कोट्याधीश करणारा वसुमती योग: ८ राशींना शुभ, उत्पन्न वाढेल; हाती पैसा राहील, लाभच लाभ होतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 13:23 IST2025-04-19T13:10:15+5:302025-04-19T13:23:45+5:30

अनेक शुभ योगांपैकी एक असलेला वसुमती योग कसा जुळून येतो? या योगाची फले काय सांगितली आहेत? कोणत्या राशींना याचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो? जाणून घ्या...

आताच्या घडीला मीन राशीत शनि, बुध, शुक्र, राहु हे ग्रह विराजमान असून, यामुळे अनेक प्रकारचे शुभ योग जुळून आलेले आहे. मीन राशीत चतुर्ग्रही योग, मालव्य राजयोग, लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आलेले आहेत. मे महिन्यातील पूर्वार्धापर्यंत हे योग कायम असणार आहे.

वृषभ राशीत असलेला गुरु आणि धनु राशीत असलेला चंद्र यांच्यामुळे वसुमती नामक अत्यंत शुभ योग जुळून येत आहे. या योगामुळे एखादी व्यक्ती कोट्याधीश होऊ शकते. भौतिक सुखे प्राप्त होऊ शकतात. सुख-समृद्धी प्राप्त होऊ शकते. साहस, जबाबदारी, सामंजस्य वाढते. मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. यश-प्रगतीच्या सुवर्ण संधी मिळू शकतात, अशी अनेक प्रकारची फले या योगाची सांगितली गेली आहेत.

तसेच सूर्य आणि गुरु यांचा अर्धकेंद्र योगही जुळून येत आहे. या लगतच्या काळात काही राशींना या सर्व योगांचा उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: जवळच्या मित्राची मदत मोलाची ठरू शकेल. कठीण काम किंवा मोठी जबाबदारी आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल. एखाद्या विशेष कामगिरीसाठी एखाद्या प्रतिष्ठित व्यासपीठावर सन्मानित केले जाऊ शकते. व्यावसायिकांसाठी कालावधी फायदेशीर राहू शकेल. पूर्वी पैसे गुंतवले होते, त्यात नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता वाढेल. प्रेम जीवनातही हा काळ अनुकूल राहू शकेल.

वृषभ: विविध योग शुभ ठरू शकतात. गुरु कृपेने मान-सन्मान प्राप्त होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत वेळ अनुकूल राहील. उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. शुभ कार्य सुरू करू शकता. धार्मिक कार्यात आवड वाढेल. आदर वाढेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी लाभ मिळतील. जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल.

मिथुन: नोकरी आणि व्यवसायात भरपूर नफा मिळू शकेल. बेरोजगारांना नोकरीचा शोध पूर्ण करता येईल. दुसऱ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला आहे त्यांनाही यश मिळू शकते. व्यवसायाबाबत बनवलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. शुभ वार्ता मिळू शकेल. अधात्माकडे कल वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या कामाचे कौतुक होऊ शकेल. शेअर बाजाराशी संबंधित व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह: अचानक लाभ मिळू शकतात. करिअरबाबत जे काही निर्णय घ्याल ते शुभ आणि फलदायी असतील. आर्थिक व्यवस्थापन सुज्ञपणे केले पाहिजे. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदारांसाठी काळ शुभ राहू शकेल. कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकतो.

वृश्चिक: यशासोबतच आर्थिक लाभ होऊ शकतो. कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकते. बढतीसोबतच मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्याला किंवा शत्रूला कठीण लढा देण्यात यशस्वी होऊ शकता. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे अनेक स्रोत वाढू शकतील.

धनु: नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामातील अडथळे दूर होतील. व्यवसायात नफा होईल. घरात आणि कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. काही मोठी चांगली बातमी मिळू शकते. कष्टाचे पूर्ण फळ मिळेल. सौभाग्यात वाढ होईल. एखादी मोठी रक्कम मिळू शकते.

कुंभ: या राशीचा साडेसातीचा अखेरचा टप्पा सुरू आहे. शनीच्या कृपेने प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. शारीरिक समस्यांपासून आराम मिळू शकेल. पदोन्नतीमुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. घर, वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. शुक्र ग्रहाच्या कृपेने प्रेम जीवन चांगले राहू शकेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. संशोधन कार्य, लेखन, शिक्षण आणि तंत्रज्ञानाशी संबंधित लोकांना फायदा होईल.

मीन: या राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. शुक्र ग्रहाची ही उच्च रास आहे. त्यामुळे मालव्य राजयोग जुळून आलेला आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकेल. कल अध्यात्माकडे वाढू शकतो. आत्मपरीक्षण कराल. अनेक बदल घडून येतील. सर्जनशीलता वाढू शकेल. तर्कशक्ती वाढू शकेल. अनेक क्षेत्रात यश मिळवू शकाल. करिअरच्या क्षेत्रात फायदा होऊ शकतो.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.