पिवळे दात म्हणजे व्यक्तित्वाची वाईट छाप, वेळीच करा सोपे घरगुती उपाय अन् मिळवा शुभ्र हास्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:29 IST2022-08-18T18:19:41+5:302022-08-18T18:29:36+5:30
पिवळे दात म्हणजे व्यक्तिमत्वाची वाईट छाप, पण घरगुती उपायांनीही दातांचा पिवळेपणा दूर करता येतो. जाणून घ्या हे उपाय

दातांचा पिवळेपणा खूप त्रासदायक ठरू शकतो. यामुळे तुमचे एकंदर व्यक्तिमत्व बिघडू शकते. काहीवेळा दात व्यवस्थित साफ केल्यानंतरही दात पिवळे आणि काही वेळा योग्य काळजी न घेणे हे देखील कारण असू शकते.
दात स्वच्छ करण्यासाठी दंतचिकित्सकाकडे जाणे महागडे असू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून काही मिनिटांत दातांचा पिवळेपणा दूर केला जाऊ शकतो.
खोबरेल तेल : रोज सकाळी खोबरेल तेलाने दात आणि तोंड स्वच्छ करा. नंतर पाण्याने धुवा आणि आपल्या नियमित टूथपेस्टने ब्रश करा. यामुळे नैसर्गिकरित्या दात पांढरे होण्यास मदत होऊ शकते.
अॅप्पल सायडर व्हिनेगर : दात स्वच्छ करण्यासाठी तुमच्या नेहमीच्या माउथवॉशमध्ये थोडे अॅप्पल सायडर व्हिनेगर टाका. त्यानंतर दात पिवळेपणापासून मुक्त होण्यासाठी याने तोंड धुवा. याची नियमितपणे पुनरावृत्ती करा परंतु जास्तवेळा हे करू नका.
अॅक्टिव्हेटेड चारकोल : अॅक्टिव्हेटेड चारकोल टूथपेस्टमध्ये मिसळून त्याने ब्रश करा आणि काही वेळात दात चमकदार होतील. त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ तोंड धुवून घ्या.
बेकिंग सोडा : बेकिंग सोड्याने दात घासल्याने दात पांढरे होतात आणि तोंडातील बॅक्टेरियापासून बचाव होतो. दोन चमचे पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळा आणि चांगल्या परिणामांसाठी या मिश्रणाने ब्रश करा.
हळद : दात घासण्याआधी दातांना हळद लावा आणि ती हळुवार चोळा. त्यानंतर हळद स्वच्छ धुवा आणि नंतर टूथपेस्ट वापरून ब्रश करा.
संत्र्याची साल : झोपण्यापूर्वी नियमितपणे संत्र्याच्या सालीच्या आतील बाजूने दात घासून स्वच्छ धुवा. असे नियमितपणे केल्यास तुमच्या दातांचा पिवळेपणा हळूहळू दूर होईल.
स्ट्रॉबेरी- आपल्या दातांवर स्ट्रॉबेरी घासल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे होतात, कारण त्यात बरेच फायदेशीर अँटिऑक्सिडेंट्स आहेत. यामुळे दात पिवळसरपणा दूर होण्यास मदत होते.