August Astro Tips: ऑगस्टमध्ये ग्रहणयोग देऊ शकतो अशुभ परिणाम; राशीनुसार काय काळजी घ्यावी ते पहा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 15:27 IST2025-08-01T15:19:10+5:302025-08-01T15:27:27+5:30
August Astro Tips: ऑगस्टमध्ये अनेक ग्रहांचे स्थित्यंतर होणार आहे. त्यातच ग्रहण योग अशुभ परिणाम देणार असला तरी काही शुभ योग देखील तयार होत आहेत. हा संमिश्र काळ आपल्या राशीसाठी कसा असणार आणि दरम्यान आपण कोणती काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊ.

नवीन महिना सुरु झाला की नवीन आशा पल्लवित होते, नवीन ध्येय खुणावतात, नवीन आव्हानं स्वीकारली जातात. या साऱ्याला ग्रहांचे पाठबळ मिळाले तर प्रगती होते. आर्थिक स्थिती सुधारते. मात्र ग्रहांची साथ नसेल तर होणारी कामेही अडतात. अशावेळी कोणत्या बाबतीत सतर्क व्हायला हवे, याचे राशीनुसार भाकीत वर्तवले जाते, ते जाणून घेत ऑगस्ट महिना सार्थकी लावू.
ऑगस्टमध्ये सूर्याचे संक्रमण सिंह राशीत असेल, जिथे केतू आधीच उपस्थित आहे. सिंह आणि केतूच्या युतीमुळे ग्रहण योग निर्माण होईल जो अशुभ योग आहे परंतु या महिन्यात अनेक शुभ योग देखील तयार होणार आहेत. ऑगस्टमध्ये कर्क राशीत बुध आणि शुक्र यांचा युती होईल, ज्यामुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होईल. त्याच वेळी, या महिन्यात, सूर्याच्या दुसऱ्या घरात मंगळ आणि बाराव्या घरात बुध शुक्र असल्याने, उभयचारी योग देखील तयार होणार आहे. यामुळे सर्व राशीच्या जातकांना संमिश्र फळ मिळेल.
मेष : ऑगस्टच्या सुरुवातीला मेष राशीच्या लोकांना बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. व्यावसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. महिन्याच्या शेवटी चांगले परिणाम मिळतील. आरोग्य सुधारेल. घरच्यांचा आणि मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळेल. फसव्या गुंतवणुकीच्या जाहिरातींना भुलू नका. महिन्याचा उत्तरार्ध आनंदाचा असेल.
वृषभ : या महिन्यात तुम्हाला प्रवास योग आहेत. अडकलेली कामे पूर्ण होईल. कामात प्रगती होईल, उत्पन्नाचे स्रोत वाढतील. १५ दिवसांनी व्यवसाय वाढीची संधी मिळेल. आरोग्यावर लक्ष द्या. महत्त्वाच्या कामात घरच्यांचा सल्ला कामी येईल. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळकट होईल. परदेशात नोकरी किंवा करिअर करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना खूप चांगला राहील. वैवाहिक जीवनात परस्पर समंजसपणा कायम राहील.
मिथुन : या महिन्यात जुने वाद संपून वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. नवीन व्यवहार यशस्वी होतील. गुंतवणुकीत सावधान, ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. कौटुंबिक सुख लाभेल. महिन्याचा उत्तरार्ध खर्चिक असेल. बजेट बिघडू शकले. भावनिक प्रसंग येतील, त्यातून सावरण्याचा प्रयत्न करा. आरोग्य सांभाळा. प्रामाणिकपणे काम करा, यश मिळेल.
कर्क : हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल. श्रद्धा आणि सबुरीने मार्ग मिळेल. त्रासदायक विषय दूर होतील, व्यवसायात प्रगती होईल. प्रवास योग आहेत. नवीन लोकांच्या भेटी लाभदायी ठरतील.तुमचे आणि कुटुंबाचे आरोग्य सांभाळा. कौटुंबिक कार्यक्रम मनाला उभारी देतील. मात्र एखाद्या काळजीने मन चिंतातुर राहील. काळानुसार त्यावर उपाय मिळेल.
