करिनापासून दीपिकापर्यंत, ग्लोईंग स्किनसाठी अभिनेत्री वापरतात 'या' सोप्या 'ब्युटी ट्रिक्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 04:28 PM2020-09-18T16:28:20+5:302020-09-18T16:45:53+5:30

बॉलिवुडच्या अभिनेत्री कशाहीपेक्षा जास्त आपल्या सौंदर्याची आणि त्वचेची काळजी घेतात. त्याचे काळेभोर केस आणि चमकदार त्वचा नेहमीच चर्चेचं कारण ठरते. आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध सीने अभिनेत्रींच्या सौंदर्याचं गुपित सांगणार आहोत. प्रत्येक अभिनेत्रीचे वेगवेगळे ब्युटी सिक्रेट्स आहेत. तुम्हाला कल्पनाही नसेल अत्यंत सोप्या टिप्सचा वापर करून अभिनेत्री ग्लोईंग स्किन मिळवतात.

कतरिना: कतरिनाला आपल्या त्वचेवर मेकअप करायला अजिबात आवडत नाही. फक्त सनस्क्रिन लोशन आणि लिपबाम लावते. याशिवाय तिला लांब केस खूप आवडतात. केसांना सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिकरित्या केसं सुकवणं तिला जास्त आवडतं.

करिना: करिना कपूर खान आपल्या नॅचरल ब्यूटीसाठी ओळखली जाते. केसांना नियमित ऑलिव्ह ऑइल किंवा बादामाच्या तेलानं मालिश करते. विना मेकअप लूकमध्ये राहायाला करिनाला आवडतं. आपल्या चमकदार त्वचेसाठी करिना त्वचेवर मधाचा वापर करते.

प्रियंका चोप्रा: प्रियांका आपल्या त्वचेचाल तजेलदार ठेवण्यासाठी खूप पाणी पिते. एका मुलाखतीदरम्यान तीनं सांगितलं होतं की, प्रियांका रोज आपल्या केसांची तेलानं मालिश करते. रात्रभर तेल तसंच ठेवून सकाळी धुवून टाकते. शुटिंग नसल्यास PeeCee मेकअपपासून लांब राहते. हेल्दी स्कीनसाठी दह्याच्या फेसपॅकचा वापर करते.

आलिया भट्ट : आलिया भट्ट विना मेकअप लूकमध्ये तितकीच चांगली दिसते. जितकी मेकअपमध्ये दिसते. आपल्या त्वचेला सुंदर आणि ग्लोईंग बनवण्यासाठीा आलिया मुलतानी मातीचा वापर करते. या फेसपॅकमुळे त्वचेतून बाहेर येणारं तेल नियंत्रणात ठेवलं जातं . त्यामुळे त्वचेवर एक्ने, डाग पुळ्या येत नाहीत.

ऐश्वर्या : जगातील सगळ्यात जगळ्यात सुंदर महिलांपैकी ऐश्वर्या राय बच्चन एक आहे. आपल्या त्वचेला फ्लॉलेस ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या सामानाचा वापर करते. चण्याच्या पिठात मध आणि दही घालून या पॅकचा वापर करते. आठवड्यातून एकदा आपल्या केसांना तेल लावत असून चेहऱ्यासाठी काकडीच्या फेस पॅकचा वापर करते.

दिशा पटानी: दिशा पाटाणी आपल्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनवेळा तेल लावते. कांद्याचे तेल दिशा केसांना लावते. कारण या तेलामुळे केसांना पोषण मिळते.

दीपिका पादूकोण: रिपोर्ट्सनुसार दीपिका आपल्या त्वचेला हाडड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करते. जंक फूडपसून नेहमी दूर होते. आपल्या त्वचेला नेहमी रिफ्रेश करण्यासाठी नेहमी स्पा ला सुद्धा जाते. याशिवाय सनस्क्रिन लोशनचाही वापर करते.

Read in English