स्वप्न भंगले; सिंधूचा जपानच्या यामागुचीकडून पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 11:11 PM2017-12-17T23:11:39+5:302017-12-17T23:16:04+5:30

भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे दुबई सुपर सीरिजचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा १५-२१, २१-१२, १९-२१ असा पराभव करत दुबई सुपर सीरीजच्या जेतेपदावर आपले नाव कोरले.

अंतिम सामन्यात निकराची झुंज देणाऱ्या सिंधूला सीरिजच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

जागतिक क्रमवारीत क्रमांक तीनवर असलेल्या सिंधूने आपल्यापेक्षा एका अंकाने वर असलेल्या यामागुचीला नंतर कोणतीही संधी न देता पहिला गेम २३ मिनिटांमध्ये २१-१५ असा आपल्या नावे केला.

यानंतर देखील यामागुचीने आपली आघाडी कायम ठेवली. दरम्यानच्या काळात सिंधूनेही काही चुका केल्या. या चुकांची किंमत सिंधूला पुढे मोजावी लागली. शेवटी यामागुचीने दुसरा गेम २१-१२ असा जिंकला.

तिसऱ्या गेममध्येही सिंधूने चांगली सुरुवात केली आणि लागलीच ४ अंकांची कमाई केली. ब्रेक टाइमपर्यंत सिंधू ११-८ ने पुढे होती. यामागुचीच्या एका फटक्यावर सिंधूचा रिटर्न नेटमध्ये गेला आणि सिंधूने हा किताब गमावला.