योग जुळून येत आहेत. 2 / 15नवग्रहांमध्ये शुक्र ग्रहाचे महात्म्य वेगळे आहे. आताच्या घडीला शुक्र ग्रह मीन राशीत आहे. मीन रास ही शुक्राची उच्च रास मानली जाते. या राशीत शुक्र सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट फले देऊ शकतो, असे मानले जाते. आताच्या घडीला या राशीत शनि विराजमान आहे. शुक्र आणि शनिची युती विशेष मानली गेली आहे.3 / 15नवग्रहांमध्ये चंद्र ग्रह सर्वांत वेगाने गोचर करत असतो. चंद्र आणि गुरू यांच्या प्रभावाने गजकेसरी योग जुळून येत आहे. तसेच शुक्राचा मालव्य राजयोग जुळून येत आहे. गजकेसरी आणि मालव्य हे दोन्ही राजयोग अत्यंत शुभ फल लाभदायी मानले गेले आहेत. या राजयोगांचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया...4 / 15मेष: यश मिळेल. संयमाने वागण्याची गरज आहे. घाईघाईत कामे करू नका. महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक असेल तर शांतपणे विचार करा. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला घ्या. अचानक धनलाभाचे योग आहेत. वाहने जपून चालवा. अडचणी दूर होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल, नवीन नोकरीसाठी मुलाखतीचे बोलावणे येईल.5 / 15वृषभ: संमिश्र ग्रहमान राहील. थोडा आराम करून नंतर ताजेतवाने होऊन नवीन जबाबदारी घ्याल. व्यवसायात भरभराट होईल. काही अनपेक्षित लाभ होतील. तरुणवर्गाने मोहापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत कामे करू नका. पर्यटनाच्या संधी मिळतील.6 / 15मिथुन: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. जवळचा प्रवास होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पूरक वातावरण राहील. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यामुळे गुंतून पडाल. योजना गुप्त ठेवा. काही लोक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. चांगले अनुभव येतील. अडचणींची तीव्रता कमी होईल. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.7 / 15कर्क: मान-सन्मान मिळेल. ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. नोकरीतील बदल फायदेशीर ठरतील. घरातील सदस्यांची चांगली साथ राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. तब्येतीची काळजी घ्यावी. अडचणीतून बाहेर याल. मनात नवीन उमेद राहील.8 / 15सिंह: व्यवसायात सतत व्यस्त राहाल. हाती पैसा खेळता राहील. मात्र गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. शेजार-पाजाऱ्यांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरी काही अनाहूत पाहुणे मंडळी येतील. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील.9 / 15कन्या: जवळच्या लोकांच्या सहवासात याल. त्यांच्या समवेत सहलीला जाऊन याल, मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मात्र आर्थिक निर्णय जपून घ्यावे. त्या दृष्टीने थोडे सावध राहा. नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. पगारवाढ व तत्सम लाभ होतील. घरात मंगलमय वातावरण राहील.10 / 15तूळ: जीवनसाथीचा सल्ला ऐका. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असतील. आत्मविश्वासाने कामे केली पाहिजेत. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा. कुणाच्या सांगण्यावरून मोठी गुंतवणूक करू नका. जवळच्या प्रवासाचे योग येतील. भावंडांशी सख्य राहील. व्यवसायात व्यस्त राहाल. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. कलाकार मंडळींना पुरस्कार जाहीर होतील. प्रसिद्धी मिळेल. 11 / 15वृश्चिक: एखाद्या धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. त्यासाठी खर्च कराल. प्रवास घडून येईल. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. त्या दृष्टीने थोडे सावध राहा. इतरांशी बरोबरी करू नका. त्यामुळे अकारण मनस्ताप होईल. अनुकूलता अनुभवायला मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.12 / 15धनु: इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. पैसा मिळेल आणि तो खर्चही होईल. मात्र, योग्य ठिकाणी खर्च केला पाहिजे. काहींना धार्मिक कार्यासाठी प्रवास करावा लागेल. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. दगदग कमी होईल. मनात सकारात्मक विचार राहतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. काहींच्या विवाहाच्या दृष्टीने हालचाली वेग घेतील. नोकरीत नवीन प्रकल्पात नाव अग्रेसर राहील. वडीलधाऱ्या मंडळींकडून मार्गदर्शन मिळेल. 13 / 15मकर: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. व्यवसायात भरभराट होईल. नवीन कल्पना विकसित होतील. त्यातून फायदा होईल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा काळ आहे. नवीन ओळखी होतील. महत्त्वाची कामे होतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. दगदग होईल अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. धार्मिक कार्यात मन रमेल. ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद मिळतील.14 / 15कुंभ: चांगल्या बातम्या कळतील. भाग्याची चांगली साथ मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. काहींना देवदर्शनाच्या निमित्ताने प्रवास घडून येईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. नोकरीत अचानक बदल होऊ शकतात. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सतर्क राहा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. 15 / 15मीन: समाजात मान वाढेल. दगदग होईल. कामाची घाई करू नका. महत्त्वाच्या कामांची पूर्वतयारी करणे, माहिती घेणे यासारख्या कामात स्वतःला व्यस्त ठेवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. परिस्थिती आटोक्यात येईल. पर्यटनाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. समाजात तुमचा मान वाढेल. नोकरीत बढतीसह बदलीची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.