सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 21:01 IST2025-04-26T20:51:40+5:302025-04-26T21:01:53+5:30

नववर्षातील पहिली चैत्र अमावास्या आणि एप्रिल महिन्याची सांगता कोणत्या राशींना भरभरून लाभ देणारी ठरू शकेल? जाणून घ्या...

मीन राशीत पंचग्रही योग जुळून येत आहे. तसेच लक्ष्मी नारायण, मालव्य, गजकेसरी नामक अनेक राजयोग जुळून येत आहेत. यातच हिंदू नववर्षाची पहिली चैत्र महिन्यातील अमावास्या २७ एप्रिल २०२५ रोजी आहे. या दिवशी विविध प्रकारचे योग जुळून आलेले आहेत.

रविवार असल्यामुळे या दिवसावर नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याचे अधिपत्य असते, अशी मान्यता आहे. मेष राशीत सूर्य विराजमान आहे. ही सूर्याची उच्च रास आहे. तसेच चैत्र अमावास्येला चंद्रही मेष राशीत असणार आहे. सूर्य आणि चंद्राचा युती योग विशेष मानला जातो. सूर्य आणि चंद्राच्या युतीने शशी आदित्य योगही जुळून येत आहे.

मराठी नववर्षातील पहिल्या चैत्र अमावास्येला प्रीती योग आणि अश्विनी नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. सर्वार्थ सिद्धी योग आहे. मीन राशीतील पंचग्रही योग आणि मेष राशीतील सूर्य-चंद्राचा युती योग अनेक राशींना फायदेशीर ठरू शकतो. चैत्र अमावास्येसह एप्रिल महिन्याची सांगता लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...

मेष: मनोबल वाढेल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी धाडसी निर्णय घेऊ शकाल. भविष्यात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी आदर वाढेल. फिटनेस, डायटिशियन, मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी विविध लाभ होऊ शकतात. कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील.

वृषभ: समाजात मान-सन्मान प्राप्त होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि आदर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना विशेष फायदा होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून आता नफा मिळू शकतो. धाडसी निर्णय घेण्यात यशस्वी होऊ शकेल. भविष्यात आर्थिक बळकटी मिळेल. आध्यात्मिक रुची वाढेल आणि कौटुंबिक आनंद मिळेल.

मिथुन: हा काळ अनुकूल असणार आहे. विविध स्रोतांकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. विशेष म्हणजे पैसे कमविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. व्यवसायात फायदेशीर सौदा होऊ शकतो. बाजारात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुन्या इच्छा पूर्ण झाल्याने मन आनंदी होईल. भाऊ, बहीण आणि मित्रांकडून मदत मिळेल. काम सहज पूर्ण होईल. आर्थिक लाभ मिळवू शकता. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. नफा कमवू शकता.

कर्क: वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. ज्ञानात भर पडू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम होऊ शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना फायदे मिळू शकतात. विद्यार्थांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.आनंद, सौभाग्य आणि समृद्धी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. उत्पन्नात जलद वाढ होण्याच्या अनेक संधी मिळू शकतात.

सिंह: व्यवसायाच्या दृष्टीने काळ चांगला जाणार आहे. फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, मीडिया इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळू शकते. सुख-सोयी आणि साधनांमध्ये वाढ होऊ शकेल. लाभ मिळतील. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मालमत्तेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. इच्छित परिणाम साध्य करता येऊ शकेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसोबत काही मतभेद असतील तर ते वडिलांच्या मदतीने संपण्याची शक्यता आहे.

कन्या: मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. आहारतज्ज्ञ, जीवनशैली प्रशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळू शकते. काही फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभ मिळू शकेल. घरात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराच्या सहकार्याने घरातील कामे लवकर पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी पूर्ण सहकार्य मिळू शकेल. चांगले पैसे कमावण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज इत्यादी सहज मिळू शकेल.

वृश्चिक: नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. यश मिळू शकेल. एखाद्या मोठ्या संस्थेत काम करण्याचा विचार करत असाल तर मोठी ऑफर मिळू शकते. उच्च शिक्षण मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. नोकरदार आणि व्यावसायिकांना त्यांच्या कामात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. लाभ मिळताना दिसू शकेल.

धनु: समस्यांपासून दिलासा मिळेल. सर्जनशील काम करणाऱ्या लोकांना विशेष यश मिळेल. लेखन, संशोधन, कला संबंधित काम करणाऱ्या लोकांनाही फायदा होईल. कुटुंबातील वातावरण आनंददायी असेल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते. एखाद्या फायदेशीर योजनेत सहभागी होण्याची संधी मिळू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काही काम पूर्ण झाल्यामुळे मन आनंदी असेल. जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवाल. वैवाहिक जीवन खूप आनंदी असेल.

कुंभ: हा काळ शुभ आणि फलदायी ठरणार आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. इच्छित ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचे वातावरण असेल. काही लक्झरी वस्तू खरेदी करू शकता. जमीन किंवा इमारत खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. समाजसेवेत सहभागी असलेल्यांना आदर आणि मान-सन्मान मिळू शकतो. सरकारी योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळेल. एखाद्या प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल.

मीन: आगामी काळ शुभ घडामोडींचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना आणि व्यावसायिकांना कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. मन प्रसन्न करणाऱ्या घटना घडू शकतात. वरिष्ठांच्या मदतीने अनेक कामे सोपी होऊ शकतील. काही महत्त्वाची जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतील. अपेक्षित नफा मिळविण्यात यश मिळू शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.