५७ वर्षांनी मीन राशीत ६ ग्रहांचा महाकुंभ: ८ राशींना अनुकूल, सकारात्मक प्रभाव; तुमची रास काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:59 IST2025-01-24T13:47:13+5:302025-01-24T13:59:16+5:30

सहा मोठे ग्रह मीन राशीत येणार असून, याचा प्रभाव देश-दुनियेवर, सर्व राशींवर पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.

२०२५ हे वर्ष अनेकार्थाने विशेष ठरणारे असेच आहे. मीन राशीत तब्बल ६ ग्रहांचा महाकुंभ लागणार आहे. वास्तविक पाहता हे संपूर्ण वर्ष मीन राशीसाठी विविध अर्थाने वेगळे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. याशिवाय या वर्षात शनि, गुरु आणि राहु-केतु यांच्या राशी परिवर्तनाने देश-दुनियेवर वैशिष्ट्यपूर्ण प्रभाव पाहायला मिळू शकेल, असे म्हटले जात आहे.

२८ जानेवारी रोजी शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह मे महिन्यात राशीबदल करणार आहे. मीन रास ही शुक्राची उच्च रास आहे. यानंतर २७ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर १४ मार्च रोजी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. २०२५चे सर्वांत लक्षवेधक गोचर शनिचे असून, २९ मार्च रोजी शनि मीन राशीत प्रवेश करणार आहे.

विद्यमान स्थितीत राहु मीन राशीत असून, २८ ते ३० मार्च या कालावधीत चंद्र मीन राशीत आहे. असा योग ५७ वर्षांनी जुळून येत असल्याचा दावा काही ठिकाणी करण्यात आला आहे. तसेच ६ ग्रह मीन राशीत असताना २०२५ मधील पहिले सूर्यग्रहण होणार आहे. या एकंदरीत परिस्थितीचा कोणत्या राशीवर काय प्रभाव पडू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष: करिअर-व्यवसायात महत्त्वपूर्ण बदल झालेले दिसू शकतात. तसेच काही अडथळे येऊ शकतात. चुका टाळण्यासाठी काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. नातेसंबंधांची परीक्षा पाहण्याचा काळ ठरू शकेल. धीर धरा. समजूतदारपणे परिस्थिती हाताळावी. काही आव्हानात्मक परिस्थिती उद्भवू शकते. कौशल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवू शकता.

वृषभ: काही अनपेक्षित आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. आर्थिकदृष्ट्या काही नाविन्य दिसून येऊ शकते. अध्यात्मिक आणि वैयक्तिक विकासावर तसेच स्वतःची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. अन्यथा ताण येऊ शकतो. सामाजिक संबंध तात्पुरते विस्कळीत होऊ शकतात. संयम राखून मार्ग काढावा लागेल.

मिथुन: करिअरमध्ये अनपेक्षित आव्हाने येऊ शकतात. नवीन संधी मिळण्याची शक्यता या बदलांना सामोरे जाण्यासाठी विचारांमध्ये स्पष्टता आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये बदल होऊ शकतात. संभाषणात मोकळेपणा ठेवून प्रामाणिक राहावे लागेल. सर्व आव्हानांवर मात करायची असेल तर लवचिक धोरणाचा अवलंब करून लक्ष केंद्रित करणे तसेच सक्रिय असणे आवश्यक आहे. तरच दीर्घकालीन फायदा मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

कर्क: अंतर्ज्ञान वाढू शकते. अतिसंवेदनशील होणे टाळावे. वैयक्तिक आणि व्यावसायिक सुसंवादात अडथळे निर्माण होऊ शकतात. परंतु, ऊर्जा आणि उत्साहाचा योग्य वापर करणे हिताचे ठरू शकेल. शांत आणि संयमी राहण्याची आवश्यकता आहे. योग्य निर्णय घेतले तर करिअरची प्रगती होऊ शकते.

