शेवटचा श्रावणी शुक्रवार: ५ राशी भाग्यवान, धनलाभ योग; लक्ष्मी प्रसन्न होईल, संपन्नता लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 07:34 AM2023-09-08T07:34:00+5:302023-09-08T07:34:00+5:30

काही दिवसांनी निज श्रावणाची सांगता होत असून, हा शेवटचा श्रावणी शुक्रवार आहे. जाणून घ्या...

काही दिवसांनी चातुर्मासातील श्रावण महिन्याची सांगता होत आहे. चातुर्मासातील श्रावण यंदाचा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण महिना ठरला. कारण यंदा श्रावण महिना अधिक आला होता. यानंतर निज श्रावण सुरू झाला. आता निज श्रावणाची सांगता होत असून, अबालवृद्धींच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वांना लागले आहेत.

निज श्रावणातील शेवटचा श्रावणी शुक्रवार, ०८ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी श्रावण वद्य नवमी आहे. मृगशीर्ष नक्षत्रानंतर आर्द्रा नक्षत्र लागणार आहे. चंद्र मिथुन राशीत असेल. तसेच सिद्धी योग जुळून येत आहे.

सिद्ध योगाच्या नावाप्रमाणे या योगामध्ये केलेले कोणतेही कार्य नेहमीच शुभ फळ देते आणि यशस्वी होते, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या प्रभावामुळे आणि शुभ योगामुळे ५ राशींना शेवटच्या श्रावणी शुक्रवारी शुभ लाभ मिळतील.

या राशींना नशिबाची साथ मिळेल. सर्व कामे सहज पूर्ण होतील. काही ज्योतिषीय उपायही सांगितले जातील, ते करून पाहिल्यास भौतिक सुखांचा स्वामी शुक्राची स्थिती कुंडलीत मजबूत होईल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होईल, असे म्हटले जात आहे. कोणत्या ५ भाग्यवान राशी आहेत आणि कोणते उपाय उपयुक्त ठरू शकतील? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना शेवटचा श्रावणी शुक्रवार लाभदायक ठरू शकेल. सिद्ध योगाच्या प्रभावामुळे आर्थिक लाभाचे योग तयार होत आहेत. नवीन काम सुरू करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नशिबाने साथ दिल्याने प्रत्येक कामात प्रगती होईल. सामाजिक कार्य केल्यास समाजात मान-सन्मान वाढेल.कुटुंबात सुख-समृद्धीसाठी शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावावा.

सिंह राशीच्या व्यक्तींना शेवटचा श्रावणी शुक्रवार अनुकूल ठरू शकेल. व्यावसायिकांना लाभाची चांगली शक्यता आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. मुलांसोबत वेळ घालवल्याने मन आनंदी होईल. शुभ योगाच्या प्रभावामुळे गुंतवणुकीत चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. शुक्रवारी लक्ष्मी देवीला मंदिरात जाऊन अथवा घरी बत्ताशा, शंख, गाय, कमळ यांपैकी वस्तू अर्पण करा. लक्ष्मी चालिस पठण अथवा श्रवण करा.

तूळ राशीच्या व्यक्तींना शेवटचा श्रावणी शुक्रवार शुभ फलदायी ठरू शकेल. व्यावसायिकांना भरपूर धनलाभ होऊ शकेल. निधीमध्ये चांगली वाढ होईल. जोडीदारासोबत नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार कराल. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला जाईल. एखाद्या कार्यक्रमात नवीन लोक भेटतील, जे भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल. मुलांची प्रगती पाहून मनही प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी देवी लक्ष्मीला मध अर्पण करा. लक्ष्मी रक्षा कवच पठण किंवा श्रवण करा.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शेवटचा श्रावणी शुक्रवार सुखद ठरू शकेल. मोठ्या प्रमाणात पैसे मिळण्याची शक्यता आहे. ज्याची अपेक्षाही केली नसेल. नोकरदारांना इतर कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. वडिलांसोबत संबंध चांगले राहतील. आर्द्रा नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे सरकारकडून धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. शुभ-लाभासाठी लक्ष्मी देवीच्या मंत्रांचा यथाशक्ती जप करावा.

मीन राशीच्या व्यक्तींना शेवटचा श्रावणी शुक्रवार अनुकूल ठरू शकेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मदतीने पद आणि प्रभाव वाढू शकतो. घराच्या दुरुस्तीबाबत भावंडांशी चर्चा करू शकता. शिक्षकांच्या पाठिंब्याने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चांगली कामगिरी करू शकतील. पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शुक्रवारी माता लक्ष्मीला खीर अर्पण करावी. श्री लक्ष्मी नारायण स्तोत्र पठण किंवा श्रवण करावे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.