By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:55 IST
1 / 15Mahalakshmi Panchgrahi Yoga January 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी महिना अतिशय विशेष ठरत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला धनु राशीत चतुग्रही योग जुळून आलेला होता. आता जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात शनिचे स्वामित्व असलेल्या एका राशीत पंचग्रही योग जुळून येत आहे. याचा अनुकूल परिणाम अनेक राशींवर होणार आहे.2 / 15अवघ्या ६ दिवसांत मकर राशीत ४ ग्रहांचे गोचर झाले. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य ग्रह, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह, नवग्रहांचा सेनापती मंगळ आणि शुक्र हे सर्व ग्रह मकर राशीत विराजमान झाले आहेत. यातच चंद्र काही दिवस मकर राशीत असणार आहे. त्यामुळे पंचग्रही योग जुळून येत आहे.3 / 15मकर राशीतील पंचग्रही योगांमुळे बुधादित्य, मंगल आदित्य, शुक्रादित्य, महालक्ष्मी असे अनेक राजयोग जुळून येत आहेत. पुढील अनेक दिवस हे राजयोग कायम असणार आहेत. सर्व राशींवर याचा प्रभाव असणार आहे. काही राशींना नोकरी, व्यवसाय, व्यापार, आर्थिक आघाडीवर चांगला लाभ, फायदा होणार आहे. जाणून घेऊया...4 / 15मेष: नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. अनुकूल घडामोडी होतील. फायदा होईल, अशा घटना घडतील. सतत व्यस्त राहावे लागेल. जीवनसाथीची साथ राहील. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. पुरस्कार जाहीर होतील. संयमाने वागण्याची गरज आहे. या काळात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.5 / 15वृषभ: व्यवसायात तेजी राहील. सबुरीने वागण्याची गरज आहे. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. तसेच खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. परिस्थिती हळूहळू आटोक्यात येईल. व्यवसायात तेजीचा अनुभव येईल. जीवनसाथी मर्जीनुसार वागेल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहन जपून चालवा. थोरामोठ्यांच्या ओळखीतून फायदे होतील. 6 / 15मिथुन: अनाकलनीय अनुभव येतील. काही लोकांचे खूप चांगले सहकार्य मिळेल. तर काही लोक अकारण विरोधात गुप्तपणे कारवाया करतील. एकंदरीत जनसंपर्क राखताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. महत्त्वाची कामे होतील. लोकांशी सौम्य शब्दांत संभाषण केले तर अडचणी वाढणार नाहीत. 7 / 15कर्क: यश देणारा काळ ठरेल. कार्यक्षेत्रात एखादा महत्त्वाचा बदल होऊ शकतो. उत्साह वाढेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. काहींना जवळच्या प्रवासाचे योग येतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या योजना गुप्त ठेवा.8 / 15सिंह: चंद्राचे भ्रमण फायदेशीर ठरेल. अनेक दिवस रखडलेली कामे पूर्ण होतील. कामात उत्साह राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. सतत कार्यरत राहाल. घरी पाहुणे मंडळी येतील, घराची शोभा वाढविणाऱ्या वस्तू खरेदी कराल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. 9 / 15कन्या: अनुकूलता राहील. धनलाभ, जमिनीच्या व्यवहारात फायदा होणे, सहली, भेटीगाठी, नोकरीतील उच्चाधिकार इत्यादी दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. ग्रहमानाची अनुकूलता असल्याचा फायदा घेऊन महत्त्वाची कामे झटपट आटोपून घ्या. नोकरीत पगारवाढ व अनुकूल पद मिळू शकते. वरिष्ठांकडून प्रशस्तिपत्र मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. अभिप्राय महत्त्वाचा ठरेल.10 / 15तूळ: अनेक अडचणी दूर झालेल्या असतील. मोकळा वेळ मिळेल. आवडते छंद जोपासाल. नवीन काही तरी शिकण्यासाठी वेळ मिळेल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. व्यवसायात तेजीचा अनुभव येईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मनावरील ताण निघून जाईल.11 / 15वृश्चिक: मन आनंदी राहील. काही किरकोळ स्वरूपाच्या अडचणी असतील. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. हळूहळू परिस्थिती आटोक्यात येईल. अनुकूल परिस्थितीचा अनुभव येईल. अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. भेटवस्तू मिळतील. प्रेमात असणाऱ्यांनी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. महत्त्वाची कामे सोप्या पद्धतीने होतील. धनलाभ होईल. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील. आवडत्या लोकांच्या सहवासात याल. 12 / 15धनु: मोठे काम होईल. अनुकूल वातावरण राहील. हाती आलेला पैसा खर्च करून टाकाल. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. कुणाला जामीन राहणे शक्यतो टाळा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. अनुकूल परिस्थिती राहील. प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल.13 / 15मकर: कामे पटापट होतील. नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. कामे पटापट होतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. पगारवाढ व विविध प्रकारचे लाभ होतील. एखाद्या कामासाठी थोडा जास्त वेळ द्यावा लागेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. संयमाने वागण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कायद्याची बंधने पाळा.14 / 15कुंभ: चंद्राचे भ्रमण तुम्हाला लाभदायक ठरेल. सामाजिक मान-सन्मान, थोरा मोठ्यांच्या भेटीगाठी, नोकरीतील प्रगती व बदल, धनलाभ इत्यादी दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. ठरवलेली कामे सोप्या पद्धतीने होतील. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. काहींना पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल.15 / 15मीन: कलाकारांना प्रोत्साहन मिळेल. काही अडचणी असतील. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. वाहन जपून चालवा. अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. अडचणी आपोआप दूर होतील. लोक मान देतील. चांगली बातमी कळेल, नोकरीत नवीन संधी मिळेल, पगारवाढ मिळेल. सोयी-सुविथा वाढवून मिळतील. मनात सकारात्मक विचार राहतील.