Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 01:51 PM2024-05-22T13:51:01+5:302024-05-22T13:56:40+5:30

Astro Tips: अंगठी हा जरी दागिन्यांतला एक प्रकार असला, तरी ज्योतिष शास्त्रात त्याचा वापर विविध प्रकारच्या रत्नासाठी केला जातो. ही रत्न केवळ शोभेची नसून भाग्यकारक तसेच ग्रहांना अनुकूल दिशा देणारी असतात. त्यासाठी ज्योतिषशास्त्राने सुचवलेल्या रत्नांची अंगठी घातली जाते. परंतु गेल्या काही काळात या अंगठीवर नक्षीदार कासव का येऊन बसले आणि त्याचा ज्योतिष शास्त्राशी काय संबंध आहे ते जाणून घेऊया.

१. असे मानले जाते, की कासव लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि समुद्र मंथनात ते प्राप्त झाले. घरात कासवाचे चिन्ह ठेवणे शुभ मानले जाते. तसेच अलंकार रूपात परिधान केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

२. कासवाची नक्षी असलेली अंगठी घालताना, ती योग्य पद्धतीने घातली पाहिजे.अंगठीची दिशा योग्य असली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण ही अंगठी घालता तेव्हा कासवाचे डोके आपल्याकडे आणि शेपटीची बाजू बाहेरील बाजूने ठेवा.

३. कासव हे लक्ष्मीशी संबंधित असल्याने शुक्रवार हा अंगठी घालण्यासाठी शुभ मानला जातो, कारण हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो.

४. अलंकार म्हणून ही अंगठी वापरत असाल तर धातूचे बंधन नाही, परंतु भाग्यकारक म्हणून या अंगठीचा वापर करत असाल ही अंगठी चांदीतून घडवल्यास जास्त लाभदायक ठरते.

५. ही अंगठी आपण कोणत्या बोटात घातली आहे हे पाहणेदेखील महत्वाचे आहे. लक्षात ठेवा की ही अंगठी अनामिकेत म्हणजे करंगळीच्या बाजूच्या बोटातच परिधान केली पाहिजे. तरच ती लाभदायक ठरते.

६. कासवाच्या गतीने का होईन रोज थोडी थोडी प्रगती केली पाहिजे असे म्हणतात, त्यानुसार ही अंगठी आपल्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल.