देव दीपावली: ७ राशींवर अपार कृपा, सुख-सौभाग्य प्राप्ती; यश-प्रगती, लाभच लाभ, शुभ घडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 12:45 IST2024-12-01T12:34:31+5:302024-12-01T12:45:50+5:30

आगामी काळातील ग्रहमानासह देव दीपावली, विनायकी चतुर्थी तसेच खंडोबा नवरात्राचे दिवस कोणत्या राशींसाठी कसे असतील? जाणून घेऊया...

डिसेंबर महिना सुरू झाला आहे. ०२ डिसेंबरपासून मार्गशीर्ष मास सुरू होत आहे. या दिवशी देव दीपावली आहे. या दिवशी देव-देवतांची दिवाळी असते असे मानले जाते. मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. या दिवशी खंडोबाच्या (मल्हारी मार्तंडाच्या) देवळात दीपोत्सव करतात. खंडोबाचे नवरात्र सुरू होते.

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. ०४ रोजी विनायकी चतुर्थी आहे. ०६ रोजी नागदिवे पूजन आहे. या आगामी काळात चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनू, मकर आणि कुंभ राशीतून राहील.

तसेच ०२ डिसेंबर रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करत आहे. तर गुरु आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत, रवि आणि बुध वृश्चिक राशीत आहेत. प्लूटो मकर राशीत आहे. शनि कुंभ राशीत आहे. राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. ग्रहमानासह देव दीपावली, विनायकी चतुर्थी तसेच खंडोबा नवरात्राचे दिवस कोणत्या राशींसाठी कसे असतील? जाणून घेऊया...

मेष: परिश्रम व प्रयत्न करण्याचा काळ आहे. कारकिर्दीत व व्यवसायात संधी मिळतील, परंतु त्या अनुकूल नसल्याचे वाटू शकते. मनाचे ऐकावे लागेल. कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळावे लागेल. आहार व दिनचर्या ह्यावर विशेष लक्ष द्यावे लागेल. कठीण काळात वैवाहिक जोडीदाराची साथ मिळाली तर तो एक दिलासाच ठरेल. हितचिंतकांचा सल्ला घ्यावा. एखादे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अशा प्रकारे आपण अधिकतम लाभ व समृद्धी प्राप्त करू शकाल.

वृषभ: शुभ व सौभाग्यदायी काळ लाभण्याची होण्याची संभावना आहे. कारकिर्दीत व व्यवसायात यश प्राप्ती होईल. कार्यक्षेत्री वरिष्ठांचे सहकार्य व आशीर्वाद फायदेशीर होऊ शकेल. महत्त्वाच्या पदावर किंवा जवाबदारीच्या ठिकाणी नेमणूक होऊ शकते. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल. विशेष व्यक्तींच्या भेटीने भविष्यात फायदा होऊ शकतो. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळू शकतात. छंद व मुलांशी संबंधित गोष्टी आनंदास कारणीभूत होतील. क्षमता, सहनशीलता व इतरांना मदत करण्याची इच्छा ह्यात वाढ होईल. अनेक लाभ होतील. कुटुंब व समाज ह्यासाठी योजनाबद्ध काम कराल. वृद्धी, समृद्धी व यशाने भरलेला काळ ठरू शकेल.

मिथुन: लहानशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कामाचे व जवाबदारीचे दडपण असू शकते. मानसिक चिंता वाढू शकतात. परंतु घाबरून जाण्याची गरज नाही. कामाप्रती समर्पित होऊन समस्यांचे निराकरण करावे. व्यवसायात अंशतः लाभ होण्याची संभावना असल्याचे दिसत असल्याने अधिक उत्साह व कष्ट करून प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा. कोणाशी वाद न घालता कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. योजना योग्य वेळी अंमलात आणण्यासाठी धीर धरणे हितावह होईल. मित्र किंवा गुरुजनांच्या मदतीने जीवन सुधारू शकता. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीमुळे चिंतीत होऊ शकता. अशा वेळी त्यांना आधार देण्यात व योग्य ती चिकित्सा सेवा प्रदान करण्यात मदत करावी.