सिंह : या महिन्यात अनेक आर्थिक संधी चालून येतील. व्यवसाय वाढेल, नोकरीत प्रगती होईल. ठरवलेली कामं, ध्येय पूर्ण होतील. कुटुंबाचा, सहकाऱ्यांचा, वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. अडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराची साथ लाभेल. अपघाताचे प्रसंग येऊ शकतात, स्वतःची काळजी घ्या. नवीन लोकांचे आयुष्यात येणे लाभदायी ठरेल.
कन्या: कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना चढ-उतारांनी भरलेला राहणार आहे. पूर्वार्ध खर्चिक, कष्टाचा, मेहनतीचा असेल तर उत्तरार्ध आनंददायी ठरेल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील, काळजी घ्या. नातेवाईक येतील. आनंदाचे क्षण अनुभवाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, ज्यामुळे गैरसमज होणार नाहीत. नोकरीच्या नवीन संधी मिळतील, पण विचारपूर्वक निर्णय घ्या. जोडीदाराची साथ लाभेल.
तूळ : हा महिना तुमच्या बाजूने कौल देईल. अडलेली कामे मार्गी लागतील. काही ठिकाणी अनावश्यक खर्च होतील. तर काही बाबतीत योग्य निर्णय घेऊन पैसे मार्गी लागले असेही वाटेल. जमीन खरेदी, वाहन खरेदी आनंद देईल. उत्पन्न वाढेल, त्यामुळे आर्थिक बाजू भक्कम राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रेम वाढेल. नातेवाईकांशी खटके उडणार नाहीत याची काळजी घ्या.
वृश्चिक : ऑगस्टची सुरुवात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहणार आहे. या काळात तुमच्या योजना वेळेवर पूर्ण होतील. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात नफा मिळेल. कुटुंब सौख्य लाभेल. नोकरदारांना चांगली संधी मिळेल. घरात धार्मिक कार्यक्रम होतील. आरोग्याच्या तक्रारी राहतील. कष्टाचे फळ मिळेल आणि जोडीदाराची साथ लाभेल.
धनु : हा महिना मिश्र फलदायी आहे. सुरुवात चांगली होईल. घरात धार्मिक कार्य होईल. ठरवलेली कामे होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवासाच्या संधी येतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. वैयक्तिक जीवनात तुमच्या कटू बोलण्यामुळे नात्यात गैरसमज होऊ शकतात. महिनाअखेर आनंददायी ठरेल. गोड बातमी मिळेल.
मकर : हा महिना तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. करिअर, कुटुंब, नोकरी सगळ्याच बाबतीत मन द्विधा मनस्थितीत अडकल्यासारखे होईल. काही कामे मनासारखी घडणार नाही. अकारण एखाद्या गोष्टीची चिंता लागून राहील. मालमत्तेसंबंधित व्यवहार जपून करावे लागतील. कोणताही पर्याय निवडताना, निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. जोडीदाराची साथ लाभेल, नात्यामध्ये गोडवा वाढेल.
कुंभ : ऑगस्ट महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी काही चढ-उतार घेऊन येणार आहे. जवळच्या लोकांचे वागणे त्रासदायी ठरेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना कामाचा ताण सहन करावा लागेल. अप्रिय लोकांशी जुळवून घ्यावे लागेल. सबुरीने वागले असता परिस्थिती हाताळता येईल. स्वतःच्या आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. आरोग्याकडे लक्ष द्या.
मीन : मीन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप अनुकूल राहणार आहे. नोकरी किंवा व्यवसाय बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना इच्छित संधी मिळेल. विशेषतः व्यावसायिकांना हा काळ अधिक फायदेशीर ठरणार आहे. परदेशी व्यापारात गुंतलेल्या लोकांनाही चांगला नफा मिळू शकतो. कामानिमित्त प्रवास घडतील. नवीन ओळखी लाभदायी ठरतील. हितशत्रूंपासून सावध राहा. जोडीदाराकडून आनंदाची बातमी मिळू शकते.