By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 10:45 IST
1 / 9मार्च महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला की, चंद्र कुंभ आणि मीन राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत मंगळ, बुध आणि राहु ग्रह आहेत. यामुळे काही शुभ तर काही अशुभ योग जुळून येत आहेत. याचा परिणाम अनेक राशींवर दिसून येणार आहे.2 / 9चंद्राने मीन राशीत प्रवेश केल्यावरही काही चांगले योग जुळून येणार आहेत. मीन राशीत सूर्य, शनि आणि शुक्र ग्रहाशी युती होऊन काही शुभ तर काही प्रतिकूल योग जुळून येतील. या ग्रहांच्या युतीचा अनेक राशींवर सकारात्मक प्रभाव दिसून येऊ शकेल.3 / 9चंद्राच्या कुंभ आणि मीन राशीतील गोचराने महालक्ष्मी आणि चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. हे दोन्ही योग चांगला मानले जात आहेत. याचा अनेक राशींना उत्तमरित्या फायदा होणार आहे, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...4 / 9मेष: महालक्ष्मी योगाने अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. शिक्षण क्षेत्रातही लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न हळूहळू सुधारू शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. भावंडांसोबत दर्जेदार वेळ घालवाल. पूर्ण सहकार्य मिळेल. ध्येय साध्य होण्यास मदत होऊ शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.5 / 9वृषभ: आर्थिकदृष्ट्या हा काळ बराच अनुकूल असू शकतो. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. नवीन व्यवसाय किंवा गुंतवणूकीची योजना आखत असाल तर सकारात्मक परिणाम दिसू शकतात. परंतु हुशारीने गुंतवणूक करा. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकतो. कामाचे कौतुक होऊ शकते. या काळात नेटवर्किंग वाढू शकते. नवीन लोकांशी संपर्क स्थापित करू शकता, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. कोणालाही पैसे उधार देण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे.6 / 9सिंह: महालक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. आत्मविश्वास वाढू शकतो. कुटुंबात सुरू असलेले कलह आता संपू शकतात. शांततेने जगू शकता. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ फायदेशीर ठरू शकतो. फ्रीलान्स काम मिळू शकता, चांगले पैसे मिळू शकतात. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधी मिळू शकतात. असुरक्षिततेची भावना कमी होईल. निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. मानसिक शांती मिळू शकते.7 / 9धनु: चतुर्ग्रही योग अनुकूल ठरू शकतो. या काळात करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे. तसेच मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल असू शकतो. पैसे हुशारीने खर्च करणे, बजेटचे भान ठेवणे चांगले.8 / 9कुंभ: महालक्ष्मी योग फायदेशीर ठरू शकतो. आत्मविश्वास वाढू शकतो. अति आत्मविश्वास बाळगू नका. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतील. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवला जाईल. संशोधन, तंत्रज्ञान, औषध किंवा आयटी क्षेत्रात गुंतलेल्यांना लक्षणीय फायदा होऊ शकतो. मानसिक ताण कमी होण्याची शक्यता आहे. कामात प्रगती होऊ शकते.9 / 9मीन: व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होऊ शकते. आत्मविश्वास वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी प्रतिमा मजबूत होण्याची शक्यता आहे. या काळात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल ठरू शकतो. या काळात आदर आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.