कर्क: हा काळ अत्यंत शुभ व यशदायी होण्याची संभावना आहे. स्वप्ने साकार होण्याची हीच वेळ आहे. नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरी करणाऱ्यांना यश प्रदान करण्याकडे अंगुली निर्देश करत आहे. पदोन्नतीची मनोकामना पूर्ण होऊ शकते. कौटुंबिक बाबींसाठी जास्त वेळ काढण्याची व त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. व्यावसायिक संबंध सकारात्मक रूपात विकसित होऊ शकतात. व्यायाम व पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्या महिलांना घर व कार्यालय ह्यात समन्वय साधण्यात थोडा त्रास होऊ शकतो. त्याचे निराकरण होण्यास थोडा वेळ लागू शकतो, परंतु वेळेच्या नियोजन क्षमतेसह त्याचे निराकरण करण्यावर विश्वास असेल.

सिंह: उत्साह व सकारात्मकतेसह घालवण्यास उत्तम काळ आहे. लहान-सहान गोष्टीत गुंतून न जाता त्यांना दुर्लक्षित केल्यास समाधानाचा व आत्मसाक्षात्काराचा अनुभव येईल. आपल्या कारकिर्दीत प्रगती होण्याची संभावना आहे. सहकारी व वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. दांपत्य जीवन सुखद होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी. तंदुरुस्त राहण्यासाठी संयम बाळगावा. प्रियजनांसह बसून समस्यांचे निराकरण करण्याची गरज भासू शकते. भावना समजून घेऊन व्यवहार करण्याचा प्रयत्न करावा. त्याने संबंध अधिक दृढ होऊ शकतील.

कन्या: काही विवाद मानसिक त्रासाचे कारण होऊ शकतो. आव्हाने व धोक्यांप्रती क्रोध व रोषाचा अनुभव येऊ शकतो, तेव्हा धीर धरण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक बाबीत पैश्यांचे नियोजन करण्याकडे लक्ष द्यावे, जेणेकरून आर्थिक संकट टाळता येईल. कोणी काही सांगितले म्हणून काही करू नका. निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेमिकेशी किंवा वैवाहिक जोडीदाराशी जवळीक असल्याचे व नात्यात उब असल्याचे जाणवेल. हे कठीण आव्हानांचा सामना करणे सोपे करू शकते. जीवनाच्या अर्थास अधिक विस्तारित करू शकतो. स्वस्थ जीवनशैली अंमलात आणावी.

तूळ: सकारात्मकतेचा व समृद्धतेचा काळ असू शकतो. नवीन लोकांची ओळख करण्याची व स्वकियांशी नाते जोडण्याची संधी मिळू शकते. असे झाल्याने जीवनात आनंद व समृद्धी येऊ शकते. एखाद्या विशेष व्यक्तीच्या मदतीने स्थगित झालेली कामे पूर्ण करण्यात यश प्राप्त होऊन मन प्रसन्न होऊ शकेल. कारकिर्दीसाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास केल्याचा सुखद अनुभव येऊ शकतो. तसेच एखादा लाभ होऊ शकतो. घर किंवा जमिनीच्या खरेदी-विक्रीत मोठा लाभ होऊ शकतो. विवाहितांना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांशी संबंधित बाबीत सहकार्य मिळेल. मुलांना तणावमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. संबंधांवर लक्ष द्यावे. सकारात्मकतेने येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा चांगला फायदा होईल.

वृश्चिक: आगामी काळ आनंद व आव्हानाने भरलेला आहे. आरोग्य विषयक समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. आहारावर व व्यायामावर विशेष लक्ष द्यावे लागेल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवून आनंदित व्हाल. त्यांच्यासह मजा करण्याची संधी मिळेल. विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. स्वप्ने साकार होऊ शकतात. योग्य वेळी आर्थिक गुंतवणूक केल्याने लाभ होईल. परंतु सतर्क राहावे. जोखीम असेल अशा ठिकाणी गुंतवणूक करू नये. ह्यासाठी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा व योग्य व सुरक्षित असेल अशा योजनेत पैश्यांची गुंतवणूक करावी.

