शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Astrology: तुमच्या राशीत दडलंय तुमच्या पूर्वजन्माचे रहस्य! जाणून घ्या मागील जन्मात तुम्ही कोण होतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 15:27 IST

1 / 12
१. मेष (Aries) : मागील जन्मात तुम्ही एखादे योद्धा किंवा नेते होतात. तुम्ही इतरांच्या संरक्षणासाठी लढा दिला असू शकतो. मात्र, त्या प्रवासात तुम्ही स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष केले असावे. या जन्मात तुम्हाला 'धैर्य' आणि 'स्वतःचे अस्तित्व' जपण्याची गरज आहे.
2 / 12
२. वृषभ (Taurus) : तुम्ही मागील जन्मात शेतकरी, कलाकार किंवा जमिनीशी जोडलेले जमीनदार असावेत. तुम्ही स्थिर आयुष्य जगलात पण कदाचित खूप हट्टी होतात. या जन्मात तुम्हाला 'भौतिक सुख' आणि 'बदल स्वीकारणे' यातील समतोल शिकायचा आहे.
3 / 12
३. मिथुन (Gemini) : मागील जन्मात तुम्ही शिक्षक, लेखक किंवा संदेशवाहक होतात. तुमचे बोलणे प्रभावी होते, पण तुम्ही अनेक गोष्टींमध्ये विखुरलेले होतात. या जन्मात तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर करून 'सखोल एकाग्रता' साध्य करायची आहे. म्हणजेच एका विषयावर लक्ष द्यायचे आहे.
4 / 12
४. कर्क (Cancer) : मागील जन्मात तुम्ही एक समर्पित माता, परिचारिका किंवा समाजसेवक होतात. तुम्ही इतरांच्या भावनांचा विचार करण्यात आयुष्य घालवले. या जन्मात तुम्हाला इतरांसोबतच 'स्वतःच्या भावनांची' काळजी घ्यायला शिकायचे आहे.
5 / 12
५. सिंह (Leo) : तुम्ही मागील जन्मात एखादे राजा, राणी किंवा प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होतात. तुम्हाला प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळाला होता. या जन्मात तुम्हाला तुमच्या अहंकारावर ताबा मिळवून 'नि:स्वार्थ सेवा' करायला शिकायचे आहे.
6 / 12
६. कन्या (Virgo) : मागील जन्मात तुम्ही वैद्य (डॉक्टर), शास्त्रज्ञ किंवा गणितज्ञ होतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीत अचूकता शोधली. या जन्मात तुम्हाला 'परिपूर्णतेचा ध्यास' सोडून आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिकायचे आहे.
7 / 12
७. तूळ (Libra) : मागील जन्मात तुम्ही न्यायाधीश, वकील किंवा मध्यस्थ होतात. तुम्ही समाजात शांतता प्रस्थापित करण्याचे काम केले. या जन्मात तुम्हाला 'निर्णयक्षमता' वाढवणे आणि स्वतःच्या हितासाठी ठामपणे उभे राहणे शिकायचे आहे.
8 / 12
८. वृश्चिक (Scorpio) : तुम्ही मागील जन्मात एखादे गुप्तहेर, गूढ विद्या जाणणारे किंवा मानसशास्त्रज्ञ होतात. तुम्ही आयुष्यातील रहस्ये शोधण्यात वेळ घालवला. या जन्मात तुम्हाला 'लोकांवर विश्वास ठेवणे' आणि 'जुना राग सोडून देणे' यावर काम करायचे आहे.
9 / 12
९. धनु (Sagittarius) : मागील जन्मात तुम्ही प्रवासी, तत्वज्ञ किंवा धर्मगुरू होतात. तुम्ही ज्ञानाच्या शोधात जग फिरलात. या जन्मात तुम्हाला मिळालेल्या ज्ञानाचा 'समाजाच्या उपयोगासाठी' वापर कसा करायचा, हे शिकायचे आहे.
10 / 12
१०. मकर (Capricorn) : तुम्ही मागील जन्मात प्रशासक, राजकारणी किंवा मोठे व्यापारी होतात. तुम्ही शिस्त आणि कामात खूप कठोर होतात. या जन्मात तुम्हाला कामासोबतच 'कौटुंबिक आनंद' आणि 'भावनांना' महत्त्व द्यायला शिकायचे आहे.
11 / 12
११. कुंभ (Aquarius) : मागील जन्मात तुम्ही क्रांतिकारी, संशोधक किंवा समाजसुधारक होतात. तुम्ही नियमांच्या विरोधात जाऊन बदल घडवला. या जन्मात तुम्हाला वैयक्तिक संबंधांमध्ये 'आत्मीयता' आणि 'जिव्हाळा' जपायला शिकायचे आहे.
12 / 12
१२. मीन (Pisces) : मागील जन्मात तुम्ही संत, कवी किंवा साधू होतात. तुम्ही भौतिक जगाचा त्याग करून अध्यात्मात रमला होतात. या जन्मात तुम्हाला तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून 'वास्तवातील जगाला' अधिक सुंदर बनवायचे आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य