चेहऱ्याला स्क्रब करण्याची सवय आहे, मग हे नक्की वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 18:58 IST2019-01-05T18:55:03+5:302019-01-05T18:58:47+5:30

1.स्क्रब करताना या चुका टाळा - त्वचा मऊ आणि चमकदार असावी, यासाठी कित्येकजण स्क्रबचा वापर करतात. चेहऱ्याव्यतिरिक्त शरीराच्या अन्य भागांवरही स्क्रबचा प्रयोग केला जातो. पण स्क्रब करताना काही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवाव्यात, जेणेकरुन नंतर याचा त्रास सहन करावा लागणार नाही.

2. आठवड्यातून दोनदा करा स्क्रब - घाईघाईत स्क्रबिंग करणे त्वचेसाठी हानिकारक असते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आठवड्यातून दोन वेळाच स्क्रब करावे. याहून अधिकदा स्क्रब केल्यास त्वचेवर परिणाम होऊ शकतो.

3. कमी प्रमाणात स्क्रब घ्यावे - जर त्वचा सेन्सिटिव्ह नसेल तर फेसवॉशनं चेहरा धुवावा आणि त्यानंतर स्क्रब करावे. पण जास्त प्रमाणात स्क्रब घेऊ नये आणि वर्तुळाकार मोशनमध्ये चेहऱ्यावर स्क्रब करावा.

4. पीलिंगनंतर स्क्रब करणं टाळावे - चेहऱ्यावरील डेड स्किन काढण्यासाठी आणि चमक वाढवण्यासाठी पील ऑफ जेलचा वापर केला जातो. पीलिंग केल्यानंतर स्क्रब करू नये नाहीतर त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतील.

5. संसर्ग होण्याचा धोका - स्किन लायटनरनंतर स्क्रब अजिबात करू नये. कारण यानंतर स्क्रबचा काहीही परिणाम दिसून येत नाही. यामुळे चेहऱ्याला सूज किंवा संसर्ग होण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो.
