धनु: हा कालावधी नवीन संधी व यश घेऊन येणारा आहे. कार्यक्षेत्री वरिष्ठ कामगिरीवर खुश होतील व त्यामुळे मोठ्या जवाबदारीची किंवा पदाची संधी मिळू शकते. कारकिर्दीत व व्यवसायात उन्नती होण्याची व यश मिळण्याची संभावना आहे. व्यवसायात काही नुकसान झाले असेल तर एखादा मोठा सौदा होऊन त्या नुकसानाची भरपाई होऊ शकेल. लाभामुळे समाधान होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. व्यक्तिगत जीवन सुखद होईल. दांपत्य जीवनातील माधुर्य टिकून राहील. दोघांत सामंजस्य व प्रेम राहील. एखाद्या हितचिंतकाच्या किंवा मित्राच्या मदतीने प्राप्तीचे नवीन स्रोत मिळू शकतात. त्यामुळे संचित धनात वाढ होऊ शकेल. आर्थिक बाबींवर लक्ष ठेवताना सावध राहावे लागेल. विद्यार्थ्यांना परीक्षेची -स्पर्धेची तयारी करण्यास जास्त वेळ देऊन व मेहनत करून यश प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी अध्ययनाप्रती समर्पित व्हावे. स्पर्धेत यश प्राप्तीसाठी सतत मेहनत करावी.

मकर: कामात सावध राहावे लागेल. काम वेळेत पूर्ण मेहनत करावी लागेल. दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्यावी. वरिष्ठांशी संवाद साधून सामंजस्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याशी पदानुसार वर्तन करावे. प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी नियमित व्यायाम व पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या भावना समजून घेणे महत्वाचे आहे. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात जास्त वेळ घालवावा. आर्थिक संकट येऊ नये म्हणून अतिरिक्त प्राप्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज भासू शकते. व्यावसायिक व सामाजिक जीवन समतोल साधताना आवश्यकतेहून जास्त वेळ खर्च करू नका. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा. धैर्य व सामंजस्य दाखवून काम करण्याचा प्रयत्न करावा. आरोग्य, प्रेम संबंध व आर्थिक स्थिती ह्याकडे लक्ष द्यावे. त्याचा फायदाच होईल.

कुंभ: अत्यंत अनुकूल काळ आहे. संबंधात सहकार्य व भागीदारीची संभावना आहे. जी भविष्यात सुखी होण्यास मदतरूप होईल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. आनंद व सौख्याचा अनुभव करण्यास मदत करेल. केलेली कामे व सौदे लाभदायी होतील. मोठ्या कर्जातून मुक्ती मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्या धार्मिक स्थळाचा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. सुख-सोयींशी संबंधित वस्तूंसाठी जास्त पैसे खर्च होऊ शकतात. तेव्हा खर्चांवर नियंत्रण ठेवा. जीवनातील चांगल्या गोष्टी व सामाजिकतेचा आनंद घेऊ शकाल. समाजात सकारात्मक रूपात उपस्थिती व सहयोगाद्वारा अधिक प्रसन्नता व आनंद अनुभव करू शकाल. जीवनातील सुखद अनुभवांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

मीन: कामाच्या भारामुळे काही आव्हाने घेऊन येऊ शकतो. व्यक्तिगत व व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रातून लाभ झाला तरी आर्थिक बाबींसंबंधी थोडी असंतुष्टी राहू शकते. रोजगाराच्या क्षेत्रात विशेष यश प्राप्तीची संभावना आहे, जे प्रशंसा करण्यायोग्य असेल. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकाल. कुटुंबियांशी सामंजस्य दाखवाल. त्यांची नाराजी दूर करण्यात पत्नीची मदत होईल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने शासनाकडून लाभ होईल. भविष्यासाठी एखादी योजना तयार करण्यासाठी काळ अनुकूल आहे. लक्ष्यांक प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. काम व कुटुंब ह्यात वेळेचा समतोल साधण्यावर लक्ष द्यावे. सामंजस्याने काम केल्यास चांगला लाभ होईल. नवीन व यशदायी संधी उत्पन्न होऊ शकतात.