By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:39 IST
1 / 6शुक्रवार २७ जून रोजी चंद्र स्वतःच्या राशीत म्हणजेच कर्क राशीत असेल. चंद्र हा लक्ष्मी मातेचा भाऊ मानला जातो. तो अनुकूल स्थितीत असल्याने गौरी योगाचा शुभ परिणाम पुढील पाच राशींना मिळणार असल्याचे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे. त्या शुभ राशी कोणत्या आणि त्यांना कोणता लाभ मिळणार? ते जाणून घेऊ. 2 / 6मेष : शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या कृपेने अनेक दिवसांपासून अडलेले तुमचे काम पूर्ण होईल. आर्थिक लाभ मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. नवीन संपर्क होतील. करिअरला नवी उंची मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदारांना वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल आणि प्रमोशनच्या दृष्टीनेही विचार होईल. योग्य ठिकाणी गुंतवणूक झाल्याने समाधान मिळेल. मानसिक दृष्ट्या शांत, समाधानी आणि आनंदी राहाल. 3 / 6मिथुन : मिथुन राशीच्या हा आर्थिक लाभाचा दिवस ठरेल. व्यवसाय असो वा नोकरी, नफा देणारा हा काळ ठरेल. कोणाची राहिलेली देणी असतील तर ती परत मिळतील. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. वाहन सौख्य लाभेल. आर्थिक लाभ झाल्याने आनंद होईल. 4 / 6कर्क : कामात आत्मविश्वास वाढेल. तुमच्या मेहनतीचे श्रेय तुम्हाला मिळेल. सामाजिक वर्तुळ विस्तारण्याची शक्यता आहे. मान सन्मानाचे प्रसंग येतील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. नोकरी करणाऱ्या लोकांचे वरिष्ठांशी संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती सुधारल्याने तुमचा सामाजिक स्तर, प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. शरीर आणि मनाचे स्वास्थ्य उत्तम राहील. 5 / 6कन्या : अपेक्षेपेक्षा चांगला नफा देणारा दिवस ठरेल. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. कामाची पोचपावती मिळेल. एखादी दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कुटुंबीयांची साथ मिळेल. जोडीदाराकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळेल. आर्थिक स्थिती सुधारल्याने स्वतःच्या सुख सोयींसाठी खर्च करताना आनंद होईल. 6 / 6मकर : आर्थिक लाभ देणारा हा दिवस असेल. नवीन योजना यशस्वी होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. करिअरला नवी उंची मिळेल. जर तुम्ही गुंतवणूक इत्यादी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जोडीदाराच्या नावावर गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. तुमच्या जोडीदाराकडून आर्थिक लाभ मिळू शकेल. जोडीदाराबरोबर ड्रीम ट्रिप प्लॅन करू शकता.