Astrology: तुमचा स्वभाव तुमच्या राशीच्या गुणांसारखा आहे का? लगेच तपासून बघा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:13 IST2024-07-06T12:59:32+5:302024-07-06T13:13:29+5:30
Astrology: ज्योतिष शास्त्रात जन्म वेळेनुसार जन्म राशी आणि राशीच्या अद्याक्षरावरून बाळाचे नाव ठरवले जाते. जन्माच्या वेळेचे ग्रहमान आपण कोणत्या राशीत जन्माला आलो आहोत हे ठरवते. एकूण बारा राशी आहेत आणि या प्रत्येक राशीचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. राशीवरून व्यक्तिमत्त्वाचे अनुमान काढले जाते. याठिकाणी आपणही राशीनुसार स्वभाव वैशिष्ट्य पाहणार आहोत. 'काशीनाथ चौगुले लिखित समग्र ज्योतिष १९७६' या ग्रंथातून नाशिकचे ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे यांनी ही माहिती दिली आहे. तुम्ही सुद्धा तुमची रास आणि तुमचा स्वभाव यांचा मेळ बसतोय का ते तपासून बघा.

मेष
मेष राशीची व्यक्ती बेजबाबदार आणि शिष्टचार नसणारी समजली जाते. तार्किक बुद्धी असते. इतर व्यक्तींचे विचार अथवा विषय मेष राशीच्या व्यक्तीला न पटल्यास ते तर्कबुद्धी वापरतात आणि जोपर्यंत समोरची व्यक्ती त्यांच्या दृष्टीने सहमत होणार नाही तोपर्यंत सांगत राहतील नंतरच शांत होतील.

वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्ती अत्यंत जिद्दी स्वभावाच्या असतात. त्यांची इचछा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अडून राहतात. त्यांच्या जीवनात त्यांना कोणाचाच हस्तक्षेप नको असतो. स्वताच्या मनाप्रमाणे त्यांना जगायचे असते.

मिथुन
मिथुन राशीची व्यक्ती कायम तणावात आणि चिंतेत राहते. केव्हा कशी आणि कोणती भूमिका घ्यावी याबाबत मिथुन व्यक्ती गोंधळलेली असते. त्यामुळे जीवनात अनेकदा कोणत्याही कामात धरसोड वृत्ती राहते .

कर्क
कर्क राशीची व्यक्ती अत्यन्त भावुक असतात. संवेदनशील असल्यामुळे मनावर नियंत्रण राहत नाही. त्यांचा मूड पटकन बदलतो. त्यामुळे जीवनात भावनात्मक मूर्खातेचा अनुभव येतो.

सिंह
सिंह राशीच्या व्यक्तिंना अहंकारी मानले जाते. प्राणी राजा सिंहप्रमाणेच या व्यक्ती गर्विष्ठ आणिअहंकारी असतात. स्वतःचा आत्मसन्मान त्यांना फारच महत्वपूर्ण वाटतो. स्वतःच्या परिवारात आपणच केंद्रबिंदू आहोत असे त्यांना वाटते. त्यांच्या परिवारात त्यांच्या पेक्षा कोणी अधिक प्रभावशाली असता त्यांना ते सहन होत नाही. ते त्या व्यक्तिप्रति ईर्ष्या करतात.

कन्या
कन्या राशीची व्यक्ती कधीच खोटे बोलत नाही. एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही तर ते त्याबाबत समोरच्यास तोंडावर सांगून टाकतील. जास्त सत्यप्रिय आणि इमानदारी त्यांना त्रासदायक ठरते. कन्या राशीच्या लोकांना असे वाटते की सगळ्या गोष्टी अचूक असाव्यात. जे व्यक्ती त्यांच्या विचाराप्रमाणे नसतात त्यांनी आपल्याच प्रमाणे वागावे असा त्यांचा दुराग्रह असतो.

तूळ
तूळ राशीचा व्यक्ती अत्यंत आळशी असतात. राशीचक्रात सगळ्यात आळशी रास तूळ मानण्यात येते. कोणत्याही कामासाठी त्याच्या मागे लागल्याशिवाय ते काम करत नाही.

वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर अधिकार गाजवण्याची चुकीची सवय असते. विशेषतः ज्यांच्यावर ते प्रेम करतात त्यांच्या बाबतीत ते खूप अधिकार गाजवतात आणि ईर्षावान (over possessiveness) होतात. त्यांना स्वतःच्या रागावर नियंत्रण करता येत नाही. पार्टनर बाबतीत कायम शंका घेण्याचा चुकीचा स्वभाव असतो. त्यांच्या प्रिय व्यक्तींनी त्यांच्या म्हणण्यानुसारच चालावे याबाबत दुराग्रही असतात.

धनु
धनु राशीच्या व्यक्ती बेपर्वा मानण्यात येतात. जीवनात त्यांना प्राप्त झालेल्या अनेक उत्तम गोष्टीबाबत धन्यता मानण्याऐवजी त्याबाबत ते बेदखल आणि बेपर्वाई बाळगतात.

मकर
मकर राशीची व्यक्ती निराश लवकर होतात. ह्या व्यक्ती शर्मील्या स्वभावाच्या असतात. त्या फक्त त्यांच्या मनात असणाऱ्या लोकांशीच सहज राहतात. बाकीच्यांना काहीच थांगपत्ता लागू देत नाही. स्वभावात जिद्दीपणा असतो जो बऱ्याच वेळा चुकीचा असतो.

कुंभ
कुंभ राशी व्यक्तीत स्वभावात सौम्यता असल्यामुळे सामाजिक लोकप्रियता असते परंतु काही विशिष्ठ गोष्टीबाबत हट्टी आणि दुराग्रही असतात. त्यामुळे अकारण त्यांना अनेकदा बाजूला केले जाते. कुंभ व्यक्ती स्वतःच्या जास्त फायद्याकरता कोणत्याही थरास जातात.

मीन
मीन राशीच्या व्यक्ती खूप आदर्शवादी आणि संवेदनशील असतात त्यामुळेच इतरांच्या दृष्टीने काही विशेष गोष्ट असतांना सुद्धा ते संतुष्ट नसतात. त्यांना उत्कृष्ट गोष्ट प्राप्त झाली तरी ते त्याही पेक्षा उत्तम गोष्टीचा शोध घेत असतात. ज्यावेळी आपल्याबाबत काही चुकीचे होत आहे असे त्यांना वाटते त्यावेळी स्वतःवरील जबाबदारीची जाणीव न ठेवता त्यापासून स्वतःला अलग ठेवतात. संवेदनशील स्वभावामुळे तसे होते. बऱ्याचदा त्यांच्यात आळशीपणा सुद्धा असतो.
















