शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नखं आणि हातांचं सौंदर्य वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 4:00 PM

1 / 9
नखं स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक असतं. यामुळे तुमच्या लूकसोबतच हातांचं सौंदर्य वाढविण्यासाठीही मदत होते. परंतु यासाठी तुम्हाला सतत पार्लरमध्ये जाण्याची गरज नसते. तुम्ही हातांचं आणि नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी घरीच उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही टिप्स वापराव्या लागतील. ज्यांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थांच्या मदतीने अगदी सहज नखं आणि हातांचं सौंदर्य खुलवू शकता.
2 / 9
जर तुमच्या नखांवर डाग पडले असतील किंवा नखं पिवळी दिसत असतील तर लिंबाचा रस आणि एक कप ताजं पाणी एका बाउलमध्ये घ्या आणि त्यामुळे नखं स्वच्छ करा.
3 / 9
नखांना सुंदर, मजबूत आणि लांब करण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी नखांवर ऑलिव्ह ऑइलने मसाज करा.
4 / 9
नखांची काळजी घेण्यासाठी आपले पाय आणि हातांच्या सर्व बोटांना कोमट मोहरीच्या तेलामध्ये ठेवा. असं 8 ते 10 मिनिटांसाठी करा. त्यानंतर सर्व नखांवर हळूहळू मसाज करा. यामुळे त्यांच्यामध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि त्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. नखांना फिट आणि स्ट्रॉग करण्यासाठी हे दररोज करणं फायदेशीर ठरतं.
5 / 9
नखांमध्ये घाण साचू देऊ नका. जर तुम्हालाही कधी नखांमध्ये घाण असल्याचे दिसले तर, हे एखाद्या ब्रशच्या मदतीने किंवा बारिक सुईला कापूस लावून स्वच्छ करा.
6 / 9
बेकिंग सोड्यासोबत लिंबाचा रस एकत्र करून 10 मिनिटांनी हात कोमट पाण्याने धुवा.
7 / 9
दूधामुळे फक्त हाडंच नाही तर नखंही मजबूत होण्यास मदत होते. दूधामध्ये अंड्याचा पिवळा भाग एकत्र करा आणि नखांना त्यामध्ये बुडवून ठेवा.
8 / 9
तुरटीच्या मदतीने मालिश केल्यानेही नखं मजबुत करण्यासाठी आणि त्यांची चमक वाढविण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर नखांचा पिवळेपणाही दूर होतो. मीठाच्या पाण्यामध्ये बोटं बुडवून ठेवल्याने फायदा होतो.
9 / 9
नखांवरील चमक पुन्हा मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पेट्रोलियम जेलीने नखांना मसाज करा. असं केल्याने नखांचा ड्रायनेस कमी होतो आणि चमकही वाढते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी