शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

३० वर्षांनी २० दिवस धनयोग: १० राशींना अपार यश-प्रगती, पद-प्रतिष्ठा वाढ; अमाप पैसा, शुभ-लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:42 IST

1 / 15
मार्च महिना सुरू झाला आहे. या मार्च महिन्यात शुक्राने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यही प्रवेश करणार आहे. शुक्र ग्रह २५ मार्च २०२६ पर्यंत मीन राशीत असेल. त्यानंतर शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे.
2 / 15
शुक्र ग्रहाला आनंद, समृद्धी, प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखसोयींचा ग्रह मानले जाते. तर, आताच्या घडीला शनि ग्रह मीन राशीत विराजमान आहे. जून २०२७ पर्यंत शनि मीन राशीत असणार आहे. शनि हा कृती, कठोर परिश्रम आणि न्याय यांचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकत्र येतात तेव्हा कठोर परिश्रमाचे फळ मिळण्याची शक्यता वाढते.
3 / 15
शुक्र ग्रहाच्या मीन राशीतील प्रवेशानंतर सुमारे ३० वर्षांनी धनयोग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. मीन ही शुक्राची उच्च रास आहे. या राशीत शुक्र सर्वोत्तम आणि सर्वोच्च फले देऊ शकतो, असे म्हटले जाते. शनि आणि शुक्राच्या युतीचा अनेक राशींना चांगला लाभ, नफा-फायदा होऊ शकतो, असे म्हटले जाते. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: नोकरी किंवा व्यवसायात प्रचंड यश मिळू शकते, तसेच आर्थिक लाभ देखील मिळू शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि संपत्ती वाढू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे.
5 / 15
वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र असून, मीन राशीत शनिशी युतीत आहे. आर्थिक बळकटी मिळू शकते. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन करार आणि फायदेशीर सौदे मिळू शकतात. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले राहील.
6 / 15
मिथुन: वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील कोणताही गोंधळ दूर होईल आणि स्पष्टता येईल. काही काळापासून नोकरी किंवा नवीन नोकरी शोधत आहेत, त्यांना चांगली बातमी मिळू शकते. सुखसोयी आणि विलासिता वाढू शकेल. मेहनतीचे परिश्रमाचे फळ मिळू शकेल.
7 / 15
सिंह: आयुष्यात स्थिरता वाढेल. करिअर, कुटुंब, व्यवसायासह अनेक गोष्टींबद्दल सकारात्मकता येऊ शकेल. समस्या दूर होतील. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकाल. आर्थिक समस्यांवर मात करता येऊ शकेल. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. देवावरील विश्वास दृढ होऊ शकेल.
8 / 15
तूळ: कारकिर्दीला एक नवीन दिशा मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना सकारात्मक बातम्या मिळू शकतात. या काळात व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरू शकते. जुने वाद मिटू शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. धैर्य आणि ताकद वाढेल. जोडीदाराशी काही मतभेद होऊ शकतात.
9 / 15
वृश्चिक: आयुष्यात सकारात्मक बदल होतील. प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतील. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील अडथळे दूर होऊ शकतील. प्रयत्नांना प्रोत्साहन मिळू शकेल. अविवाहितांना एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते, ज्याला ते पुन्हा भेटण्याचा विचार करू शकतात. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम वृद्धिंगत होऊ शकेल.
10 / 15
धनु: अनेक क्षेत्रात नफा मिळण्याची शक्यता आहे. इच्छा पूर्ण होऊ शकतात. भौतिक सुखसोयी मिळण्याची शक्यता आहे. समाजात आदर वाढू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. मित्रांसोबत चांगला वेळ घालवू शकता. कौटुंबिक जीवन चांगले राहणार आहे.
11 / 15
मकर: वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अनेक फायदेशीर सौदे होतील. शनि सर्व त्रासांपासून मुक्त करेल. अनेक शुभ लाभ देईल. शुक्राच्या कृपेने प्रलंबित कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यात रस वाढू शकेल. नोकरी करणाऱ्यांना तणाव कमी होईल, तर व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल.
12 / 15
कुंभ: कुंभ राशीची साडेसाती सुरू आहे. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. गुप्तशत्रूंवर मात करू शकता. मेहनतीचे फळ मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. या काळात व्यवसाय विस्ताराच्या संधी निर्माण होऊ शकतात. नवीन प्रकल्पांवर काम सुरू होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही अनावश्यक प्रवास करावा लागू शकतो. मनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
13 / 15
मीन: मीन राशीचा साडेसातीचा काळ सुरू आहे. उत्पन्नात वाढ होऊ शकते. बँक बॅलन्स वाढू शकतो. हा काळ आणखी खास होऊ शकतो. गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. भाग्य उजळू शकते. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होऊ शकतील. व्यवसायात नफा वाढेल. सामाजिक मान-सन्मान वाढू शकेल. मानसिक आनंद मिळेल. जीवनात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतील.
14 / 15
मीन राशीचे स्वामित्व गुरू ग्रहाकडे आहे. शनि मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या तीन राशींची साडेसाती सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मीन राशीचा मधला म्हणजेच दुसरा आणि मेष राशीचा पहिला टप्पा सुरू आहे.
15 / 15
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकShani Devशनि देव