शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Astrology : गुरुबळ कमी पडत असल्याने कामात अडथळे? १२ ज्योतिष शास्त्रीय उपाय लगेच सुरु करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 7:00 AM

1 / 12
१. गुरुवारी केळीच्या झाडावर जल अर्पित करुन शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुचे नामस्मरण करावे. पिंपळाच्या झाडाला नियमित पाणी घालावे.
2 / 12
२. शीघ्र विवाहासाठी गुरुवारी उपास करावा विशेष रूपाने या दिवशी पिवळे वस्त्र नेसावे.. आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करावे.
3 / 12
३. व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकवावी. आपल्या कार्यस्थळी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा. तसेच भगवान लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य दाखवावा.
4 / 12
४. घरातून दारिद्य दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य विशेषतः स्त्रियांनी केस धुऊ नये. तसेच या दिवशी नखे कापू नये.
5 / 12
५. नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगार संबंधी अडचणी येत असल्यास, गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू जसे पिवळे फुल, पिवळे पकवान्न, फळं, कपडे ई. वस्तू दान कराव्या. निःशुल्क सेवा करावी.
6 / 12
६. हळदीची गाठ पिवळ्या रंगाच्या धाग्यामध्ये बांधून उजव्या भुजेवर बांधावे.
7 / 12
७. २७ गुरुवार पर्यंत केशराचा टिळा लावणे आणि केशरची पुडी पिवळ्या रंगाच्या कपड्यात किंवा कागदात आपल्या आसपास ठेवावी. जीभ व बेंबीवर केशराचे गंध लावावे.
8 / 12
८. घरात सूर्यफुलाचे रोप लावावे. आयुष्यात सकारात्मकता वाढेल आणि प्रगति होईल.
9 / 12
९. व्यक्तीला माता-पिता, गुरुजन आणि अन्य पूजनीय व्यक्तींच्या प्रति आदर आणि सन्मानाचा भाव ठेवावा. एकत्र कुटुंबात राहावे.
10 / 12
१०. गुरुवारच्या दिवशी पिठाच्या पेढ्यामध्ये चण्याची डाळ, गूळ आणि हळद टाकून गाईला खाऊ घालावी.
11 / 12
११. गुरुवारच्या दिवशी 'ॐ बृं बृहस्पतये नमः!' मंत्राचा जप करावा. गुरुप्रदोष व्रत करावे.
12 / 12
१२. गुरुच्या संबंधित उपाय गुरुवारच्या दिवशी गुरुचे नक्षत्र (पुनर्वसू, विशाखा, पूर्वा भाद्रपदा) आणि गुरूच्या होरा मध्ये केल्यास जास्त उत्तम.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३