सिंह: आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात अनपेक्षित आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. याकडे ताबडतोब लक्ष द्यावे लागेल. आरोग्य चांगले राखण्यासाठी, काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात संतुलन राखावे लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. नियमित ध्यान-धारणा, योगासने आणि व्यायाम यावर भर देणे हिताचे ठरू शकेल.

कन्या: नातेसंबंधांमध्ये आव्हाने येऊ शकतात. परंतु, दुसरीकडे करिअरमध्ये यश-प्रगतीच्या सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकतात. तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागू शकते. सतर्क राहावे लागेल. सक्रिय राहावे लागेल. ताण वाढू शकतो. स्वतःची काळजी घेण्याला प्राधान्य द्यावे. नवीन कौशल्ये आत्मसात करणे हिताचे ठरू शकेल. आव्हाने स्वीकारून कामे केल्यास यश मिळू शकते. दीर्घकालीन यशासाठी स्वतःला सक्षम करावे लागेल.

तूळ: प्रेमसंबंधात अनपेक्षित समस्या उद्भवू शकतात. या काळात अनेक सर्जनशील उपक्रमात सहभागी होऊ शकता. यामुळे नवीन ओळखी होऊ शकतील. तुम्हालाही ओळख मिळू शकेल. दीर्घकालीन नफ्यासाठी आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. याने अनेक समस्या सुटू शकतील. आरोग्याकडे आणि तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक: करिअरची दिशा बदलू शकते. यासोबतच, वैयक्तिक विकास आणि प्रेमसंबंधांमध्येही बदल होतील. गैरसमज आणि अशांतता टाळण्यासाठी जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा. या काळात सहानुभूती आणि संयम आवश्यक असेल.

धनु: कारकि‍र्दीवर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. करिअरमध्ये ताण वाढू शकतो. अशांतता निर्माण होऊ शकते. याचा परिणाम वैयक्तिक संबंधांवर होऊ शकतो. शिकण्याच्या संधींचा फायदा घेऊन दृष्टिकोन विस्तृत करावा लागेल. मालमत्ता किंवा वाहन इत्यादी खरेदी करायचे असेल तर सावधगिरी बाळगावी.

मकर: करिअर, व्यवसायाशी संबंधित प्रयत्नांसाठी हा योग्य काळ आहे. अति महत्त्वाकांक्षी होण्यापासून दूर राहा. आरोग्याकडे लक्ष द्यावे. कामात संतुलन राखावे. नातेसंबंधांमध्ये प्रामाणिक संवादावर लक्ष केंद्रित करा. असे केल्याने गोंधळात टाकणाऱ्या परिस्थिती टाळण्यास मदत होऊ शकते. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात कायमस्वरूपी यश आणि सुसंवाद राखण्यासाठी प्रगती आणि स्थिरता यांच्यात संतुलन राखा.

कुंभ: सर्जनशील नूतनीकरणाला प्रोत्साहन मिळू शकते. अभिव्यक्तीसाठी नवीन मार्ग सापडू शकतात. अनपेक्षित खर्च टाळण्यासाठी काळजीपूर्वक आर्थिक व्यवस्थापन करावे लागेल. गुंतवणूकीचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील. दीर्घकालीन कौटुंबिक समस्या पुन्हा उद्भवू शकतात. या समस्येला तोंड देण्यासाठी समजूतदारपणाची आवश्यकता असेल.

मीन: ग्रहांच्या या युतीमुळे जीवनात अनेक बदल दिसू शकतात. या काळात ताण वाढू शकतो. हे टाळण्यासाठी, जुन्या समस्या सोडून द्याव्या आणि स्वतःची काळजी घेण्यास प्राधान्य द्यावे. महत्त्वाकांक्षा टाळा. सध्याच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. करिअरमधील मंद प्रगती निराशाजनक ठरू शकते. स्थिर वाढीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. नफा मिळेल. या परिवर्तनाच्या काळात स्थैर्य आणि कल्याण सुनिश्चित करून पुढे जाण्यासाठी संयम आणि जागरूकता आवश्यक असेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.